16 रविवार,डिसेंबर 2007
पैसा कमविणे ही एक कला समजली जाते. प्रत्येकालाच ही कला साधते असे नाही. त्यामुळे बरेचदा आर्थिकदृष्टीने मोठे होण्याची पूर्ण क्षमता असूनही अनेकांना गरिबीतच खितपत पडावे लागते. उलट केवळ ही कला साध्य झाल्याने इतर बाबतीत जेमतेम योग्यतेची माणसेही प्रचंड पैसा कमावताना दिसतात. या कलेत तरबेज असलेले लोक कशाचा धंदा करतील, कोणत्या कचऱ्यातून सोने बाहेर काढतील याचा नेम नसतो. त्यांच्या या कलेचे कौतुक असले तरी कुठेतरी विधिनिषेध असायला हवा, कुठेतरी नैतिकता जपली जावी, असे वाटणे स्वाभाविक आहे. शेवटी पैसा आयुष्याचे सर्वस्व नसते. तसे असते तर सगळीच श्रीमंत माणसे सुखी झालेली दिसली असती. पैशाने बऱ्याच गोष्टी साध्य करता येत असल्या तरी हा पैसा मानसिक समाधान देईलच असे नाही. कदाचित यासाठीच आपल्या संस्कृतीने धर्म; अर्थ; काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ सांगताना अर्थाचे स्थान धर्मानंतर ठेवले असावे. परंतु आजकाल हा विधिनिषेध कुणी फारसा बाळगताना दिसत नाही. पैसा कमविणे हेच एकमेव लक्ष्य असते आणि ते कोणत्याही प्रकारे साध्य करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. 1965 साली म्हणजे जवळपास 40 वर्षांपूर्वी वडिलांसोबत पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो. आम्ही सगळे कुटुंबीय चौपाटीवर गेलो. भेळ-पुरी वगैरे खाल्ली. बाजूलाच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. पाणी पिऊन निघालो तोच त्या पाणीवाल्याने आम्हाला आवाज दिला आणि पाण्याचे पैसे मागितले. पहिल्यांदाच मुंबईला गेलो असल्याने साधे पिण्याचे पाणी विकत मिळते, ही कल्पनाच करणे शक्य नव्हते. त्याच्याशी वाद घातला, परंतु शेवटी पैसे द्यावेच लागले. दोन घोट पिण्याच्या पाण्याचाही धंदा होऊ शकतो, हा विचारच प्रचंड अस्वस्थ करून गेला. अकोल्याच्या जुन्या माळीपुऱ्यातील आमचे पूर्वचे घर म्हणजे शेतातील वाडाच होता. तेथे आमच्याकडे भरपूर
ाई-म्हशी होत्या. भरपूर दही-दूध व्हायचे. हा सगळा कारभार आमच्या
आजीकडे आणि नंतर आमच्या
आईकडे असायचा. जवळपास रोजच रवी लागायची. ताक तयार व्हायचे. हे ताक संपूर्ण मोहल्ल्यातील लोक अगदी शिस्तीत उभे राहून फुकटात घेऊन जायचे. त्या पाणीवाल्याला पाण्याचे पैसे देताना हे चित्र सर्रकन डोळ्यासमोरून गेले. पुढे हळूहळू लक्षात आले की मुंबईत काहीही विकल्या जाऊ शकते आणि काहीही विकत घेतल्या जाऊ शकते. पुढे धंद्याचे हे लोण सगळीकडे पसरले. आता खेड्यात जनावराचे शेणही विकल्या जाते.
लोकांच्या या धंदेवाईक वृत्तीने देवालाही सोडलेले नाही. गाईला चारा देणे हे पुण्याचे काम या मानसिकतेतून मुंबईला एक मोठे मजेशीर दृष्य पाहायला मिळते. अनेक ठिकाणी काही महिला त्यांच्या घरची गाय घेऊन रस्त्याच्या कडेला बसतात. सोबत छोट्या-छोट्या गवताच्या जुड्या असतात. गाईविषयी श्रध्दा असणारे भाविक तिच्या जवळील गवताची छोटीशी जुडी 2 रूपयाला विकत घेतात व त्या गाईला खाऊ घालतात. दिवस संपला म्हणजे ती बाई त्या गाईला घेऊन घरी जाते व दूध काढून विकते. आहे ना मजेशीर, म्हणजे गाय माझी, गवत तुमचे आणि पैसा व दूध मात्र माझे.
आतातर भांडवल गुंतविण्यासाठी ‘देव’ हे सगळ्यात सुरक्षित क्षेत्र समजले जाते. कोणत्याही मंदिरात जा, तो देव, त्याचे भत्त* बाजूलाच राहतात आणि तिथे बजबजपुरी माजली असते ती भत्त*ीच्या दलालांची. पंढरपूरचा विठोबा बडव्यांनी ‘हायजॅक’ केलेला आहे. साईबाबांच्या शिर्डीतही काही वेगळे दृष्य दिसत नाही. आपले संपूर्ण आयुष्य फकिरीत घालविलेले साईबाबा आता केवळ श्रीमंतांचे होऊन उरले आहेत. फुलांचा एक हार कितीवेळा बाबांच्या चरणी जाऊन पुन्हा दुकानात लटकतो, हे सांगता यायचे नाही. बाबांच्या दारातही आयपी, व्हिआयपी, व्हिव्हिआयपी अशी भत्त*ांची ‘कॅटेगिरी’ असते. बाहेर तुमची पोच किती आहे यावर आतमध्ये तुम्ही किती लवकर प
हचू शकता, हे ठरत असते. तिरूपतीचे श्री बालाजी याला अपवाद नाहीत, नव्हे स्पेशल दर्शनाचे हे लोण बहुधा तिरूपतीवरूनच सगळीकडे पोहचले असावे. तासन् तास रांगेत तिष्ठणाऱ्या आणि संपूर्ण पहाड पायी चालून येणाऱ्या भत्त*ाला तिरूपती बालाजींचे दुरून ओझरते दर्शन होत नाही तोच धक्के मारून पुढे काढले जाते आणि पैसेवाल्यांची मात्र विशेष सोय केली जाते. जो जेवढे जास्त पैसे देईल, तेवढे त्याला सावकाश व अगदी गाभाऱ्यात जवळून बालाजीचे दर्शन घडू शकते.
या सगळ्यात अपवाद केवळ शेगावचा. गजानन महाराजांच्या शेगावात मात्र संस्थानच्या नि:स्पृह पदाधिकाऱ्यांमुळे भत्त*ीचा बाजार मांडल्या गेलेला नाही. शिस्त, स्वच्छता आणि पारदर्शक कारभार शेगावचे वैशिष्ट्य आहे. इतरत्र मात्र बहुतेक सगळ््याच ठिकाणी देवाच्या नावाने अक्षरश: बाजार मांडल्या गेला आहे. ‘भत्त*ी’चे नाणे कोणत्याही देवाच्या बाजारात आणि कोणत्याही परिस्थितीत चालते हे जाणून असलेल्या लोकांनी शक्य होईल त्या दगडाला शेंदूर फासण्याचा सपाटा लावला आहे.
अकोल्यापासून जवळच गायगाव नावाचे एक गाव आहे. गावातील काही जुन्या शेतकऱ्यांनी गणपतीचे छोटेसे देऊळ 70-80 वर्षांपूर्वी रस्त्याच्या बाजूला बांधले. नंतरच्या काळात म्हणजे अगदी आता आता 5-7 वर्षांपूर्वी अकोल्यातील काही लोभी व स्वार्थी लोकांनी त्याला अत्यंत व्यावसायिक पद्धतीने प्रसिद्धीस आणले. गेल्या 5-7 वर्षांपासून तिथे दर गुरूवारी, चतुर्थीला भत्त*ांची तोबा गर्दी असते आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. 00000
पान 1 वरून
मंदिरावर हक्क सांगणाऱ्याने तेथे हार-फुले, उदबत्त्या, कुंकू व नारळाचे दुकान तर लावलेच सोबतीला गुटखा, तंबाखूची पानटपरीही उघडली. काही भत्त*ांच्या मागणीनुसार तेथे गांजाही मिळतो, असेही समजते. मंदिरात वाहिल्या जाणारे हार आणि नारळ पुन्हा पुन्हा त्या दुकानात परत येतात आणि नवीन-न
ीन भत्त* ते पुन्हा पुन्हा विकत घेतात आणि त्याद्वारे भरपूर कमाई मंदिर राखणाऱ्याची होऊन जाते. त्याशिवाय पेटीत जमा होणारे पैसे रात्री मग त्या मंदिरावर हक्क सांगणाऱ्याच्या खिशात ‘पसार’ होतात. वास्तविक हे मंदिर किमान 70-80 वर्षांपासून तिथे आहे.
परंतु हे स्थान जागृत असल्याचा साक्षात्कार मागील 7-8 वर्षांपूर्वीच
झाला आणि मंदिराच्या बाजूला असणाऱ्या एका बनिया वृत्तीच्या माणसाने त्या मंदिराला स्वत:च्या शेताचा भाग दाखवून तेथे धंदा मांडला. या गणपतीला ‘जागृत’ करण्याचे पुण्यकर्म करणारे आता तिथे भत्त*ांच्या भत्त*ीचे पीक कापत आहेत आणि गावकरी मंडळी केवळ हताश होऊन त्याकडे बघत आहेत.
अकोल्यातच एका ठिकाणी एका बहाद्दराने चक्क एका दुकानाच्या गाळ्यात मंदिर थाटून दिले आहे. देवाचेच दुकान मांडण्याची त्याची ही कल्पना अफलातूनच म्हणावी लागेल. रस्त्याच्या कडेला कुणी तरी दगडाला शेंदूर फासतो वा हनुमानजीची किंवा संत गजानन महाराजांची वा देवीची छोटीसी मूर्ती स्थापन करतो. मग हळूच तिथे कुणीतरी छोटेसे मंदिर बांधतो; मग पडवी, कालांतराने मंडप, मग मोठे मंदिर दरवर्षी भंडारा हे सगळे ठरून गेले आहे आणि हळूच मग तेथे कुणीतरी कब्जा करून बसतो. शिक्षणाचे प्रमाण कितीही वाढू देत, समाजातली अंधश्रद्धा कुठेही कमी झालेली दिसत नाही तर ती दिवसेंदिवस वाढतच आहे आणि तिने गंभीर स्वरूप धारण केले आहे. जे देवाप्रती नास्तिक आहेत त्यांनी आपल्या आस्थांसाठी वेगळे पर्याय शोधले आहेत आणि जे आस्तिक आहेत त्यांची आस्था त्यांच्या बुद्धीची कवाडे बंद करण्याइतपत सशत्त* आहे. लोकांच्या याच देवभोळेपणाचा फायदा व्यावसायिक वृत्तीचे लोक उपटत आहेत. तिकडे तुम्ही चंद्रावर जा अथवा मंगळावर जा, काहीही फरक पडत नाही. आजही शेंदूर लावलेला दगड आमचे पाय थोपवून धरतो. एकीकडे विज्ञानाची प्रगती होत आहे, शिक्षणाचे प्रमाण वाढ
आहे आणि दुसरीकडे मंदिरातली गर्दीही वाढत आहे, हे समीकरण तसे फारसे अनाकलनीय नाही. आजकाल आयुष्य अतिशय धकाधकीचे झाले आहे. सगळ्याच क्षेत्रात प्रचंड जीवघेणी स्पर्धा आहे. आयुष्याच्या या समरांगणात प्रत्येकाच्या वाट्याला विजय येईलच असे नाही. परिणामी पराजयाच्या धास्तीनेच लोक श्रद्धाळू, दैववादी होत आहेत. मठात, मंदिरात ते मानसिक आधार शोधत असतात. त्यांच्या या भोळ्या श्रद्धेचाच गैरफायदा घेतला जातो. त्यातही गंमत ही आहे की, प्रत्येकाला केवळ आपलीच श्रद्धा तेवढी अस्सल आणि इतरांची ती अंधश्रद्धा वाटते. त्यामुळे प्रत्येकजण दुसऱ्यांकडे बोट दाखवत असतो. वास्तविक आपले काम हीच आपली पूजा आहे. ही पूजा प्रामाणिकपणे केली तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. यशाच्या संदर्भात जुगार खेळायचाच असेल तर तो मंदिरात जाऊन न खेळता घाम गाळून खेळणे कधीही अधिक फायद्याचे ठरेल. परंतु लोकांना हे पटत नाही. ‘जत्रा में फतरा बिठाया, तिरथ बनाया पानी’ म्हणणारे संत कबीर थकले, ‘मनी नाही भाव अन् म्हणे देवा मला पाव’ म्हणणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
मातीचा देव त्याले पाण्याचा भेव,
दगडाचा देव त्याले कुत्र्याचा भेव,
लाकडाचा देव त्याले आगीचा भेव,
सोन्याचा देव त्याले चोराचा भेव
असे सांगत सांगत निजधामास गेले, परंतु लोक सुधारले नाहीत. हातात खराटा घेऊन ठाामसफाईचे महत्त्व सांगणाऱ्या कर्मयोगी संत गाडगे महाराजांची शिकवणही लोक विसरून गेलेत. लोकांच्या या देवभोळेपणाचे रहस्य त्यांच्या कमकुवत मानसिकतेत दडले आहे. ही मानसिकता जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत देवाचा, भत्त*ीचा धंदा असाच सुरू राहणार आहे. आपण मात्र जगत्गुरू संतश्री तुकाराम महाराज सांगून गेले त्यानुसार
‘तुका म्हणे उगे राहावे
जे जे होईल ते ते पाहावे’
हे विसरून प्रहार करीत जावे, एवढेच आपल्या हाती.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply