प्रकाशन दिनांक :- 22/06/2003
गरीब लोक राहत असलेला श्रीमंत देश, ही पाश्चात्य देशात आपली एकेकाळी ओळख होती. परिस्थितीत आज फार फरक पडला आहे असे नाही आणि फरक पडलाच असेल तर तो तपशिलात पडला आहे. या श्रीमंत देशाची श्रीमंती काही मोजक्या शहरी भागातून आज ऊतू जात आहे, तर या श्रीमंत देशातील बहुसंख्य गरीब आजही ठाामीण भागातून आपल्या फाटक्या श्रीमंतीतच (?) वावरत आहेत. स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. या देशातील गरिबी-दारिद्र्यासाठी गोऱ्या राज्यकर्त्यांना जबाबदार धरल्या जाऊ शकत होते, परंतु स्वातंत्र्याच्या पंच्चावन्न वर्षानंतरही कमी अधिक प्रमाणात (अधिकच) गरिबी, दारिद्र्य कायमच असेल तर दोष कोणाला द्यावा? दुर्दैवी असली तरी ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतर देखील आपल्या देशातील ठाामीण भागात राहणारी बहुसंख्य जनता आजही अगदी प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. पंचवार्षिक आणि पंचतारांकित विकासाची स्वप्ने रंगविणाऱ्या शासनकर्त्यांनी ठाामीण भागातील जनतेला नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली. शहरी भागाचा विकास म्हणजेच देशाचा विकास असा सरळसोट हिशोब त्यांनी मांडला. भारताच्या विकासाचा मार्ग खेड्यातून जातो, हे गांधीजींचे मत त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना कधीच महत्त्वाचे वाटले नाही. राज्यकर्ते कोणीही असले तरी विकासाची गाडी शहराच्या हमरस्त्यावरून खेडातील कच्च्या, खाच-खळग्यांनी भरलेल्या रस्त्यावर कधीच उतरली नाही. शहरातील पक्क्या डांबरी सडका उखडून त्यांचे काँक्रिटीकरण केले जाते, परंतु खेड्यातील रस्त्यांवर कधी साधा मुरूम टाकल्या जात नाही. शहरात जागोजागी टोलेजंग इमारती उभारल्या जातात, मोठमोठे कॉम्प्लेक्स बांधल्या जातात, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात परंतु ठाामीण भागातील झोपड्यांचे
शीब आजही गळणारे छत आणि खचणाऱ्या भिंतीपलीकडे सरकत नाही. शहरातील रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत करण्याची भाषा बोलणाऱ्या राज्यकर्त्यांना ठाामीण भागातील पावसाळ्यात आपले अस्तित्वच हरवणाऱ्या रस्त्यांबद्दल थोडीही ममता वाटत नाही. थोडक्यात विकासाचा जो काही महापूर
आपल्या देशात आल्यासारखा दिसतो
तो केवळ मुठभर शहरापूरताच. ठाामीण भागात राहणाऱ्या 80 टक्के जनतेला आजही साध्या साध्या गोष्टीसाठी तरसावे लागते.
विकासाचा हा असमतोल निर्माण होण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. एक तर विकास कामाचे नीती निर्धारण करणारे राज्यकर्ते आणि नोकरशहा यांची संकुचित दृष्टी आणि दुसरे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे ठाामीण भागातील विकासाच्या समस्यांकडे, तेथील जनतेच्या मूलभूत समस्यांकडे जवळपास दुलर्क्ष करणारे प्रसार माध्यम, विशेषत: इलेक्ट्राॅनिक्स मिडिया. दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रे यांना आज जगाकडे पाहण्याच्या खिडक्या समजले जाते. या खिडक्यातून जे दिसते केवळ त्याचीच दखल घेतल्या जाते किंवा असेही म्हणता येईल की, या खिडक्या जे दाखवितात (!) तेच पाहिल्या जाते. पूर्वी वर्तमानपत्रात वस्तुस्थितीचे प्रतिबिंब दिसत असे. परंतु अलीकडील काळात वर्तमानपत्रांनी, इलेक्ट्राॅनिक्स मिडियाने सत्ताधाऱ्यांची भाटगिरी सुरू केली आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचे मूलभूत स्वातंत्र्यदेखील विकल्या गेले. आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ही प्रसारमाध्यमे सत्ताधाऱ्यांची मर्जी राखू लागले. वर्तमानपत्रातून आणि छोट्या पडद्यावरून वस्तुस्थितीचे भ्रामक चित्रण होऊ लागले. जनतेच्या आणि विशेषत: ठाामीण भागातील जनतेच्या समस्यांना लोकशाहीतील या मजबूत स्तंभाने जवळपास दुलर्क्षित केले. आर्थिक विवंचनेपायी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मिनिटाचाही वेळ न देणाऱ्य
स्वत:ला ‘सबसे तेज’ म्हणविणाऱ्या वाहिनीला कुठल्या तरी मॉडेलच्या एका हॉटेलची खिडकी डोक्यावर पडून झालेल्या मृत्यूसाठी ‘टूटना एक शिशेका’ म्हणत वृत्तमालिका देताना पाहून मन विषण्ण होते. इथे विदर्भ – मराठवाड्यातील अख्खी शेतकरी जमात मोडून पडण्याच्या स्थितीत आली असताना साधी दखलही घेतली जात नाही. प्रसारमाध्यमांनी बेजबाबदार आणि मुर्दाड असावे तरी किती? मागे माजी केंद्रीयमंत्री नटवरसिंगाच्या सुनेची आत्महत्या अशीच आठ दिवस पुरली होती. जनतेच्या समस्यांना वाचा फोडावी, शासनाचे त्या समस्यांकडे दुलर्क्ष होत असेल तर शासनाला धारेवर धरून जनजागृती करावी हेच प्रसारमाध्यमांचे प्रमुख कार्य आणि ध्येय असायला पाहिजे नव्हे तेच असते. परंतु लाचारी आणि मिंधेपणामुळे प्रसारमाध्यमांनी आपले सत्त्व गमाविले आहे. सत्ताधाऱ्यांचे गोडवे गावून आपला स्वार्थ साधण्यापुरतेच त्यांचे ध्येय मर्यादित झाले आहे. पूर्वीच्या काळी राजे – महाराजे आपल्या पदरी भाट – चारण – हुजरे बाळगत. राजांच्या असल्या – नसल्या गुणांचा गौरव करीत आपले पोट भरण्याचा या मंडळींचा उद्योग असे. आधुनिक काळात या भाट – चारणांची जागा प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी वृत्तपत्रांच्या मालक – संपादकांना भोजन बैठकीसाठी आमंत्रित केले होते. हे पहिल्यांदाच घडत होते. वास्तविक अशा बैठकी नियमित होणे गरजेचे असते. परंतु तसे होत नाही आणि याचे स्पष्टीकरण देतांना विलासराव म्हणाले होते की, आम्हाला तुम्हा मालक – संपादकांपेक्षा तुमचा मंत्रालयातील प्रतिनिधी अधिक महत्त्वाचा वाटतो. तो खुश असला म्हणजे झालं. तुम्ही लोकं नाराज झाले तरी काय करणार, एखादा सणसणीत अठालेख लिहिणार. कोण वाचतो तुमचा अठालेख? विलासरावांचे म्हणणे खरेच होते आणि त्यातून प्रगट होणारी राज्यकर्त्यांची मानसिकतादेखील. दि
ल्ली, मुंबई, पुणे सारख्या महानगरात किंवा मंत्रालयात वावरणारे पत्रकारच अधिक महत्त्वाचे. कारण त्यांच्या लेखणीतूनच सरकारची प्रतिमा घडत किंवा बिघडत असते. त्यांच्या डोळ्यांना दिसतात त्याच खऱ्या (?) समस्या असतात आणि या पत्रकारांकडे ठाामीण भागातील मूलभूत समस्यांचा वेध घेणारी दृष्टी अभावानाचे आढळते. त्यांच्या दृष्टीने माणसं केवळ शहरातच राहतात, समस्या केवळ शहरी भागातच असतात, शहरांचा विकास हाच खरा देशाचा विकास. या पत्रकारांच्या चष्म्यातून पाहणाऱ्या शासनालाही अर्थातच वेगळे काही दिसणे शक्य नाही. त्यामुळे शहरी आणि ठाामीण विकासातील दरी दिवसेंदिवस अधिकच रुंदावत आहे. ही दरी केवळ विकासाच्या संदर्भातच नव्हे तर भावनिकदृष्ट्या देखील अधिक खोल होत आहे. एका नटव्या मॉडेलचा अपघाती मृत्यू खळबळ उडवून देणारा ठरतो आणि 175 शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येची साधी
दखलही घेतल्या जात नाही, हे उदाहरण त्यासाठी पुरेसे बोलके ठरावे.
ठाामीण
आणि शहरी भागातील ही दरी शासनातर्फे बुजवली जाणार नाही. ही दरी बुजविण्यासाठी ठाामीण भागातील जनतेलाच पुढाकार घ्यावा लागेल. शेतकऱ्यांच्या हक्काचे कापूस चुकारे तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पैसा नसल्याची ओरड करीत टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने नुकत्याच विधानभवनातील सगळ्या जुन्या लिफ्ट बदलून नव्या वेगवान लिफ्ट बसविल्या. ही उधळपट्टी करण्यासाठी कुठून पैसा आला? लिफ्ट वेगवान करण्याने सरकारच्या कामाच्या गतीत आणि दिशेत फरक पडणार नाही. नावडती ठाामीण जनता नावडतीच राहणार. निवडणुका जवळ येत आहेत. या नावडत्या जनतेला एक चांगली संधी मिळत आहे. या नावडत्या जनतेने नावडत्या सरकारला ‘लिफ्ट’ करून ठाामीण भागातही माणसं राहतात, त्यांच्याही समस्या असतात, जगण्याचा त्यांनाही अधिकार आहे, हे एकवेळ दाखवूनच द्यावे. तेव्हाच कु
े राज्यकर्त्यांचे आणि त्यांचे गोडवे गाणाऱ्या मिडियाचे डोळे उघडतील.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply