प्रकाशन दिनांक :- 15/06/2003
पृथ्वीतलावर मानवाचे आगमन होऊन लक्षावधी वर्षांचा कालखंड उलटला आहे. या लाखो वर्षांचे कालखंडात मानवाने खरोखरच स्मितीत करुन सोडणारी प्रगती केली. निसर्गदत्त अवस्थेत कच्चे अन्न खाऊन जगणारा मानव ते ब्रह्यांडाच्या अफाट पसाऱ्यात पृथ्वीतलावरील जीवसृष्टीसारखीच जीवसृष्टी आणखी कुठे अस्तित्वात आहे काय, याचा शोध घेणारा मानव हा प्रवास खरोखरच थक्क करुन सोडणारा आहे. ही अफाट प्रगती शक्य झाली ती केवळ विज्ञानामुळेच! मात्र असे असले तरी विज्ञानाच्या माध्यमातून मानवाने अर्जित केलेले ज्ञान किंवा उघड केलेली निसर्गाची, काळाची गुपिते एकूण अज्ञाताच्या एक टक्काही नाहीत, हे सत्य ख्यातनाम वैज्ञानिकही नाकारत नाहीत.
साधे उदाहरण आहे. एखादा माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते? तर अवघ्या क्षणभरापूर्वी हालचाल करीत असलेले शरीर अचानक निश्चिेष्ट होते. तसे बघितले तर शरीर तर तेच असते. जिवंतपणीचे शरीर आणि मृतदेह, यामध्ये हृदयाची स्पंदने बंद होण्याव्यतिरिक्त काहीही फरक झालेला नसतो. मग क्षणभरापूर्वी धडपडत असलेले हृदय एकाएकी का बंद पडते? अशी कोणती गोष्ट त्या शरीरातून कमी झालेली असते की अचानक हृदयाची हालचाल बंद होते आणि आपण त्या व्यक्तीला मृत जाहीर करतो? नाही साग्ंाता येत . अगदी विज्ञानालाही छातीठोकपणे नाही सांगता येत. मात्र त्या शरीरातून कुठली तरी गोष्ट कमी झाल्याशिवाय तर काही अवघ्या क्षणभरापूर्वी चेतना असलेले शरीर अचेतन होणार नाही. जिवंत शरीरातून जी गोष्ट निघून गेल्यामुळे त्या शरीराचे रूपांतर कलेवरात होते त्या गोष्टीला कुणी आत्मा म्हणून संबोधतो, कुणी चैतन्य म्हणून तर कुणी जीव म्हणून! अख्ख्या ब्रह्यांडाचा शोध घेण्यासाठी निघालेल्या मानवाला स्वत:च्या शरीरासंदर्भातील हे रहस्य मात्र अद्यापही उलगडता आलेले नाही.
आत्मा, चैतन्य किंवा जी
व या नावाने ओळखल्या जाणारी गोष्ट दाखवून तर देता येत नाही, पण तिचे अस्तित्वही
नाकारता येत नाही. अशाचप्रकारे ब्रह्यांडात
अशा काही सुप्त शक्ती जरुर आहेत की, त्यांचे अस्तित्व तर सिद्ध करता येत नाही, पण त्या मानवाच्या चित्तवृत्तीवर अवश्यंभावी परिणाम करतात. हा परिणाम दोन प्रकारे होतो. कधी त्या सूप्त शक्तींमुळे मानवाच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात तर कधी मनुष्य अस्वस्थ होतो. साधे धुराचे उदाहरण घ्या. एखाद्या खोलीत कापूर किंवा धूप जाळा. त्यापासून निर्माण होणाऱ्या धुराने चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. आता त्याच खोलीत मिरच्या जाळा. तुम्ही त्या खोलीत क्षणभरही थांबू शकत नाही. वास्तविक कापूर किंवा धूप जाळला काय अन् मिरच्या जाळल्या काय, दोन्ही वेळी निर्माण होतो तो एकसारखा दिसणारा धुरच! मग त्यामध्ये असा काय फरक आहे की, कापूर किंवा धूप जाळल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात आणि मिरच्या जाळल्याने ठसका लागतो? फरक निश्चितपणे दोन वेगवेगळे पदार्थ जाळल्यामुळे तयार होणाऱ्या दोन निरनिराळ्या अदृश्य तत्त्वांचा असला पाहिजे.
असाच अनुभव वाद्यांच्या बाबतीतही येतो. सनई, चौघडा, मृदंग, तबला, टाळ,बासरी ही वाद्ये मंगलवाद्य म्हणूनच ओळखली जातात. कारण ही वाद्ये वाजविली जातात तेव्हा आपोआपच मंगलमय वातावरण निर्माण होते. वातावरण पावित्र्याने भारुन जाते. उपस्थितांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात आणि त्यांच्या मनात वाईट विचारांना अजिबात थारा मिळत नाही. याउलट ताशे, डफळे, ढोल ही वाद्ये बघा. या वाद्यांच्या आवाजाने उपस्थितांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा जोश निर्माण होतो. त्यांचे बाहू स्फूरण पावू लागतात. आपोआपच आक्रमक प्रवृत्ती त्यांच्यात भिनते. कुणालातरी मारण्यासाठी हात शिवशिवतात. थोडक्यात मनुष्य हिंसक होतो. त्याच्यात राक्षस संचारतो. एवढेच नव्हे तर एक प्रकारचा स
मूहिक उन्माद (श्र्ीेे प्ब्ेूीग्र्ी) निर्माण होतो. अशा सामूहिक उन्मादाने घेरलेल्या समुहाला चंागल्यावाईटाचे भान राहत नाही. ते बेभान आणि हिंसक झालेले असतात. त्या विशिष्ट कालखंडापुरती भीतीचे भावनाही त्यांना स्पर्श करत नाही. मागेपुढे न बघता तुटून पडणे, हीच त्यांची प्रवृत्ती बनते. त्यामुळेच अशा वाद्यांचा उपयोग पूर्वी युद्धप्रसंगी किंवा देवीदेवतांना बळी चढवितांना किंवा शिकारीच्या वेळी केल्या जात असे.
वास्तविक दोन्ही प्रकार वाद्यांचेच. तालबद्ध नाद निर्माण करणारे. असे असतांनाही एका गटात मोडणारी वाद्ये मनुष्याच्या सौम्य प्रकृतीला चालना देतात तर दुसऱ्या गटातील वाद्ये त्याच्यातील हिंस्त्र पशू जागवतात. खरे म्हटले तर वाद्यांमुळे मनुष्याच्या शरीरावर तर थेट काही परिणाम होत नाही किंवा त्याच्या शरीरातही काही फेरबदल घडून येत नाही. तरीदेखील वाद्यांच्या नादाचा मनुष्यावर परिणाम होतो, हे मात्र निश्चित. आमच्या पूर्वजांनी हे जाणले होते. त्यामुळेच त्यांनी विशिष्ट प्रसंगासाठी विशिष्ट प्रकारची वाद्ये अशी रचना करुन ठेवली होती. विवाहाला आपण मंगल सोहळा किंवा मंगल परिणय म्हणूनही संबोधतो. कारण तो दोन जीवांच्या आयुष्यभराच्या मीलनाचा, त्यांचे भावविश्व बदलवून टाकाणारा सोहळा असतो. त्या सोहळ्यातूनच पुढील पिढीच्या आगमनाचे बीज रोवल्या जात असते. मनुष्याच्या जीवनाला एक वेगळेच वळण देणारा, अतिशय महत्त्वपूर्ण असा तो प्रसंग असतो. त्यामुळेच आमच्या पूर्वजांनी विवाहाला सोळा संस्कारामधील एक संस्कार मानले आणि त्या मंगलमय प्रसंगासाठी मंगलवाद्यांची योजना केली.
दुर्दैवाने, आजकाल प्रसंग कोणताही असो, वाद्ये मात्र आम्हाला ढोल आणि ताशे हीच हवी असतात. मग तो विवाह सोहळा असो अथवा गणरायाचे किंवा दुर्गादेवीचे आगमन असो. वास्तविक हे मंगल प्रसंग. मात्र अशा मंगल प्रस
गीही आम्ही मनुष्यातील हिंस्त्र प्रवृत्तीला चालना देणारी ढोल, ताशे ही वाद्ये वाजवतो. त्याचा दिसायचा तो परिणाम दिसतोच. आजकाल विवाह सोहळ्यांमध्ये वर आणि वधू पक्षामध्ये किंवा वरातीतील मंडळी आणि रस्त्याने ये-जा करणारे यांच्यात मारामाऱ्या होण्याचे प्रकार नवे राहिलेले नाहीत. गणराय किंवा आदिशक्तीच्या आगमन प्रसंगीही तेच. तुमच्या स्मरणात असा एखादा प्रसंग असेल तर आठवून बघा, नक्की त्यावेळी ढोल, ताशे अशी वाद्ये वाजत असतील. सनई, चौघड्यासारखी मंगलवाद्य
वाजत असलेल्या विवाह सोहळ्यात मारामारी किंवा रुसवेफुगवे झाल्याचे उदाहरण माझ्या
तरी स्मरणात नाही आणि मला खात्री आहे की, तुमचाही अनुभव तोच असेल. आमच्या परिचयातील एका मुलीचा काही वर्षपूर्वी विवाह झाला. कोणताही आजार नसलेली, सदा हसतखेळत राहणारी हुशार, कामसू, मुलगी. मात्र लग्नानंतर दोनचार दिवसातच ती वेड्यासारखेच आचरण करु लागली. विवाहापूर्वी तिने कधीच असे आचरण केले नव्हते. माहेरी वेडेपणाची पृष्ठभूमीही नाही. काही दिवसातच अचानक ती सामान्य झाली. आता वेडेपणाचे एकही लक्षण तिच्यात नव्हते. तेव्हापासून ती बिलकूल सामान्य आहे आणि सुखाने संसार करीत आहे. मग तिच्या आचरणात अचानकपणे काही दिवसांसाठी बदलाचे स्पष्टीकरण कसे देता येईल? अस्तित्व दाखवून न देता येणाऱ्या ब्रह्यांडातील काही सूप्त शक्तींचा तर तो प्रभाव नसावा? तिच्या विवाहप्रसंगी वाजविण्यात आलेल्या, हिंस्त्र प्रवृत्तीला चालना देणाऱ्या इष्ट देवतांच्या ऐवजी दुष्ट देवता, विघ्न देवतांना निमंत्रित करणाऱ्या वाद्यांचा तर तो परिणाम नसावा?
कुणाला कदाचित हे अंधश्रद्धेला खतपाणी वाटेल. कुणाला व्यक्तिस्वातंत्र्यावरील घालाही वाटेल. आम्ही केव्हा, कोणती वाद्ये वाजवावित हे सांगणारे तुम्ही कोण, असा प्रश्नही ते उपस्थित करु शकतात. मात्र शेवटी हा ज्याच्या-त्याच
्या बुद्धीचा प्रश्न आहे. त्यामुळेच निर्णय ज्याचा त्याच्यावरच सोडलेला इष्ट!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply