गणेशोत्सव हा इतर अनेक पतवैकल्यासारखाच आपल्या घरात साजरा करण्याचा उत्सव होता. टिळकांनी तत्कालीन गरज लक्षात घेऊन शुद्ध राजकीय हेतूने या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या पृष्ठभूमीवर आज स्वातंत्र्योत्तर काळात उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप टिकविणे गरजेचे आहे का आणि असलेच तर त्यामागे कोणते हेतू आहेत, त्या हेतूंची पूर्तता होते की नाही, या सगळ्यांची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे.
गणेश चतुर्थीला पृथ्वीतलावर आगमन झालेल्या गणरायांचा यावेळचा मुक्काम तब्बल बारा दिवसांचा होता. बारा दिवसांच्या मुक्कामानंतर गुरुवारी गणरायांनी भत्त*गणांचा निरोप घेत पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे भरघोस आश्वासन दिले. अर्थात हा परिपाठ दरवर्षीचाच आहे. गणराया येतात, दहा दिवस डोळे उघडे ठेवून भत्त*ीच्या आणि भत्त*ांच्या विविध तऱ्हा बघतात आणि निघून जातात. पूर्वी त्यांचे आगमन आणि वास्तव्य घरातील चार भिंतीपुरते मर्यादित होते; परंतु गणरायांची लोकप्रियता एका चांगल्या हेतूसाठी सत्कारणी लावावी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणरायांच्या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. 1857 च्या क्रांतीचा धसका घेतलेल्या ब्रिटिशांनी पुन्हा तसे काही घडू नये याची काळजी घेत शस्त्रबंदी, जमावबंदीसारख्या विविध कायद्यांनी, कायद्यांच्या कलमांनी भारतीयांना पार जखडून टाकले. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावरच पायबंद घातला. ईस्ट इंडिया कंपनीचा गाशा गुंडाळून ब्रिटनच्या राणीने सत्ता सांभाळताना आपण फार दयाळू आहोत आणि भारतीयांच्या भल्यासाठीच इथे राज्यकर्ते म्हणून आलो आहोत हे भारतीयांच्या मनावर बिंबविण्यासाठी ब्रिटिश सरकार भारतीयांच्या धार्मिक स्वातंत्र्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले. कायदेपंडित असलेल्या लोकमान्य टिळ
ांनी याच गोष्टीचा फायदा घेत गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देत जनप्रबोधनाचा एक प्रशस्त मार्ग खुला केला. या दहा दिवसांच्या उत्सवात वादविवाद स्पर्धा, चर्चा, मोठमोठ्या वत्त*ांची भाषणे आयोजित केली जायची, त्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध जनमत जागृत
करण्याचा प्रयत्न व्हायचा. टिळकांचा हा प्रयत्न चांगलाच
प्रभावी आणि यशस्वी ठरला. मुळात गणेशोत्सव हा इतर अनेक पतवैकल्यासारखाच आपल्या घरात साजरा करण्याचा उत्सव होता. टिळकांनी तत्कालीन गरज लक्षात घेऊन शुद्ध राजकीय हेतूने या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या पृष्ठभूमीवर आज स्वातंत्र्योत्तर काळात उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप टिकविणे गरजेचे आहे का आणि असलेच तर त्यामागे कोणते हेतू आहेत, त्या हेतूंची पूर्तता होते की नाही, या सगळ्यांची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात महात्मा गांधींनी दिलेल्या सल्ल्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. भारताला सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँठोसची स्थापना करण्यात आली. काँठोस या शब्दाचा अर्थच विशिष्ट हेतूने एकत्रित आलेल्या लोकांचा समूह, असा होतो. विशेष म्हणजे एका ब्रिटिश व्यत्त*ीनेच काँठोस स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा उद्देश सफल झाल्याने आता काँठोसचे विसर्जन करायला हवे, असा सल्ला त्यावेळी महात्मा गांधींनी दिला होता. हेतूची पूर्तता झाल्यावरही एखादी चळवळ, संघटना किंवा उपक्रम पुढे राबविणे सुरूच राहिले तर त्यात अनेक विकृती शिरण्याचा मोठा धोका असतो. गणेशोत्सवाच्या संदर्भात अगदी असेच झाले असे म्हणता येत नसले तरी आज ज्या स्वरूपात हा उत्सव साजरा केला जात आहे ते पाहता या उत्सवात धड धार्मिकता उरलेली नाही आणि धड जनप्रबोधनाचे कार्य या उत्सवाद्वारे होत नाही, अशी परिस्थित
दिसते. गणरायाचे आणि गणेशोत्सवाचे पार व्यावसायिकीकरण झाले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून भत्त*ीचा धंदा मांडल्या जात आहे, नेतेगिरीचे फड सजविले जात आहेत, समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे विकृतीकरण होत आहे. गणरायासमोर ढोल-ताशांच्या कर्कश्श आवाजात ओंगळवाणे नाच करायचे, अचकट-विचकट गाणी म्हणायची, दहा दिवस निव्वळ गावगप्पा करीत ‘टाईमपास’ करायचा, वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करून आपले शौक पुरवून घ्यायचे, असेच बहुतेक ठिकाणी सुरू असते. अर्थात सगळ्याच मंडळांमध्ये हेच प्रकार होतात, असा आरोप मला करायचा नाही. काही मंडळे या उत्सवाच्या माध्यमातून खूप चांगले काम करीत असतात. अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवितात, गोळा झालेल्या पैशाचा अगदी योग्य विनियोग केला जातो; परंतु असे कार्य अपवादात्मकच असते. बहुतेक ठिकाणी श्रद्धेचा शब्दश: बाजार मांडल्या जातो. यात काही नावे इतकी मोठी आहेत की त्यांच्याबद्दल बोलायची हिंमत कुणाला होत नाही. सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा किती कौशल्याने व्यावसायिक लाभ उचलता येतो, याचा नमुना पाठ काही मंडळांनी घालून दिला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत मुंबईच्या लालबागचा राजाची ज्या व्यावसायिक कौशल्याने प्रसिद्धी केली जाते आणि त्या माध्यमातून कोट्यवधीची जी उलाढाल होत आहे ते पाहता पुढच्या काही वर्षांत गणराया शेअर मार्केटमध्ये दाखल झाला तर नवल वाटू नये. गणरायाप्रती सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर वापर करीत लालबागच्या राजाची नवसाला पावणारा म्हणून कीर्ती पसरविण्यात आली. या प्रसिद्धी उपक्रमाला अपेक्षेपेक्षा प्रचंड यश मिळाले आणि लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधीची राशी येऊन पडू लागली. लालबागच्या राजाला भत्त*ांकडून मिळणाऱ्या दानाची रक्कम इतकी मोठी असते की दरवर्षी केवळ ही राशी मोजण्यासाठी विविध बँकांकडून खास माणसे मागवून तीन पाळ्यां
चोवीस तास पैसे मोजण्याचे काम केले जाते, मदतीला ‘काउंटिंग मशीन’ असतातच. यावर्षी प्रत्येक पाळीत आठ लोक असे एकूण चोवीस ‘एक्स्पर्ट’ लोक या कामात व्यठा होते. त्यासाठी महाराष्ट्र बँक तसेच एका स्थानिक सहकारी पतसंस्थेने मदत पुरविली होती. शिवाय लालबागच्या राजाला दागिने अर्पण केले जातात ते वेगळेच. नंतर या दागिन्यांचा लिलाव होतो आणि त्यातूनही मोठी रक्कम उभी राहते. गेल्या वर्षी लालबागच्या राजाला दानात आलेल्या नोटांमध्ये तेला-तुपाने खराब होऊन चलनाच्या बाहेर गेलेल्या नोटांची एकूण किंमतच तीन ते चार लाख होती, यावरून तिथे किती प्रचंड पैसा येत असावा याची
कल्पना करता येऊ शकते. यावेळी दहशतवादी हल्ल्याच्या भीतीमुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यास
येणाऱ्या भाविकांचा चार कोटींचा विमा उतरविण्यात आला होता. ही सगळी उलाढाल अवाक करणारी आहे. वास्तविक प्रभादेवीचा सिद्धिविनायक हे मुंबईकरांचे लाडके दैवत; एरवी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी प्रचंड लांब रांगा असतात. अंगारकीसारख्या काही विशेष दिवशी तर या रांगा दोन-दोन किलोमीटर लांबीच्या असतात; परंतु गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मुंबईत चर्चा असते ती केवळ लालबागच्या राजाची. या दहा दिवसांत सिद्धिविनायकाकडे भत्त*ांचा दुष्काळ असतो. अगदी सहज चालत जाऊन दर्शन घेता येते. हा सगळा प्रकार आकलनाच्या पलीकडचा आहे. शिवाय तिथेही खास ‘तिरूपती संस्कृती’ असतेच. म्हणजे ज्याच्याजवळ जास्त पैसा त्याला दर्शनासाठी तेवढे कमी वेळ तिष्ठावे लागते. ‘व्हीआयपी’ लोकांना, ‘सेलिब्रिटी’ना रांगेत न लागता थेट लालबागच्या राजाजवळ पोहचता येते. खरेखुरे भत्त* मात्र आठ-आठ, बारा-बारा तास रांगेत उभे राहतात. हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची आहे. म्हणजे गणपतीमध्येही आता ‘स्टार कास्ट’ आली असेच म्हणावे लागेल. एखाद्या गरीब, स
ामान्य परिस्थितीतील भत्त*ाने आपल्या तुटपुंज्या कमाईतून जमेल तशा पद्धतीने आपल्या घरी स्थापन केलेला गणपती आणि लालबागचा राजा किंवा दगडूशेठ हलवाईचा गणपती यांत गुणात्मक अंतर काय, हे स्पष्ट व्हायला हवे. आता दस्तुरखुद गणरायानेच एकवेळ, नाही प्रत्यक्ष तर किमान आकाशवाणीच्या माध्यमातून त्याचे कुठले कुठले अस्तित्व नवसाला पावणारे आहे आणि कुठले केवळ आश्वासनावर भागविणारे आहे, हे एकदाचे स्पष्ट करावे, म्हणजे केव्हा आणि कुठे गर्दी करावी हे तरी लोकांना कळेल. श्रद्धा हा प्रांतच खूप वेगळा आहे. श्रद्धेची ठाम व्याख्या करता येत नाही, परंतु त्याचवेळी श्रद्धेची ताकद खूप मोठी असते हेदेखील मान्य करावे लागते. टिळकांनी याच ताकदीला सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न केला होता आणि आज याच ताकदीचा व्यावसायिकांनी बाजार मांडला आहे. मंदिर, मठ, इतर पूजास्थळांवर होणारी पैशाची अशी उधळण पाहिल्यावर भारत हा एक गरीब देश आहे, यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? या पैशापैकी केवळ दहा टक्के पैसा जर विकासात्मक कार्याकडे वळला तरी त्याच भत्त*गणांच्या खूप साऱ्या समस्या दूर होतील. श्रद्धा माणसाला जगण्याचे बळ देत असली तरी आपले जगणे आपल्या सभोवती असलेल्या परिस्थितीवर निर्भर असते. आज आपल्या भोवतालची परिस्थिती इतकी बिकट आहे की केवळ श्रद्धेची कवचकुंडले आपले रक्षण करू शकणार नाही. ही परिस्थिती आधी सुकर करावी लागेल. भ्रष्टाचार संपवावा लागेल, शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारी व्यवस्था बदलावी लागेल, शिस्तीचे आणि स्वच्छतेचे धडे गिरवावे लागतील, आपल्यातील वाईट विचारांचे, वाईट प्रवृत्तींचे वाईट व्यसनांचे आधी विसर्जन करावे लागेल! देवाला नैवेद्याचे ताट अर्पण करण्यापूर्वी आपल्या शेजारी कुणी उपाशी तर नाही ना याची खात्री आपण केलीच पाहिजे. सश्रद्ध भावनेने हजारोंचे दान देवाच्या पेटीत टा
कण्यापूर्वी कुणी एखादा गरीब, फाटका माणूस दोन-चार रुपयांच्या भुकेने कासाविस होऊन तळमळत नाही ना,किंवा औषधोपचाराअभावी कुणी मरत नाही ना, हेदेखील आपण पाहायला हवे! हे सगळे व्यवधान सांभाळण्याची सद्बुद्धी गणराया सगळ्यांना दे आणि मगच पुढच्या वर्षी वाजत-गाजत ये!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply