प्रकाशन दिनांक :- 13/07/2003
आधुनिक काळात जगाची विभागणी प्रामुख्याने तीन गटात केली जाते. विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसित राष्ट्रांची संख्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य असली तरी संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या या मुठभर राष्ट्रांचेच वर्चस्व आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही. एखाद्या राष्ट्राच्या बाबतीत विकसित हा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा प्रामुख्याने त्याचा संबंध आर्थिक सुबत्तेशी जोडलेला असतो आणि त्या राष्ट्रातील दरडोई उत्पन्न हा त्याचा निकष असतो. परंतु आर्थिक सुबत्ता ही संकल्पना केवळ श्रीमंती एवढ्याच अर्थापुरती मर्यादित नाही. ही खूप व्यापक संकल्पना आहे. एखादे राष्ट्र आर्थिक दृष्टीने समृद्ध असते म्हणजे केवळ त्या राष्ट्रातील नागरिकांचे भौतिक जीवन समृद्ध असते, असे नाही. ही आर्थिक समृद्धी इतर क्षेत्रातूनही डोकावत असते. त्या राष्ट्रातील नागरिकांची जीवनशैली, त्यांची वैचारिक पातळी, त्यांची संस्कृती कळत नकळतपणे इतर अविकसित अथवा विकसनशील राष्ट्रांवर प्रभाव टाकत असते. अर्थात त्या विकासाला विकास म्हणावे की नाही हा वादाचा मुद्दा असला तरी, इतर राष्ट्रांना आपल्यामागे फरफटत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते, हे तथ्य नाकारण्यात अर्थ नाही.
अमेरिकेची गणना अशा समृद्ध राष्ट्रांच्या यादीत अठाक्रमाने केली जाते. केवळ दरडोई उत्पन्न हा एकच निकष वापरला तर अमेरिकेच्यावर स्थान पटकावणारी अनेक राष्ट्र असतीलही, परंतु समृद्धीचा सर्वांगाने विचार केला तर अमेरिका निश्चितच अठास्थानी आहे. जागतिक राजकारणावर अमेरिकेचा खूप मोठा प्रभाव आहे. रशिया, जर्मनी, प्र*ान्स, चीन यासारखी इतर बडी राष्ट्रेसुद्धा अमेरिकेला डिवचण्याची हिंमत करीत नाहीत. इराक युद्धाच्या निमित्ताने हे स्पष्टच झाले आहे. युरो, पाऊंडच्या जब
आव्हानाला तोंड देत अमेरिकन डॉलरने आंतरराष्ट्रीय व्यापारातले आपले स्थान अबाधित राखलेच आहे. अमेरिकन जीवनशैली समृध्द सांस्कृतिक वारसा लाभलेल्या देशातील नागरिकांना सुध्दा जिथे भुरळ पाडीत आहे तिथे इतर
राष्ट्रांची काय बात! थोडक्यात आज
अमेरिका खऱ्या अर्थाने समृध्द आणि विकसित राष्ट्र आहे.
आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा प्रणेता, छुप्या साम्राज्यवादाचा उघड पुरस्कर्ता, आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी वैध-अवैध सर्वच मार्गांचा बिनदिक्कत वापर करणारा देश ही अमेरिकेची खरी ओळख असली तरी अमेरिकन राज्यकर्त्यांनी हे धोरण हेतुपुरस्सर स्वीकारले आहे. एखाद्या राष्ट्राने कोणते धोरण स्वीकारावे, हा त्या राष्ट्राचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही एक शांततावादाचा मार्ग पत्करला (आणि त्याची रक्तरंजीत किंमतही मोजतो आहोत) म्हणून साऱ्या जगाने शांततावादीच असावे, असा आठाह आपल्याला धरता येणार नाही. मानवी उदात्ततेच्या, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आमचा मार्ग श्रेष्ठ असेलही, परंतु या मार्गावरून गेली पन्नास वर्षे प्रवास केल्यानंतरदेखील आम्ही विकसनशीलच राहिलो असू तर कुठेतरी थांबून विचार करायची वेळ नक्कीच आली आहे. शेवटी श्रेष्ठ विचार, उदात्त ध्येय वगैरे गोष्टी भुकेचा प्रश्न सोडवू शकत नाहीत, सुरक्षितता प्रदान करू शकत नाहीत, हे मान्यच करावे लागेल. ज्याच्या हाती तलवार आहे तोच सगळ्या संकटांवर मात करू शकतो आणि तलवार केवळ सामर्थ्यवानाच्याच हाती असते, हे विसरता येणार नाही. आज अमेरिकेच्या हातात तलवार आहे. हाती तलवार आहे म्हणून अमेरिका सामर्थ्यवान आहे असे नाही तर ती सामर्थ्यवान आधी झाली म्हणून तिला तलवार हाती घेण्याचा अधिकार प्राप्त झाला, असेच म्हणता येईल. शेवटी प्रश्न हा उपस्थित होतो की, अमेरिका सामर्थ्यवान होऊ शकते तर आम्ही का नाही?
या प्रश्नाच्या उत्तराचा वे
ध घेतला तर एक कारण स्पष्टपणे दृग्गोचर होते आणि ते म्हणजे राष्ट्राप्रती असलेली नागरिकांची बांधीलकी. अमेरिकन माणूस आधी अमेरिकन असतो आणि नंतर बाकी सगळं. आमच्या इथे हा प्रवास उलट आहे. आम्ही आधी आमच्या जातीचे (खरे तर त्यातल्याही पोटजातीचे) असतो, मग समाजाचे, पुढे धर्माचे आणि शेवटी कुठेतरी देशाचे असतो. त्यातही प्रांतवाद, संस्कृती, चालीरिती आदी विविध तुकड्यात आमच्या निष्ठा विभागलेल्या असतात. या निष्ठांच्या पसाऱ्यात देश ही संकल्पनाच कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. दहशतवाद, भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, आर्थिक विषमता आदी समस्यांच्या महापूरात आपल्या देशाचा विकास कुठल्या कुठे वाहून गेला आहे. या विविध समस्यांच्या मुळाशी आहे ती आपल्या देशातील नागरिकांची दिवसेंदिवस वाढत जाणारी आत्मकेंद्रित वृत्ती. राजकारणी, समाजकारणी किंवा सामान्य लोकांच्या सर्वच स्तरात ही वृत्ती बोकाळली आहे. आपल्या स्वार्थासाठी एखादी समस्या वर्षोनवर्षे चिघळत ठेवणारे राजकारणी असो, आपल्या तुंबड्या भरण्यासाठी अनेक कल्याणकारी योजनांची वाट लावणारे नोकरशहा असो किंवा एखाद्या बाबूला पाच – पन्नास देऊन आपले काम साधून घेणारा सामान्य माणूस असो, अगदी प्रत्येकाने (गव्हातल्या खड्यासारख्यांचा अपवाद वगळता) अंततोगत्वा देशाच्या विकासाला खीळच घालण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेतही भ्रष्टाचार आहे. वर्णभेदाची समस्या आहे. अश्लिलता, अनैतिकतेचे तर अमेरिका माहेरघरच आहे, परंतु तरीही अमेरिका विकसित ,समृध्द राष्ट्र आहे कारण तिथल्या समस्यांच्या पातळीने राष्ट्राच्या विकासाला बाधा आणणारी उंची कधी गाठली नाही. अमेरिकेत सर्वत्र आढळणारी सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, टापटीप, निटनेटकेपणा, विशेष मेहनत करून जोपासलेले सृष्टीसौंदर्य अमेरिकन आणि भारतीय नागरिकांच्या वृत्तीतील फरक जाणवून देते. आपल्य
ाकडे घराबाहेरचे जग म्हणजे उकीरडाच समजले जाते. ‘येथे थुंकू नये’, अशी पाटी कुठे लागली असेल तर त्या पाटीखालची जागा हमखासपणे पिचकाऱ्यांनी रंगलेली दिसेल. नियम किंवा कायदे तोडणे आपल्याकडे फॅशन झाली आहे आणि नियम मोडल्यानंतर किती ‘वरून’ फोन येतात यावर आपला दर्जा ठरत असतो. सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्ता ही तर तोडण्या-फोडण्यासाठी, नासधुस करण्यासाठीच असते, यावर आपली ठाम श्रध्दा आहे. या सगळ्या केवळ वाईट सवयी नाहीत तर आपल्या अंगात मुरलेल्या बेदरकारपणाचा, बेमुर्वतपणाचा किंवा ‘मला काय त्याचे’ या वृत्तीचा तो सहज परिपाक आहे. आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या देशाचे, पर्यायाने आपलेच नुकसान होत आहे,
ही जाणीवच आपल्याकडे नाही. मोठमोठ्या प्रकल्पांचे काम कित्येक वर्षे रेंगाळत
ठेवले जाते ते केवळ अधिकाधिक मलिदा लाटण्याच्या उद्देशानेच. यामध्ये ज्या पैशाचा अपव्यय होतो तो पैसा शेवटी असतो कुणाचा? सरकारचा. म्हणजे देशाचाच! याचाच अर्थ आपणच आपल्या देशाला लूटत असतो. विकासाची हिरवीगार स्वप्ने एकीकडे पाहायची, दाखवायची आणि दुसरीकडे कुंपणांनाच शेत खाण्याची मुभा द्यायची. आपण सातत्याने ‘विकसनशील’ अवस्थेतच राहण्याचे दुसरे रहस्य कोणते?
तात्पर्य एवढेच की राष्ट्राच्या संदर्भात समृध्दता किंवा सामर्थ्य ही एका रात्रीतून आणि एखाद – दुसऱ्याच्या प्रयत्नातून साध्य होणारी बाब नाही. राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे योगदान त्यासाठी आवश्यक आहे. राष्ट्राप्रती समर्पित वृत्ती आणि त्या समर्पित वृत्तीला योग्य दिशा देणारे नेतृत्व असेल तर समृध्दता आणि सामर्थ्य कोणत्याही राष्ट्राच्या चरणाशी लोळण घेईल. भारताला तर विपुल नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. सोबतीला अफाट मनुष्यबळही आहे. प्रतिभावंतांची इथे कमतरता नाही, ज्ञानीयांची तर मांदियाळी आहे, तरीपण आपण विकसनशीलच आहोत कारण आपल्याकड
वानवा आहे ती राष्ट्र उभे करण्यासाठी लागणाऱ्या देशभक्तीच्या व्यापक दृष्टिकोनाची. हा दृष्टिकोन आपल्या राजकारण्यांकडे तर नाहीच आणि दुर्दैवाने सामान्य नागरिकात सुध्दा तो अभावानेच आढळतो. हा देश माझा आहे, इथेच थांबून चालणार नाही. सोबतीला मी या देशाचा आहे ही भावनासुध्दा वाढीस लागायला हवी.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply