मी सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहे. भारताच्या ईशान्येस असलेला हा देश क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या तुलनेत कुठेच नाही असे म्हटले तरी चालेल. लोकसंख्या दोन ते तीन कोटींच्या आसपास आणि क्षेत्रफळ जास्तीतजास्त विदर्भाएवढे! त्यातही बराचसा प्रदेश डोंगराळच. हवामानही अतिशय प्रतिकूल. सध्या रात्रीचे तापमान शून्याच्या खाली तीन डिठाी सेल्सिअस एवढे कमी आहे तर दिवसाचे तापमान आपल्याकडे कडक थंडीच्या दिवसांत असते तितके कमी, बहुधा चार ते पाच डिठाी सेल्सिअस एवढे असावे. दूरवर पसरलेली शेते वगैरे प्रकार नाहीच. तेवढी शेतीयोग्य जमीनच नाही. एकूण विचार केला तर भारताच्या तुलनेत नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हवामानाच्या बाबतीत हा देश मागासलेलाच म्हणावा लागेल. परंतु या मागासलेपणाचा या देशाच्या प्रगतीवर परिणाम झालेला दिसत नाही. सगळं काही अनुकूल असूनही भारत अद्यापही प्रगतीसाठी झटतच असताना या देशाने मात्र आर्थिक प्रगतीच्या बाबतीत खूप मोठी मजल गाठली आहे. जे आहे त्यात समाधान मानून त्याचेच सोने करण्याचा आम्हा भारतीयांचा स्वभाव नाही. जे नाही त्यासाठी आपण रडत बसू. आपल्यासोबत किंवा आपल्या पुढे मागे स्वतंत्र झालेल्या अनेक देशांनी मात्र आपल्या मर्यादित क्षमतांचाच वापर करून अल्पावधीत आर्थिक बाबतीत आपल्याला हेवा वाटावी अशी वाटचाल केली आहे. दक्षिण कोरिया अशा देशांपैकीच एक देश आहे. दक्षिण कोरिया, जपान वगैरे देशांमध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे इथे श्रमसंस्कृती खूप चांगल्याप्रकारे विकसित झाली आहे. निसर्गाने किंवा भौगोलिक परिस्थितीने हातचे राखून पदरात टाकलेले दान आनंदाने स्वीकारीत या देशातल्या लोकांनी कुठलीही तक्रार किंवा खळखळ न करता कष्टाच्या जोरावर देशाची श्रीमंती उभी केली आहे. इकडे कुणीही रिकाम्या गप्पा मारत
ना दिसणार नाही. अगदी चौदा-पंधरा वर्षांची मुलेही सतत कुठल्यातरी कामातच दिसतील. हॉटेलमध्ये जा, ताबडतोब काही पोरसवदा तरुण बाहेर
येतील, तुमची गाडी व्यवस्थित योग्य
जागी पार्क करतील, गरज भासली तर ती स्वच्छही करतील आणि तुमच्याजवळ येऊन अतिशय विनम्रपणे उभे राहतील. मेहनत करूनच पैसा कमवायचा किंवा रिकामा वेळ कसल्यातरी उद्योगातच व्यतीत करायचा आणि कोणतेही काम वाईट नसते, कष्टाचा दर्जा वगैरे काही नसतो, हे संस्कार इथे अगदी बालवयातच केले जातात. स्वावलंबन हाच इथल्या जीवनाचा स्थायिभाव आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्याकडे असे दृष्य कधीच दिसत नाही. रिकामा वेळ गप्पांमध्ये घालविला जातो. बरेचदा तर गप्पा मारण्यासाठी कामाला चाट मारून वेळ काढला जातो. विशेष म्हणजे इथे इंठाजीचा वापर अतिशय कमी आहे. हजारातल्या एखाद्याला इंठाजी कळत असेल, परंतु त्याचा न्यूनगंड बाळगताना कुणी दिसत नाही. इंटरनेटची भाषाही इंठाजी नाही. सांगायचे तात्पर्य, खास भारतीय दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास या देशाने प्रगती करावी, असे एकही ठोस कारण या देशाकडे नाही. परंतु तरीही या देशाने जगात स्वत:ची छाप सोडली आहे. एखादा देश प्रगती केव्हा करू शकतो, या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर दक्षिण कोरिया, जपान यांसारख्या नवविकसित देशांचा अभ्यास जरूर करावा. देशाची प्रगती ही उपलब्ध संसाधनापेक्षा त्या देशातील लोकांच्या मानसिकतेवर अधिक अवलंबून असल्याचे आपल्या लक्षात येईल. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या जिद्दीतूनच प्रगतीचे क्षितिज विस्तारत असते. सतत भूकंपाच्या छायेत वावरणारा जपान असो अथवा साधी शेती पण तीसुद्धा पॉलिहाउसेसमध्ये करावी लागणारा दक्षिण कोरिया असो, या देशातले लोक जे नाही त्यासाठी कधीच रडत बसले नाही. इथे बहिणाबाई चौधरींच्या काव्यपंत्त*ी स्मरल्याशिवाय राहत नाही,
‘तिची उलूशीच चो
, तेच दात तेच ओठ
तुले देले रे देवाने दोन हात दहा बोटं’
याच दोन हात आणि दहा बोटांच्या मदतीने या देशातल्या लोकांनी आपल्या प्रगतीचा इतिहास लिहिला, इतिहास घडविला. राज्यकर्ते जनतेच्या लायकीचेच असतात, अशा अर्थाचा एक वाक्प्रचार इंठाजीत आहे. इथले लोक कष्टाळू, दीर्घोद्योगी, आत्यंतिक देशाभिमानी आहेत, त्यामुळे नेतेसुद्धा तसेच आहेत. देशाची धोरणे आणि कायदे प्रगतीला पूरकच आहेत. दक्षिण कोरियाचा बहुतेक प्रदेश पहाडी असला तरी दळणवळणाच्या सुविधा मात्र मुबलक प्रमाणात आहेत. रस्ते, रेल्वे यांच्या वाहतुकीचा दर्जा पाहून थक्क व्हायला होते. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांचा किमान सरासरी वेग 100 ते 125 किलोमीटर प्रतितास असतो. रेल्वेगाड्या 250 ते 300च्या गतीने धावतात. रस्ते अतिशय रुंद आणि चकचकीत. कुठेही घाण किंवा कचरा दिसणार नाही. केवळ कायदे करून या गोष्टी शक्य होत नसतात. लोकांनाच स्वच्छतेची सवय असावी लागते. तशी ती इथल्या लोकांना आहे. आपल्या शहराचे, आपल्या देशाचे नाव खराब होऊ नये म्हणून सगळेच अतिशय सतर्क असतात. वेळेच्या, शिस्तीच्या बाबतीतही कोरियन माणूस अतिशय चोख असतो. इथे महागाई मात्र खूप आहे. साध्या ब्रेडच्या पुड्यासाठी दोन हजार वॉन (कोरियन चलन) द्यावे लागतात. हजार वॉनच्या खाली कोणतीही वस्तू मिळत नाही. पोत्याने पैसे न्या आणि मुठीत मावेल एवढे सामाना आणा, अशीच परिस्थिीत आहे. खाद्यपदार्थ तर जरा जास्तच महाग आहेत आणि त्याचे कारणही स्पष्टच आहे. इथे फारसे काही पिकतच नाही. जी काही थोडीफार शेती होते त्यातही अमेरिकन कंपन्यांनी लूटमार चालविली आहे. खते, बियाणे, कीडनाशके सगळेच अमेरिकन कंपन्यांकडून घ्यावे लागते. भारताप्रमाणे इथेही या कंपन्यांची मनमानी सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात या देशाने चांगली प्रगती केली आहे. ‘हुंदाई’ ही कंपनी दक्षिण कोरियाची शान आहे. मोटारगाड्यांपासून द
नंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत सगळ््याच उत्पादनात या कंपनीची मत्ते*दारी आहे. खरेतर याच एका कंपनीच्या जोरावर दक्षिण कोरियाने आंतरराष्ट्रीय बाजारात आपला ठसा उमटवला आहे, असे म्हणता येईल. भारत आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांत अनेक बाबतीत प्रचंड तफावत असली तरी काही बाबतीत
दोन्ही देशांच्या परिस्थितीत खूपच साम्य आहे. भारतासाठी ज्याप्रमाणे पाकिस्तान हे
एक अवघड जागेचे दुखणे आहे त्याचप्रमाणे दक्षिण कोरियासाठी उत्तर कोरिया ही एक डोकेदुखी आहे. रशियन साम्यवादाच्या प्रभावाखालील उत्तर कोरिया आणि अमेरिकन भांडवलशाहीच्या गोटातील दक्षिण कोरियात अगदी विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. या देशातला माणूस त्या देशात गेलेला सहन होत नाही आणि तिकडचा इकडे आलेला खपत नाही. त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर नेहमीच तणाव असतो. हे एक साम्य झाले आणि दुसरे साम्य म्हणजे भारत आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांत अमेरिकन कंपन्यांनी सारखाच धुडगूस घातलेला आहे. केवळ शेतीच्या क्षेत्रातच नव्हे तर इतरही उत्पादनांच्या क्षेत्रात या कंपन्यांनी आपली आर्थिक मत्ते*दारी निर्माण करण्याचा प्रयत्न या दोन्ही देशांत चालविला आहे. आज दक्षिण कोरिया आर्थिक दृष्टीने भारतापेक्षा प्रगत दिसत असला तरी ही प्रगती अमेरिकन प्रभावाने बाधित झालेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अमेरिकन कंपन्यांनी इथल्या बाजारपेठेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कब्जा मिळविला आहे की उद्या या कंपन्यांनी दक्षिण कोरियातून काढता पाय घेतला तर हा देश कोसळायला वेळ लागणार नाही. भारतातही तेच होऊ पाहत आहे. अशावेळी देशातले राज्यकर्ते अतिशय जागरूक, धोरणी आणि देशहिताला प्राधान्य देणारे असावे लागतात. अमेरिकेच्या आशीर्वादाने विकसित झालेल्या तिसऱ्या जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था आज अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत आहे, दुसरा पर्
यायच शिल्लक नाही. त्या देशांच्या मूलभूत क्षमता गिळंकृत करून अमेरिकेने त्यांना कायमस्वरूपी अपंग करून ठेवले आहे. भारताचीही वाटचाल त्याच दिशेने होत आहे. डॉलरच्या चष्म्यातून विकासाकडे पाहणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांना या धोक्याची जाणीव नाही. दक्षिण कोरिया आणि त्याच्याच सारख्या इतर काही देशांनी अमेरिकेचा पदर धरून आपला विकास साधला असला तरी विकासाची आपली अंगभूत क्षमता हे देश गमावून बसले आहेत. त्यामुळे या देशांच्या विकासाने भारावून जाण्यापूर्वी त्या विकासापोटी या देशांनी काय गमावले याचाही विचार करणे गरजेचे आहे. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही जगरहाटी आहे. या देशांचा हा अनुभव लक्षात घेऊनच भारताने अमेरिकेच्या किंवा इतर कोणत्याही देशाच्या कितपत आहारी जावे, याचा निर्णय घ्यायला हवा. अर्थात हा विचार करण्यासाठी आपले नेतृत्व डोळस असायला हवे. सध्यातरी आपले नेते डोळ्यांवर झापडं लावून केवळ विकासाकडे टक लावून पाहत आहेत. त्यामुळे त्या विकासाच्या अनुषंगाने येऊ घातलेल्या आजूबाजूच्या घातक गोष्टी त्यांच्या नजरेस पडण्याची शक्यताच नाही. ही झापडे हटवणे गरजेचे आहे. विकास कुणाला नको आहे, परंतु त्यासाठी देशाचे स्वातंत्र्य बाधित होणे मात्र कुणालाही मान्य होणार नाही.
थ्
— प्रकाश पोहरे
Leave a Reply