शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या गेलेल्या मराठी माणसाने संधी मिळताच आपली खरी ताकद दाखवून दिली. आज राज ठाकरे सेनेसोबत असते, राणे, भुजबळांना बाळासाहेबांनी बाहेर पडू दिले नसते तर राज्यातील चित्र वेगळे दिसले असते; परंतु दुर्दैवाने केवळ उद्धवचे भले पाहताना बाळासाहेबांनी सेनेच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी बाळासाहेबांना आपला मुलगा शिवसेनेपेक्षा, मराठी माणसाच्या हितापेक्षा अधिक प्यारा वाटला, असेच म्हणावे लागेल. शिवरायांनी एकेक शिलेदार, एकेक माणूस जोडत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. कोणत्याही कारणाने त्यांनी कुणाला दुखावले नाही, कुणाला दुरावले नाही. आपले वैयत्ति*क सुख-दु:ख, आपली नाती-गोती त्यांनी स्वराज्याच्या आड कधी येऊ दिल्या नाहीत
विधानसभा निवडणुकीत सेनेचा सेनेच्या दृष्टीने अनपेक्षित, परंतु इतरांच्या दृष्टीने अपेक्षित पराभव झाला आणि सेना नेते कमालीचे अस्वस्थ झाले. यावेळी विधानभवनावर भगवा फडकणारच या अतिआत्मविश्वासात वावरणाऱ्या सेनेला खास मराठी दणका बसला. राज्यात युतीच्या हातात सत्ता येणे ही युतीची नव्हे तर राज्याच्या जनतेची गरज आहे, ही त्यांचीच जबाबदारी आहे, या दर्पोत्त* अहंकारात वावरणाऱ्या युतीच्या आणि विशेषत: सेनेच्या नेत्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचे उद्धव्र ठाकरेंचे स्वप्न भंगले आणि आता भविष्यात हे स्वप्न ते पुन्हा पाहू शकतील असे वाटत नाही. राज ठाकरेंच्या मनसेने युतीला जबर दणका दिला, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारायला सेना नेते अद्यापही तयार नाहीत. सेनेला कुणी संपवू शकत नाही, सेना अंगार आहे, अशी वाक्ये अजूनही फेकली जातात. वास्तविक राज ठाकरे युतीला मोठे नुकसान पोहचवू शकतात, याची जाणीव लोकसभा निवडणुकीनंतर युतीच्या नेत
यांना व्हायला हवी होती. खरेतर राज ठाकरेंना बाळासाहेबांनी सेनेबाहेर पडूच द्यायला नको होते. या दोन बंधूंमध्ये विवाद निर्माण झाला आणि राज काही वेगळे करण्याच्या विचारात आहे,
हे लक्षात येताच आम्ही याच
स्तंभातून बाळासाहेबांनी आपल्या साम्राज्याची या दोन भावांमध्ये समान वाटणी करावी, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे हा शहरी पट्टा राजच्या हवाली करून उर्वरित महाराष्ट्र उद्धवकडे सोपवावा, अशी सूचना केली होती. ही केवळ आमचीच नव्हे तर सेनेवर प्रेम करणाऱ्या समस्त मराठी माणसाची इच्छा होती. त्या लेखाच्या प्रती आम्ही स्वत: सुधीर जाधव, यशवंत पाध्ये यांच्यामार्फत बाळासाहेबांकडे पाठविल्या होत्या. उद्धव ठाकरेंनादेखील आम्ही हेच सांगितले होते. हेच महाराष्ट्राच्या आणि सेनेच्या हिताचे होते; परंतु कुणाचे ऐकायचेच नाही ठरविल्यावर विचारांची आणि विवेकाची कवाडे आपोआप बंद होतात. तुमचेही तसेच झाले, पूत्रप्रेमाने आंधळे झाल्यामुळे तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव झाली नाही. किंवा बालहट्टापुढे तुमचा नाईलाज झाला असावा. सेनेतून बाहेर पडतात ते संपतात याच भ्रामक समजूतीतून बाहेर पडायला तुम्ही तयार नव्हते. ते दिवस आता राहिलेले नाहीत. सेनेतून बाहेर पडल्यावर छगन भुजबळ तीन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. नारायण राणेही सातत्याने मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जा आणि चांगले खाते मिळवत आहेत. सेनेचा पूर्वीचा धाक आता कोणत्या स्तराला गेला आहे, हे त्या सामान्य शाखाप्रमुखाने, सदा सरवणकरने दाखवून दिले आहे. या सगळ्या वस्तुस्थितीपासून बाळासाहेब सदैव अनभिज्ञ राहत आले किंवा त्यांना त्यांच्या भोवती गोतावळा करून असलेल्यांनी वस्तुस्थितीची जाणीवच होऊ दिली नाही. राज ठाकरे बाहेर पडले तर सहा महिन्यात त्यांचे राजकारण संपुष्टात येईल, असेच बाळासाहेबांना सांगण्यात आले. सेनेतून जे लोक बाहेर पडत
त त्यांची दखल घेण्याची खरेतर सेनेला काहीच गरज नव्हती. त्यांनी त्यांचा मार्ग निवडला, आता पुढे त्यांचे काय व्हायचे ते होईल, सेनेने त्यावर टिप्पणी करणे गरजेचे नव्हते; परंतु एखाद्याने सेना सोडली की त्याच्यावर अतिशय शिवराळ भाषेत सतत टीका करण्याचे अत्यंत चुकीचे धोरण सेनेने सतत राबविले. त्याचा परिणाम हा झाला की लोकांमध्ये या नेत्यांबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली आणि दुसरा महत्त्वाचा परिणाम हा झाला की या अतिशय बोचऱ्या आणि खालच्या स्तरावरील टीकेमुळे या लोकांची सेनेसोबत, बाळासाहेबांसोबत जुळलेले भावबंध कायमचे विस्कटले. या लोकांना पुन्हा परत कधी स्वगृही यावेसे वाटले तरी येऊ शकणार नाहीत, अशी परिस्थिती या अवाजवी, आक्रास्तळ्या टीकेने निर्माण करून ठेवली. ‘निगलेक्ट अॅण्ड किल’ असे धोरण खरेतर सेनेने राबवायला हवे होते. मात्र ते तसे न ठेवता सोडून गेले त्यांच्यावर सातत्याने शिवराळ भाषेत टिका करून त्यांना ‘फोकस’ मध्ये ठेवण्याची चूक सेनेने केली. राज ठाकरेंच्या बाबतीतही तेच झाले. सेना नेत्यांनी त्यांच्याविरूद्ध जितकी गरळ ओकली तितकेच ते मोठे होत गेले. मुंबईतील मराठी लोकांची सहानुभूती त्यांना मिळू लागली, त्यात भर पडली ती राज ठाकरेंच्या प्रभावी व्यत्ति*मत्वाची आणि वत्तृ*त्वाची. याचा एकत्रित परिणाम हा झाला की कधीकाळी मुंबईवर एकछत्री अंमल बजाविणाऱ्या सेनेला राज ठाकरेंनी या निवडणुकीत चक्क चवथ्या स्थानावर ढकलले. परिस्थिती इतकी विकोपाला जात असताना तिकडे ‘मातोश्री’वर मात्र राज्याला भगव्या युतीशिवाय पर्याय नाही, हेच तुणतुणे वाजविले जात होते. बाळासाहेबांना या सगळ्या परिस्थितीची कल्पना होती की नाही, हे सांगता यायचे नाही. कारण बाळासाहेब हे नेहमीच महाराष्ट्र सरकारच्या सुरक्षा रक्षकांच्या नजरकैदेत वावरत आले.बाळासाहेबांच्या सुरक्षेच्या नाव
खाली सरकारने सामान्य शिवसैनिकांशी, सामान्य जनतेशी त्यांचा थेट संबंध कधी येऊच दिला नाही. खरेतर ही लादलेली कैद झुगारून बाळासाहेबांनी जनतेत, आपल्या शिवसैनिकांमध्ये खुलेआम फिरायला हवे होते. सुरक्षेची काळजी करण्याचे काही कारण नव्हते. त्यांच्या शिवसैनिकांनी आपल्या छातीचा कोट करून त्यांना जपले असते. बाळासाहेबांच्या केसालाही धक्का लावण्याची कुणाची हिंमतच झाली नसती. चुकून तसे साहस कुणी केलेच असते तर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उभा देश पेटला असता आणि सेना महाराष्ट्रातून संपूर्ण देशात पसरली असती. परंतु बाळासाहेबांनी
‘झेड प्लस’ सुरक्षेला आपला सन्मान मानले आणि सामान्य जनतेसोबतच वस्तुस्थितीपासूनही
ते दूरावत गेले. राज्यातून शिवसेनेचा पाया हळूहळू उखडला जात आहे आणि त्यासाठी सेनेतीलच काही सरदार, वतनदार कारणीभूत ठरत आहेत, हे बाळासाहेबांना मातोश्रीवर बसून कधी कळले नाही किंवा त्यांना कळू दिल्या गेले नाही. शरद पवार हेदेखील बाळासाहेबांच्या तोडीचे नेते आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये ते सातत्याने मोठी पदे भूषवित आले आहेत.
परंतु ते कधीच सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात दिसत नाहीत. त्यांना कुणीही सहज भेटू शकतो. कुणाचाही फोन ते घेतात किंवा मोबाईलवर एसएमएस दिल्यास स्वत:हून संफ करतात. बाळासाहेबांना भेटायचे म्हणजे आधी कितीतरी ‘नंदी’ना साकडे घालावे लागते. दूरध्वनीवर बाळासाहेबांशी संफ तर केवळ अशक्य आहे. तिकडे बाळासाहेबांनी स्वत:ला सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कोंडून घेतले आणि इकडे उद्धव भोवती चापलूस लोकांचा कोंडवळा जमा झाला. दोघांनाही वस्तुस्थिती कळण्याचा मार्गच उरला नाही. आजूबाजूचे ठराविक ‘पगारदार’ लोक सांगतील तेच सत्य बाळासाहेब आणि उद्धव मान्य करीत गेले आणि तिथेच घात झाला. खरेतर मधले ‘कुशन’ किंवा सल्लागार बनण्याच्या लायकीचे लोकांमधून निवडू
गेलेले आणि ज्यांचा पिंड हा शिवसैनिकाचा आहे असे मनोहर जोशी,सुभाष देसाई, दत्ताजी नलावडे,गुलाबराव गावंडे,सुरेश गंभीर,सुरेश प्रभू,प्रतापराव जाधव, भावना गवळी,विलास अवचट, प्रदिप जैस्वाल, शाशिकांत सूतार गजानन बाबर शिवाजीराव अढळराव पाटील, असे कितीतरी अनेक सच्चे शिवसैनिक सेनेत उपलब्ध आहेत. सेना वाढली ती ‘राडा’ संस्कृतीवर आणि तीच भाषा मुंबईतील मराठी द्वेष्ट्या हिंदी भाषिक लोकांना आणि मुस्लिमांना कळते.मात्र ती पद्धत सोडून कॉलसेंटरची कारपोरेट पद्धत उद्धवजींच्या कोंडाळ्याने सेनेत रूजविली आणि दुर्देवाने उद्धवजी त्यात फसले.सामान्य शिवसैनिकाचा राबता उद्धवजींच्या आजुबाजुला कधी राहूच दिल्या गेला नाही.कारपोरेट कोंडाळ्याने मुंबई किंवा महाराष्ट्रातील मराठी मतांना सेनेशिवाय पर्याय नाही, हे बाळासाहेब आणि विशेषत: उद्धवच्या मनावर बिंबविले . राज ठाकरे कुठपर्यंत मजल मारू शकतात, याचा अंदाज त्यांना कधीच आला नाही. राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचे तर मराठी मते म्हणजे आपल्या गोठ्यात बांधलेली गाय समजण्याची अक्षम्य चुक ठाकरे पिता-पूत्रांनी केली. लोकशाहीत असे काही गैरसमज करून घेण्याची किंमत किती मोठी असू शकते, याचा प्रत्यय आता त्यांना आला असेल. लोकांची मते हवी असतील तर लोकांमध्ये जाऊन, त्यांच्यात मिसळून त्यांना समजून घ्यावे लागते, त्यांच्याशी थेट संवाद साधावा लागतो. गढीवर बसून कारभार करण्याचे दिवस आता उरले नाहीत, हे सेनानेते कधी समजून घेणार? आज मराठी माणसाने पाठीत खंजिर खुपसल्याचा आरोप बाळासाहेब किंवा त्यांच्या मुखातून अन्य कुणी करत असतील तर ती दुसरी मोठी चुक ठरू शकते. मराठी माणसाने सेनेच्या पाठीत खंजिर खुपसलेला नाही तर सेनेला गदागदा हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता ही पाहिजे तेव्हा वापरायची आणि नको असेल तर
ेकून द्यायची गोष्ट नाही, हे मराठी माणसाने वेगळ्या भाषेत सेनेला समजावून सांगितले आहे. शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या गेलेल्या मराठी माणसाने संधी मिळताच आपली खरी ताकद दाखवून दिली. आज राज ठाकरे सेनेसोबत असते, राणे, भुजबळांना बाळासाहेबांनी बाहेर पडू दिले नसते तर राज्यातील चित्र वेगळे दिसले असते; परंतु दुर्दैवाने केवळ उद्धवचे भले पाहताना बाळासाहेबांनी सेनेच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी बाळासाहेबांना आपला मुलगा शिवसेनेपेक्षा, मराठी माणसाच्या हितापेक्षा अधिक प्यारा वाटला, असेच म्हणावे लागेल. शिवरायांनी एकेक शिलेदार, एकेक माणूस जोडत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. कोणत्याही कारणाने त्यांनी कुणाला दुखावले नाही, कुणाला दुरावले नाही. आपले वैयत्ति*क सुख-दु:ख, आपली नाती-गोती त्यांनी स्वराज्याच्या आड कधी येऊ दिल्या नाहीत. त्यांनी आपल्या प्रत्येक मावळ्यावर पूत्रवत प्रेम केले आणि म्हणूनच प्रचंड विपरीत परिस्थितीत शिवराय इतका जाज्वल्य इतिहास घडवू शकले. त्यांचा आदर्श मानणाऱ्या, उठता-बसता त्यांचे नाव घेणाऱ्या सेनेच्या धुरिणांना शिवरायांचा हा मोठेपणा पचविता आला नाही. एकेक माणूस दूर होत गेला आणि मातोश्रीला
आणि शिवसेना भवनाला घेरून बसलेल्या लोकांनी त्याच्या परतीचे दोर कापुनच टाकले. शिवसेनेने अनेकांना मोठे केले, सत्तेचे-सन्मानाची पदे दिली, हे नाकारता येत नसले तरी हे आपण त्यांच्यावर उपकार केले, ही भावना सतत बाळासाहेबांच्या मनात राहिली आणि ते हे सतत बोलून दाखवायचे. त्यांच्या जवळची अनेक माणसे यामुळे दुखावली. अनेक वेळा मोठ्या पदावर नियुत्त*ा करताना कष्टाचा, तळमळीचा, त्यागाचा विचार न करता कुण्यातरी आलतूफालतू उपनेत्याचा किंवा संफ प्रमुखाचा सल्ला ऐकला जायचा. हे मधले दलाल त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी बा
ासाहेबांची दिशाभूल करायचे. या दलालांनीच आज शिवसेना गोत्यात आणली आहे. सेनेचा घात मराठी माणसाने नव्हे तर ‘मातोश्री’ने व शिवसेना भवनानी पोसलेल्या या दलालांनी केला आहे. ‘मातोश्री’वरच्या खलबतखान्याने अनेक निष्ठावंत शिवसैनिकांचा बळी घेतला, अनेकांना दुखावले, अनेकांना दूर होण्यास बाध्य केले आणि हे सगळे आपल्या डोळ्यासमोर होत असताना बाळासाहेब मुकदर्शक बनून राहिले. यातून जी हानी झाली ती ‘सामना’त लेखणी झिजवून भरून येणारी नाही. दोष मराठी माणसांना देण्यात अर्थ नाही. याच मराठी माणसाने शिवसेनेला सोन्याचे दिवस दाखविले, हे कसे विसरता येईल? त्यामुळे सध्या मराठी माणसानी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशी अलंकारीक भाषा वापरून झालेल्या चुकांवर पांघरूण घालन्यापेक्षा वस्तुस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा,आमच्यासारखे अनेक महाराष्ट्राचे हितचिंतक आपल्याला निर्भिडपणे काय चुकले आणि भविष्यात काय करायला पाहिजे हे सांगायला तयार आहेत.प्रश्न आहे तो फत्त* तुमच्या इच्छाशत्त*ीचा
— प्रकाश पोहरे
Leave a Reply