नवीन लेखन...

तुझे आहे तुज पाशी….!

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात कस्तुरीमृग म्हणून ओळखल्या जाणारी हरणाची जात आढळून येते. या हरणाच्या नाभीत सुगंधीत कस्तुरी असते. या कस्तुरीचा सुवास आसमंतात दरवळतो आणि या सुवासाने वेडे होऊन या जातीची हरणे सैरावैरा पळत असतात. या सुवासाचा उद्गम आपल्याच नाभीत आहे, याची त्यांना जाणीवच नसते. कस्तुरीमृगाचे हे उदाहरण अनेकप्रसंगी उपमा म्हणून वापरले जाते. आम्हा भारतीयांसाठी तर ही उपमा अगदी चपखल लागू होते. देवभूमी म्हणून गौरविल्या गेलेल्या या आपल्या देशात काय नाही? परंतु दुर्दैव हे की, आम्हा भारतीयांनाच आमच्या श्रीमंतीची कल्पना नाही. ही श्रीमंती केवळ भौतिक नाही तर वैचारिक, आध्यात्मिक बाबतीतही भारत जगाच्या गुरुस्थानी शोभून दिसेल; परंतु आम्हा भारतीयांची अवस्था कस्तुरीमृगासारखी झाली आहे. आम्ही उत्तम गोष्टींच्या शोधात वेड्यासारखे इतस्तत: भटकत असतो. विशेषत: पाश्चिमात्य जगाचे आम्हाला अधिक आकर्षण असते. तिकडच्या भौतिक सुख-सुविधा, तिकडचा निसर्ग, तिकडचे पर्यावरण एवढेच नव्हे तर तिकडच्या लोकांच्या कातडीचा रंगदेखील आम्हाला मोहित करत असतो. परकीयांचे एवढे कौतुक असणारा आणि करणारा जगाच्या पाठीवर दुसरा देश नसेल. गोऱ्या कातडीचा, सुटा-बुटात राहणारा, सफाईदार इंठाजी बोलणारा साहेब किंवा गोऱ्या कातडीची मॅडम म्हणजे आमच्यासाठी जणू स्वर्गलोकातलीच माणसे होत. गोऱ्या कातडीच्या या मानसिक गुलामीतून आम्ही अद्यापही बाहेर पडू शकलेलो नाही. तसे नसते तर आज राजकारणाचा, देशाच्या इतिहास-भूगोलाचा शून्य अभ्यास असलेल्या एका बाईला आम्ही ‘सुपर प्राईममिनिस्टर’ म्हणून गौरवाने मिरविलेच नसते. असो, थोडे विषयांतर झाले, परंतु सांगायचा मुद्दा हाच की, आम्हाला आमच्या श्रीमंतीची जाणीव नाही म्हणूनच इतरांच्या श्रीमंतीचे आम्हाला कौतुक वाटते. वास्तविक भारत म्हणजे संपूर्ण

गाचे ‘कॉम्बिनेशन’ आहे. संपूर्ण जगात जे-जे आढळते ते सर्व भारतातही आहे. भरपूर पाऊस, भरपूर ऊन, भुरभूरत पडणारा बर्फ, घनदाट जंगले, विस्तीर्ण वाळवंट, नद्यांची सुपीक खोरे, प्रचंड समुद्रकिनारा, निसर्ग आणि पर्यावरणाची इतकी विपुलता इतर कोणत्याही देशात नसेल. निसर्गाने केलेली ही मुक्तहस्त उधळण पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारताची ओढ लागलेली असते. वाळवंटातले अरब शेख तर केवळ धुंद पावसाचा अनुभव घेण्यासाठी मुंबईत येत असतात. मुंबईचा धुवाँधार पाऊस त्यांना अक्षरश: वेडा करीत असतो. जमिनीवरील स्वर्ग म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, ते काश्मिरचे खोरे भारतातच आहे. काश्मिरातील सौंदर्यस्थळांच्या तोडीची इतरही सौंदर्यस्थळे भारतात विपुल प्रमाणात आहेत. कुलू, मनाली, रोहतांगचे सौंदर्य काश्मीरच्या तुलनेत कुठेच उणे पडत नाही. निसर्गाने उदारतेने दिलेल्या या दानाचे खरे तर आम्ही सोने करायला हवे होते. केवळ पर्यटनाच्या विकासावरच आम्ही भर दिला असता तर याच एका क्षेत्रातून प्रचंड परकीय चलन आम्हाला प्राप्त झाले असते; परंतु आमच्या दूरदृष्टीच्या (?) नेत्यांनी गव्हाच्या, तांदुळाच्या, लोखंडाच्या, कापडाच्या आणि कशाकशाच्या निर्यातीवर भर दिला. त्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा गुंतवला. जंगले साफ करून कारखाने, औद्योगिक वसाहती उभारल्या. एवढा प्रचंड आटापिटा करूनही निर्यातीच्या माध्यमातून आम्हाला पुरेसे परकीय चलन मिळाले नाही तो भाग वेगळा. उलट आयातच वाढली. देशाबाहेरचा पैसा देशात येण्याऐवजी देशातलाच पैसा बाहेर जाऊ लागला. या संदर्भात न्युझिलंडचे उदाहरण उद्बोधक ठरते. न्युझिलंडमध्ये कुठेही मोठे कारखाने नाहीत, मोठे प्रकल्प नाहीत. त्या देशाने आपला नैसर्गिक बाज कायम ठेवला. मोठमोठी कुरणे, त्या कुरणावर पोसल्या जाणाऱ्या मेंढ्या, गाई-बैलांसारखी जनावरे न्युझिलंडच्या अरथव्यवस्थेचा आधार ठरली आहेत. लोकर, दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनातूनच न्युझिलंडने आपला आर्थिक विकास घडवून आणला आहे. नैसर्गिक सौंदर्याला बाधा न आणता त्या सौंदर्याचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्याचे धोरण न्युझिलंडच्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आणि ते यशस्वीसुद्धा ठरले. पर्यटनाच्या माध्यमातून प्रचंड विदेशी चलन त्या देशात येते. ज्या उत्पादनासाठी नैसर्गिक अनुकूलता नाही ते उत्पादन घेण्याचा अट्टाहास न्युझिलंडवासीयांनी कधीच बाळगला नाही. विकासाचा हा योग्य दृष्टिकोन भारतीय नेतृत्वाच्या मात्र कधीच लक्षात आला नाही. आपली शक्तीस्थळे आम्ही कधीच समजून घेतली नाहीत. अन्यथा पर्यटन उद्योगाला प्रचंड वाव असताना आम्ही या उद्योगाकडे इतके प्रचंड दुलर्क्ष केलेच नसते. आजही पर्यटन उद्योगाकडे आम्ही पुरेशा गांभीर्याने बघायला तयार नाही. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न होत नाहीत. पर्यटकांना सुरक्षितता आणि आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्याच्या संदर्भात सरकारचा पर्यटन विभाग अतिशय सुस्त आणि निष्काळजी आहे. विदेशी पर्यटकांची इथे फसवणूक होते. पिण्याचे शुद्ध पाणी, त्यांच्या अभिरुचीनुसार खाद्यपदार्थ इथे मिळत नाहीत. स्वच्छतेच्या बाबतीत तर बोलायलाच नको. शिवाय पर्यटन स्थळापर्यंतच्या वाहतूक सुविधांच्या बाबतीतही आनंदीआनंद आहे. कुलू, मनालीसारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी ही शोचनीय परिस्थिती असेल तर इतर पर्यटनस्थळांची काय स्थिती असेल याचा सहज अंदाज बांधता येतो. या सगळ्या असुविधा सहन करूनही विदेशी पर्यटक भारतात येत असतात. थोड्याशा प्रयत्नाने या पर्यटकांना उपरोक्त सुविधा उपलब्ध करून देता येत असतील तर आज हजारोंच्या संख्येत असलेले पर्यटक उद्या लाखोंच्या संख्येत दिसतील. त्यायोगे भारताच्या तिजोरीत विदेशी चलना

चीही मोठ्या प्रमाणात भर पडेल. मलेशियातील जेनटिग आयलर्ंडला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. वास्तविक पाहण्यासारखे असे तिथे काहीच नाही. परंतु केबल कार, कॅसिनो आणि मोठ्या प्रयत्नाने जपलेली स्वच्छता, नीटनेटकी सजावट एवढ्याशा भांडवलावर मलेशियन सरकार या पर्यटनस्थळाच्या माध्यमातून प्रचंड विदेशी चलन प्राप्त करीत असते. जेनटिंग आयलर्ंडच्या तुलनेत भारतातील रोहतांगचे निसर्गसौंदर्य कितीतरी पटीने उजवे आहे; परंतु रोहतांगला जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थित सुविधा नाही, केबल कार नाही आणि पर्यटनस्थळी अपेक्षित असलेल्या स्वच्छतेचाही सर्वथा अभाव आहे. आपल्याकडे पर्यटनस्थळी मोठमोठी तारांकित हॉटेल्स उभारली जातात. त्यापेक्षा पर्यटकांना घराची अनुभूती देणारी, ‘पेईंग गेस्ट’ म्हणून पर्यटकांना सामावून घेणारी छोटीछटी घरकुलं उभारली तर तेही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. पाहुण्यांचे आदरातिथ्य

करणे हा भारतीयांचा स्वभावगुण आहे. या स्वभावगुणाला थोडी व्यावसायिक जोड देऊन पर्यटकांना स्थलदर्शनासोबतच

भारतीय संस्कृतीचाही अनुभव देता येईल. मोठमोठ्या हॉटेलद्वारे असा अनुभव देणे शक्य नाही. परंतु आम्ही आमचे मॉडेल विकसित करण्यापेक्षा पाश्चात्त्यांची नक्कल करण्यातच धन्यता मानतो. केवळ पर्यटनाच्याच बाबतीत नव्हे तर उद्योगाच्या बाबतीतही आपल्याकडे दूरदृष्टीचा अभावच आढळतो. वर न्युझिलंडचे उदाहरण आलेच आहे. आम्हीही त्याच पद्धतीने इथल्या निसर्गाशी पूरक ठरणारे उद्योग उभारले असते तर निर्यातक्षम उत्पादनाच्या दृष्टीने ते अधिक सक्षम ठरले असते. फळांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला आपल्याकडे भरपूर वाव आहे. आमचे आंबे, द्राक्ष, सफरचंद विदेशी बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवू शकले असते; परंतु या उद्योगाकडे आम्ही साफ दुलर्क्ष केले. मुळात देशाच्या मूलभूत क्षमतेची
ळख करून घेण्याच्या बाबतीत आपले नेतृत्व कमी पडले. विकासाचे देशी मॉडेल विकसित करण्याऐवजी विदेशी मॉडेलचे आम्ही अंधानुकरण केले. कदाचित त्याचमुळे स्वातंत्र्याच्या 50-55 वर्षानंतरही आम्ही विकसनशील म्हणूनच ओळखले जात आहोत. आमच्या नेत्यांनी जगभर दौरे केले, जग पाहिले, परंतु त्यांना आपलाच देश पाहता आला नाही, ओळखता आला नाही. नेत्यांची ही अदूरदृष्टीच देशाच्या विकासातील अडसर ठरली आहे. त्यामुळेच आपली अवस्था ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू भुललाशी’ अशी झाली आहे.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..