नवीन लेखन...

डिसेंबर ०६ : फ्रेडी फ्लिन्टॉफ





फ्रेडी किंवा फ्रेड या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या अँड्र्यू फ्लिन्टॉफ आज वयाची ३३ वर्षे पूर्ण करतो आहे. उंचापुरा वेगवान गोलंदाज, वेगाने धावा जमविणारा फलंदाज म्हणून नावारूपाला आलेल्या फ्लिन्टॉफला सततच्या दुखापतींमुळे सलग मनसोक्त क्रिकेट खेळता आले नाही पण जेव्हा जेव्हा तो खेळला तेव्हा तेव्हा एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारांमध्ये तो एक भारदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून उजेडात राहिला. कारकिर्दीच्या अखेरीस चेन्नई सुपर किंग्जकडून इंडियन प्रिमिअर लीगमध्येही तो खेळला.

१९९८ मध्ये फ्रेडीचे कसोटीपदार्पण झाले. ट्रेन्टब्रिजवरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही कसोटी दुसर्‍या डावात रंगलेल्या माईक आथर्टन आणि अलन डोनल्डच्या जुगलबंदीसाठी प्रसिद्ध आहे. फ्लिन्टॉफ आणि जॅक्स कॅलिसने एकमेकांचे बळी या कसोटीत मिळविले. पुढे दोघेही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून विख्यात झाले.

वजन हा फ्लिन्टॉफसाठी कारकिर्दीच्या आरंभकाळात अडसर ठरला होता. खेळाडू म्हणून त्याचे वजन जास्त असल्याचे निवडकर्त्यांचे मत असल्याने त्याला संधी दिली जात नव्हती. काऊंटी स्पर्धांमध्ये धावा काढून फ्लिन्टॉफ निवडकर्त्यांचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न करीत होताच. २००० साली ओल्ड ट्रॅफर्ड या त्याच्या घरच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ४२ धावा काढून फ्रेडीने ग्रॅएम हिकबरोबर दुसर्‍या जोडीसाठी स्फोटक भागीदारी केली. फ्लिन्टॉफ सामनावीर ठरला आणि प्रसारमाध्यमांनी त्याची कामगिरी ‘नॉट बॅड फॉऽ अ फॅट लॅड’ (जाड्या पोरासाठी वाईट नाही) असल्याची मखलाशी केली.

२००१-०२ च्या हंगामात भारत दौर्‍यावर येणार्‍या संघात त्याची निवड झाली. या दौर्या तील कसोटी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी फार सुमार दर्जाची झाली. मालिकेदरम्यान त्याला एकदा तर ड्रेसिंग रूममध्ये रडू आवरणे कठीण झाले होते. हा त्याचा कारकिर्दीतील सर्वात वाईट विदेश दौरा ठरणार अशी चिन्हे असतानाच शेवटच्या एकदिवसीय सामन्याने त्याचे नशीब पालटवले. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ११ धावांची गरज असताना अँड्र्यूने अनिल कुंबळेला धावबाद

केले आणि पुढच्याच चेंडूवर

जवागल श्रीनाथचा त्रिफळा उडवून इंग्लंडला सामना जिंकून दिला. या विजयानंतरच ‘तो’ बहुचर्चित प्रकार घडला- अंगातील शर्ट काढून फ्लिन्टॉफने आपला आनंद साजरा केला; त्याच्यासाठी हा सामना ‘टर्निंग पॉईंट’ ठरल्याचा तो आनंद होता.

२००२ मध्ये त्याचे पहिले कसोटी शतक आले. २००३ च्या मध्यापर्यंत आपल्या कामगिरीद्वारे त्याने दाखवून दिले होते की, अष्टपैलू म्हणून इअन बोथमशी त्याची केली जाणारी तुलना अनाठायी नाही. २००२ पर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत २००३ ते २००५ या काळात त्याच्या फलंदाजीची आणि गोलंदाजीचीही सरासरी सरस होती.

भारत फ्लिन्टॉफसाठी यशदायी ठरला आहे असे दिसते. इंग्लंडचा कर्णधार म्हणून प्रथम त्याला संधी मिळाली ती भारताविरुद्धच. आपल्या दुसर्यान अपत्याच्या जन्माला आता फार थोडा वेळ उरला आहे याची जाणीव असूनही पूर्ण कसोटी मालिकेसाठी भारतातच थांबणार असल्याचे त्याने जाहीर केले. याच मालिकेत खराखुरा अष्टपैलू फ्लिन्टॉफ दिसून आला. तो मालिकावीर ठरला. चार अर्धशतके आणि ११ बळी त्याने या मालिकेत मिळविले. त्यानंतर झालेल्या एदिसांच्या मालिकेतही त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले.

दुखापतींनी त्याची साथ कधीही सोडली नाही. २००७ ते २००९ या तीन वर्षांमध्ये इंग्लंड संघाने खेळलेल्या ३६ कसोट्यांपैकी केवळ १३ मध्येच फ्लिन्टॉफ सहभागी होता पण जेव्हा जेव्हा तो तंदुरुस्त होता तेव्हा तेव्हा हमखास तो संघात असेच. २००९ च्या अशेस मालिकेनंतर कसोटीला त्याने बायबाय ठोकला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..