नवीन लेखन...

काल, आज आणि उद्या !





आंबेडकरी साहित्यासमोरील आव्हान!
परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे. संपूर्ण जग सतत बदलत असते. काही बदल सुक्ष्म आणि संथ असतात, तर काही बदल वेगवान आणि ठळकपणे दृष्टीपथास येणारे असतात. बदलाचा हा नियम मानवी मनालाही लागू आहे. माणसाचे विचारही सतत बदलत असतात, विचारांसोबतच अर्थात आवडनिवडही बदलत असते. बदलातील सातत्य हा भाग तर सगळ्यांनाच मान्य आहे, मतभेद जर काही असतील तर ते बदलाच्या पद्धतीबाबत किंवा दिशा वा गतीबाबत. आधुनिक विज्ञानवादी बदलाची दिशा एकतर्फी असल्याचे मानतात. त्यांच्या मते प्रगती ही नेहमी एकाच दिशेने होत असते, त्यामुळे कालच्यापेक्षा आजचा दिवस अधिक प्रगत असल्याचे ते सांगतात. ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी….’ हेच विज्ञानाचे सतत सांगणे असते. वरकरणी हे मत योग्य असल्याचे भासते, परंतु प्रगती ही एका सरळ रेषेत होणारी प्रक्रीया आहे का, हा प्रश्न वाद निर्माण करणारा आहे. प्रगती एका सरळ आणि निश्चित दिशेने झाली असती तर आजच्या तुलनेत हजार वर्षापूर्वीचा काळ अगदीच मागासलेला असायला हवा होता, परंतु इतिहास तसे सांगत नाही.हजारो वर्षापूर्वीची अनेक बांधकामे आजच्या आधुनिक अभियांत्रिकी ज्ञानालाही तोंडात बोटे घालायला लावणारी आहेत. त्याकाळची पाणीपुरवठा व्यवस्था आजच्या आधुनिक जल पुरवठा व्यवस्थेपेक्षा अधिक सक्षम असल्याचे दिसून येते. तसे नसते तर सरकारनेच शिवकालीन पाणी साठवण योजनेचा पाठपुरावा केला नसता. पदार्थ कणांपासून म्हणजेच अणूंपासून बनले असल्याचे सांगणाऱ्या कणाद ऋषींचा काळ तीन हजार वर्षापूर्वीचा आहे. त्याकाळी पदार्थ विज्ञानाचे संशोधन इतके प्रगत असेल तर प्रगती किंवा विकास एका सरळ रेषेत होतो, या मान्यतेला कुठेतरी नक्कीच धक्का पोहचतो. केरळमध्ये आजही प्रचलित आणि मान्यताप्राप्त असलेल्या कायाकल्प चिकित्सा पद्धतीला हजारो वर्षांची परंपरा आहे. आ
ल्या पूर्वजांची विज्ञान आणि इतर शाखांमधील गती प्रगतीच्या एकरेषीय सिद्धांताला तडा देणारी असल्याचे सिद्ध

करणारी अशी अनेक उदाहरणे देता

येतील. सांगायचे तात्पर्य प्रगती किंवा विकास ही एका रेषेत होणारी उर्ध्वगामी क्रिया नाही तर ती एक वर्तुळाकृती प्रक्रिया आहे. आज आपण स्थितीच्या किंवा प्रगतीच्या ज्या टप्प्यावर आहोत, त्या टप्प्यावर कधीकाळी आपले पूर्वज पोहचले होते, असे म्हणता येईल. जगातल्या सर्वच गतीमान क्रिया वर्तुळाकृतीच आहेत, मग ते अणूमधील इलेक्ट्रानचे केंद्राभोवती फिरणे असो अथवा ठाह, तारे, नक्षत्रांचे परिभ्रमण असो आणि जो नियम वस्तूमात्रांना ( प्रकृतीला) लागू आहे तोच विचारांना ( प्रवृत्तीला) लागू आहे. कालपर्यंत ज्या गोष्टी आपल्याला कालबाह्य वाटत होत्या त्याच कदाचित उद्या आपल्याला उपयुक्त वाटू लागतील. फॅशनच्या संदर्भात याची प्रचिती आपण घेतच आहोत. पूर्वी राजकपूरच्या जमान्यात ढगळ मात्र आखूड पॅन्टचे प्रस्थ होते. मध्यंतरीच्या काळात तंग (नॅरो) विजारीचे युग आले. नंतर ती फॅशन कालबाह्य ठरली आणि बलबॉटमचे युग आले, आता परत बॅगी पॅन्टचे आणि मुलींमध्ये तंग पॅन्टचे युग आले आहे. पूर्वी व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग होता. सुर्यनमस्काराला उपासनेचे महत्त्व होते. गावागावात आखाडे, कुस्तीचे हौद असायचे. ही व्यायामाची संस्कृती मधल्या काळात लोप पावल्यासारखी झाली होती. आता मात्र पुन्हा एकदा तरूणांमध्ये व्यायामाचे फॅड आले आहे. अर्थात आखाड्यांची जागा आता आधूनिक हेल्थ क्लब सेंटरनी घेतली आहे, एवढाच काय तो फरक! जुने पुन्हा सोने ठरत असल्याचे दिसत आहे, फक्त आधूनिक जीवनशैलीशी जुळवून घेताना या जुन्याच्या तपशिलात वरवरचे बदल होत आहेत, परंतु मुळ गाभा मात्र तोच कायम आहे. पूर्वी खेड्यापाड्यात भरणाऱ्या जत्रा खरेदीसोबतच लोकांना पर्यटनाचा आनंद देत अस
. या जत्रा आठवडा- आठवडा तर कधी महिनाभर चालणाऱ्या असत. आता लोकांना एवढा वेळ नाही. जीवन वेगवान झाले आहे, परंतु खरेदीची आणि खरेदीसोबतच पर्यटनाची आंतरिक ओढ कायम आहे. त्यातूनच पर्याय उभे झाले. मोठ्या शहरातील किंवा विदेशातील अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स लोकांना खरेदीसोबतच पर्यटनाचा आनंद देण्याइतपत आकर्षक पद्धतीने उभारण्यात आले आहे. विंडो शॉपिंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जत्रेतील आनंदाला आधूनिक मानवाने शोधलेला पर्याय आहे. आधुनिक माणूस शहरात सिमेंटच्या जंगलात राहतो, पण म्हणून त्याची निसर्गाची ओढ कमी झाली असे नाही. मनुष्याच्या चित्तवृत्ती निसर्गाच्या सान्निध्यातच फुलतात. निसर्गाच्या सहवासातच तो आनंदी राहू शकतो. शहरातील माणसाला निसर्गाची ही ओढ स्वस्थ बसू देत नाही. त्याच्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी दडलेले शेतीचे आकर्षण त्याला पुन्हा शेतीकडे वळवत आहे. वास्तव्याला शहरात असलेल्या अनेक धनिकांचे खेड्यावरील फार्म हाऊसेस, वाड्या, हरितगृहे हे त्यांच्या शेतीशी जुळलेल्या बांधिलकीचेच आधुनिक रूप म्हणायला हवे. खेडे सोडून शहरात स्थायिक झालेला आधुनिक माणूस पुन्हा एकदा या ना त्या प्रकारे शेतीकडे खेड्याकडे वळू लागला आहे. वर्तुळातल्या प्रवासाचे हे वैशिष्ट्यच असते, आपण जिथून निघतो तिथे पुन्हा कधीतरी पोहचतोच. खेड्यापासून दुरावल्यामुळे सडा, सारवण, पाणी भरणे या सारख्या कामातून होणारा व्यायाम स्त्तियांना मिळेनासा झाला, आधूनिकीकरणाने स्त्तियांच्या शारिरीक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला. परंपरागत जीवनशैलीतून आपोआप होणाऱ्या व्यायामाचे महत्त्व आता शहरातील स्त्तियांच्या लक्षात येऊ लागले आणि खास स्त्तियांसाठी म्हणून असलेले हेल्थ क्लब गजबजू लागले. सांगायचे तात्पर्य एवढेच की गती शारिरीक, मानसिक अथवा वैचारिक असो, एका ठराविक कालावधीनंतर ती पुन
हा त्याच ठिकाणी पोहचत असते. या संदर्भात प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईनचे वक्तव्य प्रसिद्धच आहे. त्यांना कुणीतरी तिसऱ्या महायुद्धाबद्दल, या महायुद्धात वापरल्या जाणाऱ्या संहारक शस्त्राबद्दल विचारले असता त्यांनी तिसऱ्या महायुद्धात कोणती शस्त्रे वापरली जातील आणि त्या महायुद्धाची संहारकता किती असेल याबद्दल तर मी काही सांगू शकत नाही, परंतु चौथ्या महायुद्धाबद्दल मात्र मी ठामपणे हे सांगू शकतो की, चौथे महायुद्ध दगडधोंड्यांनी लढले जाईल.

तिसऱ्या महायुद्धानंतर मानवी प्रगती पुन्हा अश्मयुगात प्रवेश करेल, असे सांगितले.

आईनस्टाईनने कळत-नकळत प्रगतीचा वर्तुळात्मक प्रवासच अधोरेखित केला. जे काल होते ते प्रगतीच्या नियमानुसार आज कालबाह्य ठरते आणि याच नियमाला अनुसरुन कालचे कालबाह्य पुन्हा उद्या प्रतिष्ठित आणि प्रस्थापित होते. दैनंदिन जीवनातही आपण याचा अनुभव घेतच असतो. शेतीतंत्राबाबत तर याचा अनुभव सध्याच येत आहे. परंपरागत नैसर्गिक शेती आधुनिकतेच्या नावाखाली मोडित निघाली. प्रगतीचा तो एक टप्पा होताच, शेती आधुनिक पद्धतीने होऊ लागली. हा काळही आता मागे पडू पाहात आहे आणि आज शेतकरी पुन्हा एकदा परंपरागत नैसर्गिक शेतीकडे वळत आहे. पायी चालणारा माणूस प्रगत झाला आणि आधी सायकलवर, नंतर मोटर सायकलवर, पुढे मोटार गाडीत स्वार झाला. कालांतराने प्रकृतीच्या कारणामुळे म्हणा किंवा प्रदुषणाच्या धोक्याने माणसाला पुन्हा एकदा सायकल जवळ करावीच लागेल. हे चक्र असेच चालत राहणार. प्रगतीची दिशा रेखाकृती नसून वर्तुळाकृती आहे. काल, आज, उद्या ही आपली कालगणना भासात्मक आहे. कालचे म्हणून जे मागे पडले तेच कालांतराने उद्याचे म्हणून समोर येणार आहे. या वर्तुळाकृती प्रवासात स्थिर असे काहीच नाही. स्थिर आहेत त्या केवळ मानवाच्या आणि इतरही प्राणीमात्रांच्या मुलभूत गरजा आणि जाणिवा.
पूर्वीही भूक ही प्राणीमात्रांची गरज होती, आजही आहे आणि उद्याही राहील. ही गरज भागविण्याची साधने बदलतील, खाण्याचे पदार्थ बदलतील, खाण्याच्या पद्धती बदलतील परंतु जिभेची चव आणि पोटाची आग तशीच कायम राहील. या पृष्ठभूमिवर आनंदी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर, मुलभूत गरजांच्या पुर्ततेपेक्षा अधिकाची जी हाव माणसात निर्माण झाली आहे, ती नष्ट नाही करता आली तरी किमान आटोक्यात आणायला हवी. स्वस्थ झोप येणे अधिक महत्त्वाचे आहे. झोपण्याचे साधन कोणते याला महत्त्व नाही. हा वरवर अतिशय क्षुल्लक वाटणारा फरकच अंतत: अतिशय महत्त्वाचा ठरतो. किमान गरजा, किमान साधने हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे, कारण आपले खरे सुख आपल्या मुलभूत गरजांसोबत आणि मुलभूत वृत्तींसोबत जुळलेले आहे. बरेचदा याचा विसर पडल्यामुळे विनाकारण मानवी जीवनात दु:खाचा प्रवेश होतो. ‘मी बुटासाठी रडत होतो आणि समोरच्याला पायच नव्हते’, या एकाच वाक्यात साऱ्या सुखाचे तत्त्वज्ञान मांडले आहे. जग आधुनिक झाले तरी मानवाची दु:खे आधुनिक झालेली नाहीत. शेवटी जुनी दु:ख जाऊन नवीन दु:ख येणे याचेच नाव ‘प्रगती’, हे आपण समजून घेतले म्हणजे मग जिवाची तगमग होत नाही. अश्मयुगातील मानवासाठीही भूक हे एक दु:ख होते आणि आज चंद्र-मंगळावर पोहोचलेल्या आधुनिक मानवासाठीही ते कायम आहे. केवळ भुकेसारखी गरज आणि भयासारखी भावनाच वर्तुळाच्या परिघाबाहेर आहे. बाकी सगळे वर्तुळाकृती नियमालाच बांधिल आहेत.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..