नवीन लेखन...

आत्महत्त्या एका संवेदनशील शेतकऱ्याची





प्रकाशन दिनांक :- 01/06/2003

गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा एक नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय? आज तरी चित्र असेच दिसते. क्षेत्र कोणतेही असो, काही मुठभरांचा अपवाद सोडला तर शिखर गाठणाऱ्या बहुतेकांनी नंबर दोनचाच मार्ग जवळ केल्याचे दिसते आणि सर्वाधिक खेदाची बाब म्हणजे अशा लोकांनाच समाजाने प्रतिष्ठित म्हणून मान्यता दिलेली असते.
‘शेतकऱ्याची आत्महत्या आता इथल्या कोडग्या समाजजीवनाच्या सवयीचा भाग झाली आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी परिस्थिती आहे. आता कोणाच्याच हृदयात कालवाकालव होत नाही, कोणाच्याच डोळ्यात थेंबभर अश्रू तरळत नाही. वर्तमानपत्रात कुठल्यातरी पानावर एक कॉलम बातमी छापली जाते. दुष्काळाची बातमी वाचली जावी तितक्या कोरडेपणाने ती वाचली जाते किंवा वाचल्या जातही नाही आणि दुसऱ्या दिवशी पेपरसोबतच ती बातमीही शिळी होते. जिवंतपणी उपेक्षा आणि अवहेलनाच वाट्याला आलेल्या शेतकऱ्याच्या नशिबात मृत्यूनंतरही काही वेगळे येत नाही. जणूकाही संपूर्ण समाजच आपली संवेदना गमावून बसला आहे. शासन, प्रशासनाने तर ती केव्हाच गमावली आहे. भावनांचे मढे वाहणाऱ्या अशा समाजात संवेदनशील, पापभिरू, सज्जन माणसांचे जगणे कठीण झाले आहे. आपल्या आत्म्याशी तडजोड करून जगणे ज्यांना जमले ते कसेतरी जगत आहेत आणि ज्यांना ते शक्य होत नाही ते स्वत:हून मृत्यूला जवळ करीत आहेत. माणूसकी आणि अर्थातच सोबतीला अपरिहार्य असलेली संवेदनशीलता आजकाल केवळ ठाामीण भागातच दिसून येत, त्यातही शेतकरीवर्गात प्रामुख्याने. कदाचित म्हणूनच आत्महत्या आणि शेतकऱ्याचे एक अतूट नाते नि

र्माण होऊ पाहत आहे. खरेतर एखादा शेतकरी आत्महत्या करीत असतो तेव्हा तो केवळ एक

नश्वर देह संपवित नसतो. समाजाच्या मुर्दाडपणावर ओढलेला

तो एक आसूड असतो, परंतु त्या आसुडाच्या वेदनाही आताशा मुक्या होऊ लागल्या आहेत. उमटलेला वळ थोडा काळ टिकतो आणि मग पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’. कृषिधर्म हा राष्ट्रीय धर्म असलेल्या भारतात प्रत्यक्ष कृषकांनाच आत्महत्या करावी लागत असेल तर ती गंभीर चिंतेची बाब ठरायला हवी, परंतु दुर्दैवाने आज आम्हाला कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य वाटत नाही.
परवा अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जीचे गुणवंतराव साबळे यांनी औरंगाबादेत आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला. पोलिसांचे काही चुकले नाही, त्यांच्या लेखी तो गुन्हाच होता. परंतु हा आत्मघाती गुन्हा करण्यास प्रेरित करणारी तीप निराशा गुणवंतरावांच्या मनात का दाटून आली, याचा तपास जगातील कोणतेही पोलिस खाते करू शकणार नाही. कोणाला तशी गरजही वाटणार नाही. एका सत्शील कुटुंबात जन्मलेल्या गुणवंतरावांनी आपल्या कर्तृत्वाने सार्वजनिक जीवनात यशाची अनेक शिखरे गाठली. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरूवातीला काही काळ त्यांनी प्राध्यापकी केली नंतर ते राजकारणात उतरले. परंतु मातीशी जुळलेली त्यांची नाळ कायमच होती आणि त्यातूनच सुरू झाली साखर कारखाना उभारण्याची धडपड. अखेर अंबादेवी सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने त्यांचे स्वप्न साकारले, परंतु या स्वप्नाची किंमत किती मोजावी लागेल यापासून सरळमार्गी गुणवंतराव अगदीच अनभिज्ञ होते. शेवटी ही किंमत चुकविण्यासाठी त्यांना आपल्या जीवाचे मोल द्यावे लागले. कारखान्यासाठी उभ्या केलेल्या कर्जाच्या परतफेडीची चिंता सतत त्यांना पोखरत होती. अखेर तो ताण त्यांना असह्य झाला आणि एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व केवळ संवेदनश
ील असल्यामुळे कायमचे अस्तंगत झाले. हजारो कोटींचा अपहार करून राजकारणाची झुल अंगावर पांघरीत उजळ माथ्याने समाजात वावरणाऱ्या कथित बड्या लोकांचे अनुकरण केले असते तर गुणवंतरावांना आत्महत्येची बुद्धी कधीच झाली नसती. परंतु त्यांची कातडी माणसाची होती गेंड्याची नव्हती. त्यांचे हृदय माणसाचे होते, लांडग्याचे नव्हते आणि म्हणूनच कदाचित त्यांना आपण जगण्यास पात्र नसल्याचे वाटले असावे.
गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा ‘एक’ नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय? आज तरी चित्र असेच दिसते. क्षेत्र कोणतेही असो, काही मुठभरांचा अपवाद सोडला तर शिखर गाठणाऱ्या बहुतेकांनी ‘नंबर दोन’ चाच मार्ग जवळ केल्याचे दिसते आणि सर्वाधिक खेदाची बाब म्हणजे अशा लोकांनाच समाजाने प्रतिष्ठित म्हणून मान्यता दिली असते.
अलीकडील काळात समाज तीन प्रकारच्या लोकांमध्ये विभागल्या गेला आहे. एक जे प्रामाणिकपणे, सभ्य मूल्यांची जपणूक करीत स्वत:च्या आणि समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करू पाहतात, दुसऱ्या प्रकारात समाजाच्या उत्कर्षाचा आव आणीत स्वत:च्या उत्कर्षासाठी कसलाही विधिनिषेध न बाळगता प्रयत्न करणाऱ्यांचा समावेश होतो तर तिसऱ्या प्रकारातील लोक ‘ठेविले अनंते…’ चा जप करीत उगवणारा प्रत्येक दिवस बोनस समजत असतात. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पहिल्या प्रकारातील लोक वगळता इतर दोन्ही प्रकारातील लोक आज सुखी-समाधानी असल्याचे दिसून येते. पहिल्या प्रकारातील लोकांसाठी मात्र आयुष्याचा प्रत्येक दिवस जीवघेण्या परीक्षेचा ठरत असतो आणि कधी कधी तर त्यांना आत्मघातासारखा मार्गही न

ाईलाजाने स्वीकारावा लागतो. गुणवंतराव साबळेच्या बाबतीत तेच झाले. गुणवंतरावांची आत्महत्या ही सत्याची, सज्जनतेची, संवेदनशीलतेची आणि सोबतच सहनशीलतेची आत्महत्या ठरली.
मागील दोन वर्षात महाराष्ट्रात 170 च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. सरकारच्या दृष्टीने हा आकडा फारसा महत्त्वपूर्ण नाही. आधी विलासराव आणि आता सुशीलकुमार या मुख्यमंत्रीद्वयांच्या निदर्शनास आम्ही वेळोवेळी या आत्महत्यांमागील गंभीर आणि तितकेच करुण वास्तव आणून दिले, परंतु त्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. गुणवंतरावांच्या आत्महत्येनेही त्यांच्या या दगडी मनोवृत्तीत

काहीच फरक पडणार नाही आणि ते स्वाभाविकही (?)आहे. जोपर्यंत समाजच असल्या घटनांकडे मुर्दाडपणे पाहत

आहे तोपर्यंत त्यांना अशा किरकोळ (त्यांच्या दृष्टीने) घटनांची दखल घ्यायची गरजच नाही. माणसामधील चांगुलपणा, माणसातील माणूसकी, संवेदनशीलता जिवंत ठेवायची असेल तर आता समाजालाच कुस बदलावी लागेल, पेटून उठावे लागेल. या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या प्रत्येकाला याचा जाब खडसावून विचारावा लागेल. असे झाले नाही तर यापुढे शेतकरी आत्महत्या नव्हे तर हत्या करू लागतील आणि प्रामाणिक, सज्जन, संवेदनशील, माणुसकीला जपणाऱ्या पिढीचा निर्वंश केल्याचे पातक समाजाच्या माथी लागेल. जोपर्यंत सर्वसामान्य माणूस पेटून उठणार नाही तोपर्यंत शासन-प्रशासनाच्या बुडाला आच लागणार नाही आणि जोपर्यंत सरकारच्या बुडाला आच लागत नाही तोपर्यंत गुणवंतराव साबळे प्रकरणाची पुनरावृत्ती वारंवार होतच राहील. गुणवंतराव साबळेची आत्महत्या नसून इथल्या व्यवस्थेने घडवून आणलेली ती हत्या आहे आणि हेच सत्य आहे.

— प्रकाश पोहरे

Can write my paper for me you start a sentence with a conjunction

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..