नवीन लेखन...

डोके वापरा





सापेक्षतावादाचा जनक असलेल्या आईन्स्टाइनने शंभर वर्षांपूर्वी मांडलेल्या सिद्धान्ताचे कोडे सोडविले असल्याचा दावा अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने केला असल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. तो शास्त्रज्ञ भारतीय वंशाचा असल्याने त्याच्याबद्दल कौतुक वाटणे स्वाभाविकच होते; परंतु त्याचवेळी हे कोडे शंभर वर्षांत कुणीही सोडवू शकले नाही याचे आश्चर्यदेखील वाटले. अर्थात, अशा गणिती किंवा सैद्धान्तिक कोड्यांच्या बाबतीत तशी शक्यता असू शकते. काही कोडी, काही कुटे, काही सिद्धान्त इतके गहन असतात. ते सोडवता सोडवता अनेक पिढ्या संपू शकतात. परंतु इतर अनेक कोडी, गणिते अशीही आहेत की, जी अगदी सहज सोडविली जाऊ शकतात; परंतु ती सोडविली जात नाही. ती सोडविण्यासाठी फारसे डोके वापरण्याची गरज नसते. अगदी चालत्याफिरत्या माणसालाही काय केले म्हणजे हे गणित सुटेल हे सहजपणे सांगता येते; परंतु तरीही ती गणिते, त्या समस्या तशाच कायम असतात. यामागची तार्किकता मात्र लक्षात येत नाही. साधं रेल्वेचे उदाहरण घेऊ या. वर्तमानपत्रात दर दोन दिवसांआड कुणीतरी रेल्वेत चढताना किंवा उतरताना कटून मेल्याची बातमी हमखास ठेवलेली असते. हे हकनाक मरणारे जीव वाचविणे म्हणजे खूप गहन प्रश्न आहे का? गाडी सुरू झाल्यावर लोक डब्यात चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात आणि पाय घसरून आपला जीव गमावतात. साधा उपाय आहे, विदेशात ज्याप्रमाणे गाडी सुरू होण्यापूर्वी गाडीचे दरवाजे आपोआप बंद होतात तशी व्यवस्था आपल्या गाड्यांमध्ये केली तर अशा अपघातामध्ये नाहक बळी पडणाऱ्या अनेकांचे जीव सहज वाचविता येतील. विदेशात गाड्यांना घसरते (स्लायडिंग) दरवाजे असतात. ते स्वयंचलित असतात. गाडी सुरू होण्यापूर्वी ते आपोआप बंद होतात आणि गाडी थबल्याशिवाय ते उघडत नाहीत. त्यामुळे तिकडे असे अपघात होत नाहीत. तीच व
यवस्था आपल्याकडे करता येणार नाही का? दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडच्या

गाड्यांना दोन दरवाजे असतात. गाडीतून

उतरणारे या दोन्ही दरवाजांतून उतरतात आणि चढणाऱ्यांची गर्दीही त्याच दोन्ही दरवाजावर असते. या रेटारेटीतूनही बरेचदा असे अपघात घडतात. हे टाळण्यासाठी या दोनपैकी एक दरवाजा केवळ उतरण्यासाठी आणि दुसरा केवळ चढण्यासाठी वापरल्या गेले तर चढणारे शांतपणे आतमध्ये चढू शकतील व उतरणारे शांतपणे उतरू शकतील. त्याचबरोबर गाडी सुरू होण्यापूर्वी हे दरवाजे जर एका स्वयंचलित लीव्हरद्वारे अलार्म वाजवून बंद केले तर बरेच अपघाती मृत्यू सहज टाळता येतील. तसे का केले जात नाही हे एक कोडेच आहे आणि ते आजपर्यंत सुटलेले नाही. आपल्याकडच्या प्रवाशांना शिस्त नाही ही बाबदेखील तेवढीच गंभीर आहे. गाडी स्थानकात उभी असताना शौचालयाचा वापर करू नये इतकी सामान्य बाब आपल्या लोकांच्या ध्यानी येत नाही. लोक सुधरत नसतील तर सरकारने थोडा वेगळा विचार करण्यास काय हरकत आहे. विमानाप्रमाणे किंवा विदेशात बसगाड्यांमध्येही असतात त्याप्रमाणे मलमिश्रित पाणी एखाद्या टाकीत साठविण्याची व्यवस्था प्रत्येक शौचकुपासोबत करता येईल. गाडी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर या सगळ््या शौचकुपातील घाण एका शोषखड्ड्यात जमा करता येईल. त्यातून रेल्वेला सोनखताच्या स्वरूपात प्रचंड उत्पन्न होऊ शकते आणि अर्थातच स्थानकावर होणारी घाणही टाळता येते. हाही खूप गहन प्रश्न नाही; परंतु तो अद्याप सुटलेला नाही एवढे खरे. जपानमध्ये एखाद्या पाहुण्याला दुपारी जेवण दिले तर यजमान त्यांना रात्री मुक्काम करण्याचा आठाह धरतात. जपानमध्ये मानवी मलमूत्राद्वारे मोठ्या प्रमाणात खत तयार केले जाते. पाहुण्यांना रात्री मुक्काम करण्याच्या आठाहामागे तो सकाळी आपले शौचकूप वापरले आणि त्याच्या मलमूत्राद्वारे सोनखत त
ार करता येईल हा त्यांचा उद्देश असत. आपले अन्न कोणत्याही प्रकारे वाया जाऊ नये याची किती काळजी तिथे घेतली जाते बघा! सांगायचे तात्पर्य, एरवी आपल्याला ज्या समस्या खूप मोठ्या, गहन वाटतात प्रत्यक्षात त्या तशा असतीलच असे नाही. अगदी छोट्याछोट्या आणि सहज करता येण्याजोग्या उपायातून या समस्या सुटू शकतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसे पाहायला गेलो तर किती मोठी समस्या आहे. अगदी केंद्र सरकारपासून सगळेच या समस्येने हवालदिल झालेले दिसतात. काय काय उपाय केले जात आहेत, किती प्रयत्न होत आहेत; परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव नाही. खरेच का ही समस्या इतकी गहन आहे? अजिबात नाही. शेतकऱ्यांवरचे सगळे कर्ज सरकारने एकवेळ समायोजित केले म्हणजेच त्यांच्याकडून घेणे असलेल्या रकमा तसेच विविध अनुदाने, जसे खते वैगेरे त्यांचा कर्ज खात्यात जमा केल्या तर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज फिटंफाट होईल व अशा प्रकारे त्यांना एकदा कर्जमुत्त* केले की शेतकऱ्यांना केवळ नैसर्गिक शेतीसाठी बाध्य करावे. उत्पादनखर्च आपोआप कमी होईल आणि शेती कोणत्याही परिस्थितीत फायद्याची होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपोआप थांबतील. लोकांना विषमुत्त* अन्न मिळेल आणि आजार कमी होतील. एवढा हा उपाय सोपा आहे. परंतु करणार कोण? युवकांमध्ये वाढत असलेले बेरोजगारीचे प्रमाण हीदेखील मोठी भासणारी खूप छोटी समस्या आहे. शेतीतले पाणी शेतीत, खेड्यातला पैसा खेड्यात याप्रमाणे खेड्यातील शेतमालावर खेड्यातच प्रक्रिया हे धोरण ठामपणे राबविले तर खेड्यातला तरुण रोजगारासाठी शहरात येईलच कशाला? आज खेड्यातला तरुण मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून एकूणच बेरोजगारी वाढत आहे. खेडी संपन्न, समृद्ध करा बेरोजगारीचा प्रश्न आपोआप निकालात निघेल. निवडणुकीत मतदान अनिवार्य करा, मतदान न
करणाऱ्याला सर्व सरकारी सुविधांपासून वंचित करा, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा प्रश्न आपोआप निकालात निघेल. फार सोपा उपाय आहे हा! आज देशात अनेक लोक आयकर भरतात. आयकर चुकविणाऱ्यांचे प्रमाणही खूप मोठे आहे. त्याचा परिणाम थेट सरकारच्या तिजोरीवर आणि पर्यायाने सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीवर होतो. हे टाळण्यासाठी आयकर भरणाऱ्या प्रत्येकाला तो

भरत असलेल्या आयकराच्या एका विशिष्ट प्रमाणात त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात परतावा

मिळण्याची व्यवस्था केली तर लोक स्वत:हून आयकर भरण्यासाठी रांगा लावतील. आज परिस्थिती अशी आहे की, आपल्या उमेदीच्या काळात व्यवसाय, उद्योगधंदा करणाऱ्या, मिळणाऱ्या उत्पन्नातून आयकर भरून देशाचीही सेवा करणाऱ्या उद्योजकाला जर काही कारणाने उद्योग बुडालाच तर म्हातारपणी अक्षरश: भीक मागण्याची पाळी येते. लोकांच्या आयकर चोरीमागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. आपण आयकर भरून देशाची एक प्रकारे सेवा करतो; परंतु दुर्दैवाने उद्या आपला धंदा बसला तर आपल्याला कुणीही विचारणार नाही या भयगंडातूनच आपण आयकर बुडवून देशाचे नुकसान करीत असल्याची जाणीव आयकरदात्यांना होत नाही किंवा होत असली तरी ते त्याची काळजी करत नाहीत. आयकरदात्यांच्या आर्थिक सुरक्षेची तजवीज करून सरकार या लोकांना आयकर भरण्यास प्रवृत्त करू शकते आणि हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. हा उपायदेखील खूप कठीण आहे अशातला भाग नाही. एकूण काय तर देशासमोरील अनेक गणिते जी सुटायला एरवी खूप कठीण वाटत असतात ती अगदी सहज सोडविल्या जाऊ शकतात. फत्त* त्यासाठी सरकारने ज्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ आहेत अशा लोकांना प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत सामील करून घ्यायला हवे. खरेतर अशाच लोकांचा सरकारमध्ये समावेश असायला पाहिजे. त्यासाठी वर्चस्ववादी नोकरशाहीच्या पोलादी पकडीतून आधी सरका
रला बाहेर पडावे लागेल आणि हे गणित सुटणे मात्र खूप कठीण आहे. कारण जे हे गणित सोडवू शकतात त्यांनाच ते सोडवायचे नाही. डोके असणे वेगळे आणि ते वापरणे वेगळे. डोकी सगळ््यांनाच आहे; परंतु ती नको तिथे वापरली जात आहेत. हे असे का होत आहे? हे कोडे सुटायला किती वर्षे वाट पाहावी लागेल?

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..