नवीन लेखन...

७ दिवसात ५ किलो वजन कमी करायचे आहे?

होय आता ते अगदी शक्य आहे !
सात दिवसासाठी काही नियम
सतत उकळून आटविलेले गरम पाणीच प्यावे. शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यासाठी ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
आहारामध्ये चवीनुसार आले, पुदिना, लसुन, काळे मिरे, धने, जिरे लिंबु यांचा भरपुर वापर करावा.
या शिवाय त्रिफळा पावडर, चित्रक, नागरमोथा, मुलतानी माती, कुळीथ, वावडींग, अर्जुन, सारिवा, मंजिष्ठा यां पावडरचे मिश्रण करुन कोरडे पावडर अंगावर घासणे म्हणजे उद्वर्तन होय. या पावडरच्या मालीश ने वजन कमी होताना त्वचेवर होणारे दुष्परीणाम कमी होतात. नियमित मालिशने त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचेचा टोन टिकुन राहतो, त्वचेचा रंग उजळ्तो. दररोज आंघोळीच्या वेळेस या पावडरची अंगावर ३० मिनिटापर्यंत मालिश करावी.

रात्रीचा आहार सुर्यास्तापुर्वी घेण्याचा काटेकोर प्रयत्न करावा
खालील आहार वेळापत्रकासोबत नियमित वेळेस कमी साखरेचा चहा, दुध, कॉफी घेऊ शकता.

दिवस पहिला :- पाचक आहार जवळपास सर्वांना सोमवार ते रविवार पर्यंत एखाद्या तरी उपवासाची सवय असते. दिवसभर उपाशी राहणे, रात्री एकदा जेवण करणे अशी सर्वसाधारण आपली पध्दत असते. त्याच पध्दतीने आमच्या वेळापत्रकानुसार व आयुर्वेदानुसार पहिल्या दिवशी आपणास दिवसभर फक्त ताज्या दह्याचे ताक पिऊन राहायचे आहे, ताक पातळ असावे, चांगले घुसळून लोणी काढून घ्यावे. ताकामध्ये लसुन, आद्रक, पोदीना, काळेमिठ हे चरबीचे शोषण करणारे व अन्नाचे पाचन करणारी औषधी द्रव्ये योग्य मात्रेत घालावीत, याच पध्दतीने २ थेंब तेल, कडीपत्त्ता, कोथींबीर , हिरवी मिर्ची, लसुन यांची फोडणी दिऊन बनविलेला मठ्ठा देखील चालतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ८ ते १० ग्लास या प्रमाणात आपण ताक किंवा मठ्ठा घेऊ शकता. रात्री मात्र आपण विनातेल तुपाची एक किंवा अर्धी भाकरी – चपाती व हळद-बेसन, लसुन -आद्रक घालुन बनविलेली पातळ दह्याची कढी दोन वाटी या प्रमाणात घ्यावे. आहे ना गंमत उपाशी राहणे ही नाही व पोटभरुन खाणे ही नाही.

दिवस दुसरा:- व्हिजीटेबल डायट दुसऱ्या दिवशी आपणास पालेभाज्यांचे रस किंवा सुप्स घ्यायचे आहे. पालक सुप, टोमॅटो सुप, गाजर रस, पत्तागोभी रस, बीट ज्युस, कद्दु किंवा काकडीचे रस सकाळ पासून संध्याकाळपर्यंत पोट भरुन घेऊ शकता. मात्र पालेभाज्या वाफवुनच त्यांचे सुप बनवावे किंवा रस काढावे. दुसरे महत्त्वाचे प्रत्येक रस किंवा सुप मध्ये पोदीना, आद्रक, लसुन, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीदाना, धने, जिरे, मोहरी आवश्यकते नुसार भरपुर प्रमाणात घ्यावी. रात्री भुक लागल्यास एक-दिड वाटी भात व आद्रक- लसुन घालुन बनविलेले पातळ मुगाचे किंवा तुरीचे वरण घेऊ शकता.

दिवस तिसरा:- फ्रुट डायट ताजी गोड फळे किंवा फळांचा रस. सफरचंद, डाळींब, संत्रा, मोसंबी, टरबुज, पपई ही फळे आपण पोटभरुन खाऊ शकता. आयुर्वेदिक नियमाप्रमाणे फळावर काळेमिरे पावडर घेण्याचे विसरु नका. मध्यंतरी भुक लागल्याची संवेदना झाल्यास नारळ पाणी प्यावे, किंवा बिनासाखरेचे लिंबु पाणी व काळे मीठ प्यावे. यामुळे भुक कमी होते व शरीरात उर्जा टिकून राहते.

सरासरी तिसरया दिवशी शरीरात हल्के पणा जाणवु लागतो, सुस्ती-आळस कमी होतो, उत्साह वाढतो. वजन दिड ते दोन किलो ने कमी झालेले जाणवायला लागते.

दिवस चौथा:- प्रोटिन डायट. सकाळी — मांसाहारी असाल तर पिवळा भाग काढून एक उकडलेले अंडे, किंवा १ वाटी वाफवलेले मोड आलेले मुग किंवा मटकी, सोयाबीन किंवा चने सोबत चवीनुसार आद्रक, लसुन, मेथीदाना , कडीपत्त्ता, कोथीबीर, धने, जीरे.

दुपारी :- उकडलेले मुग किंवा मुग-तुरीचे पातळ वरण

संध्याकाळी :- एक ते दोन वाटी मुगाचे घट्ट वरण

दिवस पाचवा:- फळभाज्या कॉम्बी डायट सकाळी :- पोट भरुन कोशींबीर. आद्रक, लसुन, पोदिना, काळेमिरे पावडर घ्यायला विसरु नका.

दुपारी :- सफरचंद, अननस, पपई, टरबुज, डाळींब, संत्रा यापैकी कोणतेही एक ताजे गोड फळ किंवा नारळ पाणी. किंवा अननस ज्युस. पण साखर नको.

संध्याकाळी :- भरपुर पालेभाज्या-मुग डाळ – तांदुळ, लसुन , आद्रक घालुन बनविलेली एक वाटी खिचडी व सोबत दोन वाटी लसुन , आद्रक घालुन बनविलेली पातळ कढी .

आज बघा आपले २ ते ३ किलो वजन सहज कमी झालेले दिसून येइल. कपडयांची फिटींग सैल झाली आहे हे लक्षात येईल.

दिवस सहावा:- ग्रीन ब्लड डायट सकाळी :- एक कप बिनासाखरेचे गोड दुध, दुधामध्ये आद्रक-हळद-तुळस घालून उकळून प्यावे. सोबत २-३ मारी बिस्किट घेऊ शकता.
दुपारी : – वाफवलेल्या पालेभाज्यांचा रस

संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप किंवा एक ज्वारीची पातळ भाकरी व एक वाटी मुगाचे किंवा तुरीचे पातळ वरण खावे.

दिवस सातवा:- प्रोटिन व्हिजिटेबल डायट सकाळी :- सोललेल्या मुगाचे घट्ट वरण १-२ वाटी त्यास दोन थेंब तेलाची, मोहरी-आद्रक-लसुनाचीघालुन बनविलेली पातळ कढी .

संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप
सात दिवस संपले आठव्या दिवशी सकाळी आपले वजन बघा.

या पध्दतीने वजन कमी केल्यानंतर आपला चेहरा आकर्षक, शरीर साचेबध्द दिसेल. शरीरातील सुस्ती, मरगळ, आळस निघून जाईल. नियोजित पार्टी मध्ये आपणच आकर्षण राहाल. कोठेही उपाशी राहायचे नाही , तेल-भातासारखे पदार्थ बंद करायचे नाही, आयुर्वेदाचे आहाराबद्दल सर्व नियम पाळायचे मग निश्चितच तुमचे वजन कमी होईल. शरीराची प्रोटिन, क्यॉलशियम, लोहाची ही गरज भागते अन वजनही सहज कमी होते, दुष्परीणाम ही काही होत नाही.

* संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. पवन एस. लड्डा

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..