प्रकाशन दिनांक :- 16/03/2003
सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही. सगळेच लोकं स्वार्थी, भ्रष्टाचारी, समाजहिताची चाड नसलेले आहेत, सगळ्यांनीच कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आहे, असे म्हणता येणार नाही.
कोणे एके काळी महात्मा गांधी, टिळक, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी कर्वे, आगरकर, गोखले, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज ही विविध क्षेत्रातील उत्तुंग प्रतिभेची माणसं समाजात दीपस्तंभाप्रमाणे वावरत होती. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपल्या परीने समाजाचे ऋण फेडण्याचे, समाजाला उन्नत करण्याचे प्रयत्न केले. पुढच्या पिढीच्या जीवनाला, कार्याला या लोकांनी दिशा दिली. आज त्यांच्या उंचीची माणसं समाजात दिसत नसतील, परंतु याचा अर्थ तो प्रवाह कायमचा आटला असा होत नाही. प्रत्येक पिढीतच काही लोकोत्तर माणसं जन्माला येत असतात, आपल्या कार्याच्या प्रभावाने समाजाला दिशा देत असतात. प्रमाण कमी – जास्त होत असेल, परंतु तो प्रवाह कायमचा कधीच आटत नाही. असे असले तरी ज्यांच्या पायावर डोके टेकवावे अशी माणसं आज फार विरळी झाली हे सत्य नाकारता येणार नाही. परंतु या सत्याची दुसरी बाजू ही आहे की, ज्या पायावर डोके ठेवावे, ज्यांच्या पाऊलखुणांवर मार्गक्रमण करावे, अशी पावलं आज प्रयत्नपूर्वक समाजासमोर येऊ दिल्या जात नाही. हा समाज आदर्शविहीन आणि पर्यायाने निस्तेज करण्याचा प्रयत्न योजनाबद्ध पध्दतीने केल्या जात आहे आणि असा प्रयत्न करणाऱ्यांच्या हातात लेखणी, कॅमेरा ही प्रसार माध्यमातील प्रभ
वी शस्त्रं लागली आहेत. या शस्त्रांचा अतिशय कुशलतेने वापर करीत एक
भरकटलेला, विस्कळीत समाज उभा करण्याचे
षडयंत्र आखल्या गेले आहे. कर्तृत्ववान व्यक्तीचे पाय छाटण्याचे, त्याच्या असामान्यत्वाला अतिसामान्य करून जनतेसमोर ठेवण्याचे आणि त्याचवेळी सामान्य वकुबाच्या किंवा नालायक व्यक्तीला मोठा करून तोच आपला भाग्यविधाता आहे, हे समाजमनावर ठसविण्याचे कुटिल कार्य सध्या प्रसारमाध्यमांद्वारे केले जात आहे. या ओढून – ताणून मोठा केलेल्या व्यक्तीचे पितळ एक दिवस उघडे पडतेच. त्याचा स्वाभाविक परिणाम सर्वसामान्य जनतेवर, विशेषत: युवा पिढीवर पडतो आणि त्यांचा आदर्शावरचा विश्वासच उडू लागतो. प्रसारमाध्यमे ही एक दुधारी तलवार आहे.
‘खिचो न कमान को
न तलवार निकालो,
जब तोफ मुकाबिल है
तो अखबार निकालो’
प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य नेमक्या शब्दात या ओळींमध्ये व्यक्त झाले आहे. आता तर लेखणीच्या दिमतीला कॅमेरासुध्दा आला आहे. त्यामुळे हे सामर्थ्य कैकपटीने वाढले आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत हे अतिशय प्रभावी माध्यम अतिशय चुकीचे मेंदू संचालित करीत आहेत. भुताच्या हातात कोलीत पडले आहे. या देशाचा उत्कर्ष डोळ्यात खुपणाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून समाज नासविण्याचे काम आरंभिले आहे. केसरी, मराठाची परंपरा केव्हांच खंडित झाली आहे. एखाद्याला मोठे करणे किंवा संपविणे प्रसारमाध्यमांच्या हातचा मळ झाला आहे आणि दुर्दैवाने (की सुनियोजितपणे) चुकीच्या माणसांना मोठे केले जात आहे. अनुल्लेखाने मारण्याच्या तंत्राने कित्येक प्रचंड योग्यतेच्या माणसांचा बळी प्रसारमाध्यमांनी घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान होण्याची योग्यता आणि रास्त अधिकार असणारी सरदार पटेलांसारखी मंडळी मागे फेकल्या गेली. ‘टाइम्स ठाुप’ नेहरूंच्या पाठीशी उभा राहिला हे त्यामागचे एक प्
मुख कारण होते. अलिकडील काळात तर प्रसारमाध्यमांचा पक्षपातीपणा अधिकच उघडपणे स्पष्ट होऊ लागला आहे. लेखणी इशाऱ्यावर चालू लागली आहे. बुध्दी गहाण पडली आहे; परंतु याचा परिणाम मात्र अतिशय घातक होत आहे. कर्तृत्ववान माणसाच्या कर्तृत्वाला न्याय न मिळाल्याने त्या माणसापेक्षा अधिक नुकसान समाजाचे होत आहे. ज्यांचे संपूर्ण जीवनच आदर्श ठरू शकते अशा जीवनपतींच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह लावली जात आहेत. त्यातून नेमके काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे? समाजाने नाकारलेल्या, झिडकारलेल्या लोकांना सन्मानाने जगायची प्रेरणा देणारे आनंदवन बाबा आमटेंनी उभारले. कुणाच्याही मदतीची अपेक्षा आणि प्रतीक्षा न करता त्यांनी कुष्ठरोग्यांच्या जगण्याला ‘अर्थ’ दिला. त्यांचे हे कार्य कोणत्याही फुटपट्टीने मोजता येणार नाही. या कार्याचे मूल्यमापन शक्यच नाही, परंतु कथित लेखणीबहाद्दरांनी त्यांचेही हनन करण्यास कमी केले नाही. हा सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे. केवळ बाबा आमटे आणि साधनाताईच नव्हे तर विकास, प्रकाश या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीनेही आपल्या कार्याने समाजाला उफत करून ठेवले आहे. विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या भामरागडच्या जंगलातील आदिवासींना हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून माणसात आणण्याचे भरीव कार्य या मुलांनी केले आहे. बाबांच्या पुण्याईवर भौतिक सुख-सुविधांचा उपभोग घेत सुखासीन जीवन जगणे त्यांना सहजशक्य होते. तसे त्यांनी केले असते तर कुणी आक्षेप घेण्याचे कारणही नव्हते, परंतु बाबांच्या पावलावर पाऊल टाकीत त्यांनी दगडगोट्यांनी, खाच खळग्यांनी भरलेला बिकट मार्ग निवडला. बाबा आणि त्यांच्या पुढील पिढीने हाती घेतलेले कार्य लोकांसमोर भरीव प्रमाणात आणून युवापिढी पुढे आदर्शाचा वास्तुपाठ ठेवणे, हे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य होते. परंतु या प
िवारावरही चिखलफेक करण्यात प्रसारमाध्यमांनी धन्यता मानली. कोणताच मनुष्य परिपूर्ण नसतो. चुका प्रत्येकाकडूनच होतात. बरेचदा या चुका अपघाताने होतात तर बरेचदा सहकाऱ्यांच्या गफलतीमुळे होत असतात. अशा चुकांचे भांडवल करणे त्या व्यक्तवर अन्याय करणारे ठरत नाही का? असे करून आपण त्या व्यक्तीच्या कार्याचा अपमानच करीत नसतो का? परंतु ज्यांचे समाजाशी काही देणे – घेणे नाही अशी कर्तृत्वशून्य माणसे असा प्रयत्न सातत्याने करताना दिसतात. या प्रयत्नातून सकारात्मक तर काही होत नाही; परंतु नकारात्मक
विचाराची बीजं मात्र पेरली जातात आणि ती फोफावतात देखील फार
लवकर. समाजात आदर्श नाहीत असे नाही परंतु या आदर्शाची चिरफाड करणारी माध्यमं आज अधिक प्रभावी ठरली आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेणाऱ्यांनाच आज अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे. बावनकशी सोन्याच्या लकाकीला पितळांनी आव्हान देणे सुरू केले आहे. बाबा आमटे, अण्णा हजारे, मेधा पाटकर सारख्यांना आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. जवळपास एक तप नर्मदातीरी धरणठास्तांसाठी झटणाऱ्या मेधा पाटकरांना केवळ पुरस्कारासाठी झटणारी म्हणून हिणवल्या गेले. अण्णा हजारेंनी राळेगणसिध्दीला फुलविलेला स्वर्ग कधीच बाजुला सारल्या गेला आणि त्यांचीही नकारार्थी प्रतिमा उभी केल्या गेली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, सर्वसामान्य जनतेचा चांगुलपणावरील विश्वासच उडत चालला. समाजातील आदर्शांचा लोप झाला आहे, अशी प्रतिमा उभी करण्यात दुर्दैवाने प्रसार माध्यमांना यश आले. त्यामुळे युवा पिढी भरकटू लागली, देशाचे भवितव्य भरकटू लागले. चांगल्या गुणांचे उदात्तीकरण संपले आणि वाईटांना प्रतिष्ठा मिळू लागली. मायावती, वीरप्पन, लालू हिरो झाले आणि राजेंद्रसिंह कोण आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगण्याची पाळी आली आहे आणि या देशातील कर्तृत्व ”हेची फ
काय मम् तपाला” म्हणून कपाळाला हात लाऊन बसले आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply