एक वर्षापूर्वी या तारखेला वीरेंदर सेहवाग मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर सात-कमी-३०० धावांवर बाद झाला आणि तीन कसोटी त्रिशतके काढणारा पहिला फलंदाज होण्याचा त्याचा विक्रम हुकला. आदल्या दिवशी खेळ संपला तेव्हा तो २८४ धावांवर खेळत होता आणि हजारो क्रिकेटरसिकांच्या आशा त्यावेळी पल्लवित झालेल्या होत्या. अखेर सेहवाग वैयक्तिक २९३ धावांवर मुरलीदरनच्या चेंडूवर मुरलीदरनकडूनच झेलबाद झाला. या २९३ धावा अवघ्या २५४ चेंडूंमध्ये आलेल्या होत्या आणि या धावांमध्ये तब्बल ४० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. तब्बल २०२ धावा (सुमारे ६९ %) सेहवागने न पळताच काढलेल्या होत्या !हा सामना भारताने एक डाव आणि २४ धावांनी जिंकला होता. सेहवाग कसोटीवीर आणि मालिकावीरही ठरला होता.प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक एकतरर्फी सामना ४ डिसेंबर १९६४ रोजी पाकिस्तान रेल्वेच्या लाहोरातील मोगलपुरा इस्टेट मैदानावर संपुष्टात आला. कागदावर हा ‘सामना’ झाला पाकिस्तान रेल्वेज आणि डेरा इस्माईल खान या दोन संघांमध्ये. पाकिस्तान रेल्वेजच्या परवेज अख्तरने नाणेकौल जिंकून फलंदाजी स्वीकारली. पहिल्या दिवसाखेर २ बाद ४१५, दुसर्या दिवसाखेर ६ बाद ८२५ धावा उभारणार्या रेल्वेजने अखेर ६ बाद ९१० धावांवर आपला डाव घोषित केला. कर्णधार परवेज अख्तर नाबाद ३३७, जावेद बाबर २००. पुढे काय झाले ते धावफलकातच पाहणे उचित ठरेल.
गोलंदाजी
पहिला डाव: बशिर हैदर ८-५-१५-२; अफाक खान ७.३-४-१४-७. दुसरा डाव: अहद खान ६.३-४-७-९; नझीर खान ६-२-१८-०.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply