नवीन लेखन...

औषध कंपन्यांचे सरकारी छत्र!




अलीकडील काळात भारतात नव्या नव्या रोगांनी घातलेले थैमान आणि त्या अनुषंगाने औषध निर्मिती कंपन्यांचा वाढलेला बाजार यात कुठेतरी समान काळा धागा गुंतलेला असावा, अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे. भारतात ज्या कंपन्यांची औषधे प्रामुख्याने वापरली जातात त्यापैकी बहुतांश कंपन्या अमेरिकेच्या आहेत. या कंपन्यांची भारतातील एकूण वार्षिक उलाढाल जवळपास 25 हजार कोटींची आहे आणि दिवसेंदिवस ही उलाढाल वाढतच जात आहे. आपली उलाढाल वाढविण्यासाठी या कंपन्या अनेक क्लृप्त्यांचा वापर करीत असतात. बड्या डॉक्टरांना महागड्या भेटी देण्यापासून ते थेट प्रशासनातील, सरकारातील उच्चपदस्थांना आपल्या जाळ्यात अडकविण्यापर्यंत या कंपन्यांची मजल गेली आहे. बरेचदा तर औषध आधी तयार होते आणि रोग नंतर उद्भवतात असाही प्रकार पाहावयास मिळतो. त्यामुळे एखाद्या नव्या रगाची साथ आली की संबंधित कंपनीचे उखळ पांढरे होते. त्या औषधांचे पेटंट आधीपासूनच संबंधित कंपनीकडे असल्यामुळे स्पर्धेचा वगैरे प्रकार नसतो. औषधामधील घटकांना, त्या औषधामुळे शरीरावर होणाऱ्या इतर परिणामांना आव्हान देण्याचाही प्रश्न उपस्थित होत नाही. सगळी नाकेबंदी आधीच झालेली असते. यात खेदाची बाब ही आहे की या सगळ्या व्यवहारात सरकारी यंत्रणा संबंधित कंपनीच्या दावणीला बांधल्या गेलेली असते. वास्तविक आरोग्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका खुली आणि पारदर्शी असायला हवी. सर्वसामान्य लोकांना एखाद्या औषध कंपनीच्या तोंडी देण्यापूर्वी सरकारने त्या औषध कंपनीच्या हेतूंची शहानिशा करणे गरजेचे असते. परंतु हे अभावानेच होत असते. केवळ भारताच्या भरोशावर या कंपन्या कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक औषध बाजारात करीत असतात. ही गुंतवणूक त्यावरील प्रचंड नफ्यासह वसूल करताना कोणत्याही अवैध मार्गाचा वापर होत नसेल असे

म्हणणे धाडसाचेच ठरेल. या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेला खूप महत्त्व प्राप्त होते. आपल्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार कोणते प्रयत्न करत आहे आणि जे काही

प्रयत्न ते करत आहे ते योग्य

दिशेने आहेत का, हे तपासून पाहणे गरजेचे ठरते. आज भारतात बहुतेक सगळ्या आजारांवर अॅलोपॅथीची औषधे वापरली जातात. सरकारी दवाखान्यातूनही केवळ अॅलोपॅथीद्वारेच उपचार करण्यात येतो. अॅलोपॅथी या एकमेव चिकित्सा पद्धतीला सरकारची मोठ्या प्रमाणात मदत मिळत असते. सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडणारे सगळे डॉक्टर्स अॅलोपॅथीचेच शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात. भारतीय लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी सरकारने अॅलोपॅथीला वाहिलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची खिरापतच वाटली आहे. अॅलोपॅथीच्या या माऱ्यात भारतातील इतर परंपरागत चिकित्सा पद्धती जवळपास मोडीत निघाल्यात जमा आहेत. आयुर्वेद, निसर्गोपचार, योगोपचार, युनानी या चिकित्सा पद्धतींना कुणी वाली उरलेला नाही. कदाचित देशी असल्यामुळे या उपचार पद्धतींना सरकार स्तरावर प्रोत्साहन मिळत नसावे. याच उपचार पद्धती युरापीय देशातून आल्या असत्या तर कदाचित भारतात त्यांना चांगले ‘मार्केट’ मिळाले असते. पश्चिमेकडून आलेले तेवढे चांगले, दर्जेदार, अस्सल या मानसिकतेतून आपण आणि अर्थातच आपले सरकारही बाहेर पडायला अजिबात तयार नाही. आपल्या याच मानसिकतेचा फायदा युरोपीय कंपन्या उचलत आल्या आहेत. ‘मेड इन युरोप’चा शिक्का असला की भारतात कचऱ्यालासुद्धा सोन्याचा भाव मिळतो, हे या कंपन्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. वास्तविक आरोग्यशास्त्राचा सर्वांगीण विचार जितका भारतीय उपचार पद्धतीत केल्या गेला आहे तितका तो जगातल्या इतर कोणत्याही उपचार पद्धतीत केल्या गेलेला नाही. युरोपीय किवा अॅलोपॅथी उपचार पद्धती आणि भा
रतीय उपचार पद्धतींमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. अॅलोपॅथी पद्धतीत रोग तात्कालिक स्वरूपात बरा करण्यावर भर असतो. एखाद्याचे डोके दुखत असेल तर ते ताबडतोब थांबविण्याचे काम अॅलोपॅथी औषधे अतिशय जलदगतीने करतात. ही प्रणाली लोकप्रिय होण्यामागे हेच एक मोठे कारण आहे. परंतु भारतीय उपचार पद्धती थोड्या वेगळ्या दिशेने विचार करते. डोकेदुखी ताबडतोब थांबविण्यापेक्षा ती का आहे ? ते शाधून ती कायमची दूर करण्याचा प्रयत्न भारतीय उपचार पद्धतीत केला जातो. सगळ्याच आजारांच्या बाबतीत या दोन्ही उपचार पद्धतींमध्ये हा मूलभूत फरक असल्याचे आपल्याला दिसून येईल. आजार झटपट बरा करण्याच्या प्रयत्नात अॅलोपॅथी औषधांमध्ये एरवी मानवी शरीरासाठी घातक ठरू शकणाऱ्या रासायनिक घटकांचा मुत्त*पणे वापर केला जातो. त्याचाच परिणाम म्हणून अॅलोपॅथी औषधाचे ‘साईड इफेक्टस्’ मोठ्या प्रमाणात दिसून येतात. भारतीय उपचार पद्धतीमध्ये भलेही आजार बरा होण्यासाठी थोडा अधिक काळ लागत असेल परंतु तो कायमचा बरा होतो आणि कोणत्याही ‘साईड इफेक्टस्’चा सामना करावा लागत नाही. आजही असे अनेक आजार आहेत की ज्यावर अॅलोपॅथीमध्ये खात्रीशीर उपचार नाहीत किंवा जे आहेत ते केवळ प्रतिबंधात्मक स्वरूपाचे आहेत. लीव्हरशी संबंधीत आजार म्हणजेच काविळ किंवा मधूमेह तसेच रत्त*दाबाच्या गोळ्या एकवेळ सुरू झाल्या की त्या शेवटपर्यंत घ्याव्याच लागतात. या गोळ्यांमार्फत त्या विकारावर केवळ नियंत्रण ठेवले जाते, तो विकार शरीरातून नष्ट करण्याचे सामर्थ्य त्या गोळ्यांमध्ये नसते. अशा अनेक आजारांवर भारतीय उपचार पद्धतीत अगदी खात्रीशीर इलाज आहेत. केवळ योगाच्या व प्राणायामाच्या माध्यमातून अनेक विकारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. कॅन्सर, हृदयविकार, रत्त*दाब, मधुमेह यासारख्या एकवेळ आल्यावर आपल्या शरीरात कायमचे घर करणाऱ्या विकारांवर

ोगाच्या माध्यमातून सहज मात करता येते, हे आता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. भारतात अनेक लोकांनी योगाच्या माध्यमातून या चिवट विकारांपासून कायमची मुत्त*ी मिळवली आहे. केवळ भारतातच नव्हे तर इंग्लंड, अमेरिकेसह इतर युरोपीय देशात योगाचा जोमाने प्रचार आणि प्रसार सुरू आहे. कुठलीही आर्थिक झळ नाही, शरीरावर कुठलेही ‘साईड इफेक्टस्’ नाहीत, उलट शरीर अधिक तंदुरूस्त होते,भारतीय उपचार पद्धताचे हे वैशिष्ट्य आहे. योगा असो, निसर्गोपचार असो अथवा आयुर्वेद असो, या भारतीय चिकित्सा पद्धतीत शरीराच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार केला जातो. रोगाचे कारण मुळापासून

नाहीसे करून पुन्हा त्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची हम केवळ भारतीय

उपचार पद्धतीतच मिळते. आरोग्याच्या संदर्भात शरीर आणि मन यांचा अन्योन्य संबंध असतो. आरोग्यशास्त्र म्हणजेच शरीरमानसशास्त्र. परंतु भारतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणात ‘शरीरमानसशास्त्र’ हा विषयच समाविष्ट नाही. वास्तविक शरीरातील बिघाड म्हणजेच विकारांचा थेट संबंध मनाच्या आरोग्याशी असतो. केवळ गोळ्या घेऊन रत्त*दाबाचा विकार कधीच बरा होत नाही. आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा पैलू आधुनिक वैद्यकीय शास्त्रात किमान भारतात तरी योग्यप्रकारे हाताळला जात नाही. त्यामुळे एखादा आजार म्हटला की औषधांचा भडिमार एवढेच आपल्याला कळते. भारतीय उपचार पद्धतीत मात्र शरीरासोबतच मनाच्या आरोग्याचाही विचार केला जातो. उपचार केवळ शारीरिक नसतात. खरेतर शारीरिक उपचार ही दुय्यम बाजू आहे. कित्येक विकारांच्या बाबतीत मानसिक उपचारच प्रभावी ठरत असतात. या पार्श्वभूमीवर सरकारकडून भारतीय उपचार पद्धतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नाही. देशाच्या अर्थसंकल्पात आरोग्याशी संबंधित उपक्रमावर केलेल्य
तरतुदीपैकी जवळपास 97 टक्के निधी अॅलोपॅथी आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर खर्च केला जातो. सरकार पुरस्कृत आयुर्वेदाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा कुठेही नाहीत. एखादी खासगी संस्था किंवा कुणी वैयत्ति*क स्तरावर काही प्रयोग करीत असेल तर त्याला सरकारी मदत मिळत नाही. योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची व्यवस्था सरकारी पातळीवर कुठेही नाही. बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची दुकानदारी बंद करणारी पर्यायी आणि प्रभावी व्यवस्था आपल्याकडे असूनही सरकारचे प्रोत्साहन मिळत नाही. कदाचित 25 हजार कोटींच्या उलाढालीत सरकार आणि प्रशासनातील अनेकांचे हात ओले झाले असण्याची शक्यता आहे. या लोकांच्या मदतीनेच बहुराष्ट्रीय कंपन्या उपचाराच्या नावाखाली व सरकारच्या छत्रछायेत सामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळत कोट्यवधींची लूट करीत आल्या आहेत. परंतु या कंपन्यांची ही बनवेगिरी आता हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागली आहे. योगा आणि निसर्गोपचाराकडे आता लोकांचा कल वाढत आहे. परिवर्तनाची ही लाट अधिक गतिमान व्हायला हवी.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..