नवीन लेखन...

नवी दिशाभूल




4 रविवार, नोव्हेंबर 2007

पैसा, नाव कमाविण्याचे या जगात अनेक मार्ग, अनेक धंदे आहेत. अंगात फत्त* थोडा बेरकीपणा मुरवावा लागतो. तो मुरवला की बाकी कशाचीच काळजी करावी लागत नाही. एकवेळ मार्गाचा विधिनिषेध बाजूला सारला की जे काही ध्येय गाठायचे असते ते सहज गाठता येते. विधिनिषेधाचा गंधही नसलेल्या अशा अनेक धंद्यांपैकी फसवणूक हा एक धंदा आहे. सगळ्याच प्रांतात हा धंदा चांगल्याप्रकारे चालू शकतो, फत्त* तुमचे व्यत्ति*मत्त्व चांगले असावे लागते, तुमचे बोलणे विद्वत्प्रचूर आणि लाघवी असावे लागते. हे एवढे भांडवल असले की काळजी करण्याचे कारणच नाही. या भांडवलासह तुम्ही नेतेगिरीच्या प्रांतात उतरले तर तुम्हाला मरणच नाही. केव्हाही, कशाही कोलांटउड्या मारा, लोक तुमच्या मागे येतीलच. ‘पंचप्राण’ शरद जोशींनी तरी नेमके काय केले? आपल्या एकाच आयुष्यात इतक्या प्रचंड बौद्धिक कसरती करणारी, इतक्या प्रचंड कोलांटउड्या मारणारी दुसरी व्यत्त*ी आमच्यातरी पाहण्यात आली नाही. शरद जोशींनी आपला प्रवास कुठून सुरू केला आणि आज ते कुठे आहेत, याचा एक आलेखस्वरूप नकाशा काढला तर हिमालयात उगम पावणाऱ्या एखाद्या नदीचा प्रवाह खूप सरळ वाटावा इतका तो वेडावाकडा असेल. या माणसाच्या आत्मविश्वासाला मात्र दाद द्यावीच लागेल. आपण काहीही बोललो, कितीही विरोधाभासी भूमिका घेतल्या तरी लोक आपल्या मागे येतीलच, हा विश्वास त्यांना कुठून मिळतो, हे त्यांनाच ठाऊक. वारा वाहिल तसे हे पाठ फिरवित गेले. आता अलीकडे शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुत्त*ीची भूमिका मांडताच, आपले ‘शेतकरी दूकान’ बंद पडू नये म्हणून जोशी साहेब लगेच पाच लाख शेतकरी आपली कर्जाची कागदपत्रे रामेश्वरम्च्या समुद्रात बुडवतील, अशी गर्जना करून मोकळे झाले. काय गरज आहे रामेश्वरम्ला जायची, इथल्याच नदी-नाल्यात बुडवा ना! त्यापेक्षा या सगळ्या पाच लाख शे
कऱ्यांची कर्जे आपल्या नावावर

वळती करून घेतली तर तुमचे

शेतकरी प्रेम अधिकच उजळून निघेल. कर्जाची कागदपत्रे समुद्रात बुडविल्याने शेतकऱ्यांच्या मागचा बँकांचा ससेमिरा सुटणार आहे का? बँकांजवळ असलेल्या कागदोपत्री पुराव्यांचे काय करणार? लोक ऐकून घेतात म्हणून काहीही बरळायचे का? मागे यांनी शेतकऱ्यांच्या पोरांनी हातात बंदूका घ्याव्यात, असे आवाहन केले होते. कशाला त्या पोरांच्या जीवावर उठता? आधी तुम्ही बंदूक हाती घ्या, किमान एक तरी गोळी चालवून दाखवा आणि मग काय उपदेश करायचा तो करा! परंतु सगळा मामला ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असाच आहे. खरेतर आज शेतकऱ्यांची जी हलाखीची अवस्था आहे त्याला मोठ्या प्रमाणात शरद जोशीच जबाबदार आहेत. जागतिक बँकेत नोकरीवर असल्यामुळे त्यांना जागतिक बॅकेने भारतात जा आणि खुली अर्थव्यवस्था लागु होण्याकरीता योग्य ते वातावरण तयार करा; असे सांगुन भारतात नियुत्त* केले. त्यानंतर शेतकऱ्यांचा विश्वास कमविण्याकरिता विविध आंदोलने उभारण्याचे नाटक केले आणि प्रत्येक लढा अनाकलनीय पद्धतीने अचानकच मागे घेत स्वत:च्या दुकानदारीची व्यवस्थित घडी बसविली. खुल्या अर्थव्यवस्थेचा जोरदार पुरस्कार करीत भारतीय शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेचे स्वप्न विकणाऱ्या शरद जोशींनी आज या शेतकऱ्यांना कुठे नेऊन ठेवले आहे? ज्या व्यवस्थेचा आपण आज पुरस्कार करीत आहोत त्याचे परिणाम उद्या काय होतील, याची त्यांना कल्पना नव्हती असे म्हणता येणार नाही. तेवढे हुशार ते नक्कीच आहेत. परंतु तरीही त्यांनी जागतिक बँकेच्या खाल्ल्या मीठाला जागत बुद्धीपुरस्सर शेतकऱ्यांची दिशाभूल केली. जागतिक बाजारपेठेत आपला शेतकरी टिकू शकणार नाही, हे त्यांना चांगले माहित होते. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाशी टक्कर घेण्याइतकी ताकद सध्यातरी आपल्यात नाही, हेही त्यांना ठाऊक होते. खुल्य
अर्थव्यवस्थेने भले होणार असेल तर ते केवळ इतर देशातील शेतकऱ्यांचेच, याची कल्पना त्यांना होती. तरीदेखील आपल्या अर्थशास्त्रीय ज्ञानाचे तेज पाजळत त्यांनी सरकारवर खुली अर्थव्यवस्था स्वीकारण्यासाठी दडपण आणले. परिणाम काय झाला? आज अमेरिका आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देत आहे. त्यामुळे साहाजिकच अमेरिकन शेतातील कापूस भारताच्या कापसापेक्षा स्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेच्या नियमानुसार धंदा करायचा असेल तर अमेरिकेच्या कापसापेक्षा इथल्या कापसाला अधिक भाव देता यायचा नाही. आणि त्या तुलनेत जो भाव दिला जात आहे, तो शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या सापळ्यात फसत आहे. आता हीच कर्जाची कागदपत्रे रामेश्वरम्च्या समुद्रात बुडवायला जोशी साहेब निघाले आहेत. शरद जोशी राज्यसभेचे सदस्य आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविण्यासाठी त्यापेक्षा चांगला मंच त्यांना मिळू शकत नाही. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशासोबत इथल्या शेतकऱ्यांची होत असलेली विषम आर्थिक स्पर्धा थांबविण्यासाठी अमेरिकेतून किंवा इतर बड्या देशातून आयात होणाऱ्या कृषीमालावर जबर आयात कर लावण्याचा आठाह ते संसदेत धरू शकतात. प्राप्त परिस्थितीत हाच एक प्रभावी उपाय ठरतो. परंतु या विषयावर त्यांनी राज्यसभेत कधी तोंड उघडल्याचे स्मरत नाही. भारतीय शेतकऱ्यांना खुल्या अर्थव्यवस्थेच्या जाळ्यात अडकवून आपल्या शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणात सबसिडी देणाऱ्या अमेरिकेविरूद्ध शरद जोशींनी एक शब्दही कधी उच्चारला नाही. खाल्ल्या मिठाला ते जागत असावेत. जागतिक बँकेत कधी काळी काम करणारे शरद जोशी आजही त्या बँकेचे हित जोपासत आहेत. हा प्रामाणिकपणा त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला असता तर! परंतु मनाने कायम अनिवास
ी भारतीय असलेल्या शरद जोशींनी इथल्या शेतकऱ्यांची केवळ दिशाभूलच केली आणि आजही त्यांचा हाच उद्योग सुरू आहे. पाच लाख शेतकऱ्यांनी रामेश्वरम्ला जाऊन कर्जाची कागदपत्रे बुडविण्याचे आंदोलन ते छेडू पाहत आहेत. हा त्यांचा अजून एक ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे. त्यांची राज्यसभेची मुदत संपत आली आहे. जागतिक बँकेला भारतीय संसदेत आपल्या धोरणांचा पाठपुरावा करणारा त्यांच्या सारखा ‘योग्य’ प्रतिनिधी दुसरा मिळणे शक्य नाही.

त्यांचे संसदेत असणे अमेरिकेची बटीक असलेल्या जागतिक बँकेसाठी गरजेचे आहे.

त्यामुळे दुसऱ्या टर्मसाठी आतापासून ‘फिल्डिंग’ लावणे सुरू झाले आहे. नाव चर्चेत असले की इतरांचे लक्ष वेधून घेणे सोपे जाते. लोकसभेत निवडून येणे शक्य नाही. कारण लोक तेथे जोडे फेकून मारतात हयाची जाण त्यांना आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे चलनी नाणे वापरून आपला दबदबा निर्माण करायचा, एखादा पक्ष गळाला लागतोच. त्याचा वापर करून राज्यसभेत पुन्हा सहा वर्षांसाठी जागा आरक्षित करून घ्यायची, असे साधे सोपे गणित आहे. एकवेळ ही खासदारकी पदरात पडली की ही असली सगळी उठवळ आंदोलने ‘प्रि*झ’ होऊन जातील. या आंदोलनांकडे थोडे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की त्यात कुठेही शेतकरी हिताचा विचार नाही. गव्हाच्या आयातीवर ते बोलत नाहीत. चांगली असो वा वाईट, देशाने आता खुली व्यवस्था स्वीकारलेली आहे; मात्र त्यामुळे खुल्या अर्थव्यवस्थेच्या मुलभुत तत्त्वाला हरताळ फासणाऱ्या कांदा आणि साखरेवर सरकारने लादलेल्या निर्यातबंदीवर मात्र त्यांचे मौन आहे. बाहेरून येणाऱ्या कापसावर आयात कर वाढविण्यासाठी त्यांनी कधी आठाह धरला नाही. ज्यातून काहीही साध्य होणार नाही अशीच, परंतु सनसनीखेज आंदोलने ते छेडत असतात. हा त्यांचा केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’ असतो. दिशाभूल हाच त्यांच्या या ‘धंद्या’चा स्थायीभाव राहत आला आहे, एक संपली की
दुसरी सुरू!
जोशींना काय ”दुकानदारी” करायची आहे ती करू द्या. आपण कोणीच ती थांबवण्याचे कारण नाही. कारण देशात आता खुली अर्थव्यवस्था आहे. शेतकऱ्यांनी मात्र आता जोशींची चलाखी ओळखून त्वरीत आपल्या गावातील, जिल्ह्यातील, आपल्या विश्वासातील जुन्या-नव्या नेते मंडळींनाच निवडावे, त्यांच्या नाकदूऱ्या काढाव्यात; त्यांची मन वळवावीत आणि संघटना पुन्हा मजबुत करावी, हेच योग्य.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..