इंठाजी नववर्षास नुकताच प्रारंभ झाला. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आम्ही भारतीयांनी 31 डिसेंबरच्या रात्री जे-जे प्रकार केले ते आम्ही किती मोठ्या प्रमाणात आंग्लाळलो आहोत, हे सिध्द करण्यासाठी पुरेशे आहेत. त्या एका रात्री संपूर्ण देशात अक्षरश: अब्जावधी रूपयांची मदिरा रिचविल्या गेली. ज्यांचे ओठ पिळले तर दूध निघेल, अशा सुकुमारांपासून ते ज्यांची लाकडे स्मशानात पोहचली आहेत अशा वृध्दांपर्यंत साऱ्यांनीच (अर्थात काही सन्माननीय अपवाद सोडून) आपापल्या ऐपतीनुसार ती झिंग अनुभवली. विशेष म्हणजे महानगरांमध्ये तर महिला वर्गही मागे नव्हता. या हिडीस, ओंगळवाण्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आमच्या प्रसारमाध्यमांनीही धन्यता मानली. या पृष्ठभूमीवर अंतर्मुख होऊन आम्ही भारतीय कुठे निघालो आहोत, असा विचार करण्यास भाग पाडणारा, प्रकाश पोहरे यांचा हा लेख काही किरकोळ बदलांसह पुनर्मुद्रित करीत आहोत. – प्रबंध संपादक
सर्व धर्मांविषयी आमच्या मनात आदर आहे. सर्व धर्मीयांनी आपआपला धर्म चार भिंतीच्या आत पालन करावेत. इतर धर्मांमध्ये नाक खुपसू नये. हे आम्हाला मान्य आहे. सांगायचे म्हणजे ख्रिश्चन धर्माविषयी आमच्या मनात मुळीच राग अथवा द्वेष नाही; पण आज सर्वत्र ख्रिश्चनिटीचा जो अतिरेक सुरू आहे, इतर धर्मांना कमी लेखून त्यांच्यावर कुरघोडी करायचा जो प्रयत्न सुरू आहे, हे सर्व पाहून आम्हाला स्वस्थ बसवत नाही.
हिंदूधर्माचा द्वेष करणे अथवा हिंदूधर्मानुयायांना मागासलेले अथवा बुरसटलेले समजणे, त्यांच्या संस्कारांना नाके मुरडणे, त्यांच्या चालीरीतीवर मागचा पुढचा विचार न करता अयोग्यतेचे शिक्कामोर्तब करणे, यात ख्रिश्चन धर्मगुरूंनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मुळात जरा विचार केला तर ‘हिंदू’ या शब्दासमोर धर्म ही संज्ञा लावताच येत नाही. ‘हिंदू’ हा धर्म नसून ती एक विशुध्
द जीवनप्रणाली आहे, असा निर्वाळा मनोहरपंत जोशीविरुध्दच्या एका खटल्यात प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टाने दिला आहे. हिंदू धर्माचे संस्थापक म्हणून कोणाचेच
नाव सांगता येत नाही; पण
या जीवनप्रणालीचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेणारांची नामावली वाचता वाचवणार नाही, एवढी लांब आहे. इस्लाम धर्माचा संस्थापक म्हणून महम्मद पैगंबराचे नाव सांगितले जाते. बुध्द धम्माची स्थापना राजकुमार सिध्दार्थ यांनी केली व ते गौतमबुध्द म्हणून ख्यातीप्राप्त करता झाला. जैन धर्माची संस्थापना भगवान महावीरांनी केली. ख्रिश्चन धर्म येशू ख्रिस्तांनी स्थापन केला.
हिंदू धर्म अमुक एका राजाने, ऋषीने, मुनीने, तत्त्ववेत्त्याने स्थापन केला, असे कुठेच म्हटलेले नाही. हिंदू धर्माचे जे आधारभूत ठांथ आहेत त्यांना ‘वेद’ म्हणतात. या वेदांना ‘अपौरूष्येय’ म्हटले जाते. म्हणजे या वेदांची रचना कुण्या माणसानी केली, हे मान्य करण्यात आलेले नाही. ध्यानावस्थेत ऋषींना, मुनींना, तत्त्वचिंतकांना ज्या दिव्य, अनुभूती आल्यात त्या त्यांनी जशाच्या तशा ठांथित केल्यात. अशा दिव्यानुभूतीचे संकलन म्हणजेच वेद होते. वेदासारखे दिव्य तत्त्वज्ञान प्रतिपादित करणारे दिव्य ठांथ अन्य कोणत्याच धर्मात नाहीत. मात्र, वेदात जे आहे ते सर्वच धर्माच्या धर्मठांथात आहे, यात शंका नाही. हिंदू जीवनप्रणालीत अनेकातून एकत्व साध्य करण्यात आले आहे. ज्याला जे आवडते ते त्याला निवडता यावे व आपल्या आवडीनुसार जीवन जगता यावे, या जीवनाला सफलतेची जोड देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न प्रत्येकाने केला आहे. यात असलेले विविध संप्रदाय समांतर रेषांसारखे आहेत. ते कधीच एकमेकांना छेदायचा विचार करीत नाहीत. परमतत्त्व परमेश्वराप्रत पोहोचण्याचे ते राजमार्ग आहेत.
हिंदूचा कोणताच संप्रदाय अथवा पंथ भोगाचे समर्थन करीत नाही. बहुतेक सर्वांचा त्यावरच भर
हे. चार्वाकाचा अपवाद म्हणायला आहे; पण कर्ज काढून तूप प्या, असा त्यांचा सल्ला बहुसंख्य हिंदूंनी झुगारला आहे. जन्मभूमीला जो देवतेचा आणि मातेचा मान देण्यात आला आहे त्याला जगात तोड नाही. ‘वंदे मातरम्’ हा आमच्या जीवनाला आजही स्फूर्ती देणारा महामंत्र आहे. सर्व देवदेवतांची विविध रूपे हिंदूंनी कल्पिलेली असली तरी या सर्वांच्या ठायी एकच परमतत्त्व, परमेश्वरीतत्त्व आहे हे निक्षून सांगण्यात आले आहे. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा हिंदू जीवनप्रणालीचा गाभा आहे. भोगावर भर देण्यापेक्षा त्यागाची कास धरायचा सल्ला ही जीवनप्रणाली देत आली आहे.
आज मात्र या संस्कृतीच्या मुळावरच घाव घालायचा प्रयत्न करणे सुरू आहे. तसाही जगाचा विचार करता आज हिंदू अल्पसंख्याक झाला आहे, यात मुळीच शंकेला वाव नाही. हिंदू आता खऱ्या अर्थाने उरलाच नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आमची केशभूषा बदलली, आमची वेषभूषा बदलली, आमची राहणीमान पध्दती बदलली, कमाईचा काही भाग भविष्यासाठी राखून ठेवावा, आपले भविष्य सुरक्षित राखावे.
‘जोंधळे सरू देऊ नका। लेकरं बाकरं उपाशी मरू देऊ नका।।’
किती साध्या शब्दात भविष्याच्या सुरक्षिततेचा संदेश दिलेला आहे. ही होती आमच्या पगडी घालणाऱ्या वाडवडिलांची शिकवण. पगडी गेली, टोपी आली आणि आज तर टोपीसुध्दा इतिहासजमा झाली आहे. साऱ्या बावळट बोडख्यांचा कारभार सुरू आहे. हे सुटाबुटातले बोडखे भविष्याची मुळीच चिंता करीत नाहीत. बहुराष्ट्रीय कंपन्या या देशात तकलादू माल ओतत आहेत. आमचे घरदार सोडलेले, मुलांना आजी-आजोबांपासून वंचित करणारे डॅडी आणि मम्मी होण्यात भूषण मानणारे आंग्लाळलेले लोक कर्ज काढून सुलभ हप्त्याने हा माल घरात आणत आहेत. कर्जबाजारी होणे हे दूषण मानले जायचे. तेच आज भूषण मानण्यात येऊ लागले आहे. शिल्लक राहायची त्याची गुंतवणूक आमची जुनी जाणती पूर्वज माणसं सोन्
ात करायची, जमिनी खरेदी करण्यात, घर बांधण्यात करायची. यासाठी ते जे सामठाी वापरीत त्यातसुध्दा त्यांची भविष्यविषयक दृष्टी दिसून येते. लाकडाचा वापर, मातीचा वापर, कौलांचा वापर, दगडांचा वापर यासाठी केला जायचा. आज पिढ्यान्पिढ्या वापरात आलेली घरं जेव्हा मोडतात तेव्हा त्यामधील दगडमाती, लाकूडफाटा लक्षावधी रूपये देऊन जातो. उद्या हे फ्लॅटरूपी खुराडे जेव्हा मोडले जातील
तेव्हा हाती धतुरासुध्दा लागणार नाही.
‘चादर पाहा आणि हातपाय
पसरा’
हे आमच्या पूर्वजांनी शिकवलेले तत्त्वज्ञान आजची पिढी विसरत चालली आहे. स्वत:च्या मिळकतीचा विचार न करता आपल्या गरजा भरमसाठ वाढविण्यात आणि विशेषत: शेजाऱ्यावर कुरघोडी करण्यात त्यांना धन्यता वाटत आहे. त्यांच्या या अहंकाराला खतपाणी घालण्याचे काम जाहिराती करीत आहेत. ‘ऱ्ाग्ुप्ंदल्ी’े ाहन्ब् ध्ैही’े झ्ीग््ा’ अशा खुळ्या समजुतींनी बहुराष्ट्रीय कंपन्या आमची टाळकी भारून टाकत आहेत. निंबाच्या आणि बाभळीच्या काडीसारखे दंतमंजन आणि ब्रश नाही. टू इन वन असा हा दिव्य प्रयोग आहे; पण भ्रामक सुरक्षा चक्राच्या आहारी जाऊन आम्ही दंतक्षय करणाऱ्या रसायनाचा प्रयोग स्वत:वर करीत आहोत. दाताने अक्रोड फोडणारे आमचे पूर्वज कोणती टुथपेस्ट आणि कोणता टूथब्रश वापरत होते? याचा कुणी विचारच करायला तयार नाही. ‘अग्हप्, *र्ीू र्ीह् ँा शीीब्’ हे आंग्लाळलेले तत्त्वज्ञान आमच्या गळी उतरवले तरच आपल्या टाकावू मालाचा उठाव या खंडप्राय देशात करता येईल. यासाठी त्यांनी प्रत्यक्ष पोपला हाताशी धरले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या व्हॅटकिनला, भला मोठा निधी पाठवत असतात. कशासाठी हा निधी पाठवला जातो? व्यापारी कधीच कुणाला काही फुकटात देत नसतो. ‘आवळा देऊन कोहळा’ काढणारी ही जात आहे. पोप यांना आईबापांना वृध्दाश्रमात नेऊन टाकणारी, कर्ज काढून चैनीची साधनं विकत घेणारी, कर्जात स्व
:ला बुडवून घेणारी पिढी निर्माण करायची आहे. हा डाव साधण्यात ते यशस्वी झाले आहेत. आमची शिक्षण पध्दती बदलली. मॉन्टेसरी ते कॉलेज सर्वच आंग्लपध्दती, आमची केशभूषा बदलली, शकुंतला वेणी गेली बॉबकटचे प्राबल्य वाढले, आमची वेशभूषा बदलली, धोतर, शर्ट, पगडी, टोपी गेली, पॅण्ट, मनिला, कोट, सफारी थैमान घालत आहे. खाण्यापिण्याची सवय बदलली, घरी बनवलेले ताजे रूचकर पदार्थ आवडत नाहीत. जाहिरातीमधले इन्स्टंट विकत मिळणारे अन्न आवडीने खाऊन आम्ही आजार विकत घेत आहोत. डॉक्टरचे बिल भरायसाठी पगाराचा ठरावीक हिस्सा आज नोकरदार मंडळीला राखून ठेवावा लागत आहे. आजीआजोबा नावाची नातवंडावर संस्कार करणारी संस्था आम्ही मोडीत काढली. इंठाज जसे वृध्द आईवडिलांना वृध्दाश्रमात पाठवतात तसेच आम्ही करू लागलो आहोत, असे करणे भूषण मानू लागलो आहोत. वर्षप्रतिपदेचा दिवस साजरा करावा, असे कोणाच्याच मनाला वाटत नाही. मात्र, 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी सर्वच जण जीवाचा आटापिटा करताना दिसतात. कहर म्हणजे या दिवशी रात्रभर सर्वच दारूची दुकाने आणि बार उघडे होते. मद्याचा अक्षरश: महापूर वाहिला. विशेष म्हणजे याला आमच्या शासनाचीही परवानगी आहे. तसा विशेष शासकीय आदेशच आहे. एकंदरीत म्हणजे फक्त बप्तिस्माच घ्यायचा बाकी आहे. आम्ही सर्व अर्धे ख्रिश्चन झालोच आहोत. वेळीच सावधानता बाळगली नाही तर हिंदू जीवनप्रणालीप्रमाणे जीवन जगणारी माणसं वीस वर्षानंतर औषधाला सुध्दा सापडणार नाहीत, हे निश्चित. भलेही वृध्दाश्रमांना ‘मातोश्री’ असे भारतीय नाव द्या; पण या कृतीने आमच्या आंग्लाळलेपणावर शिक्कामोर्तब झाले आहे, यात मुळीच शंका नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply