प्रकाशन दिनांक :- 11/07/2004
अलीकडील काळात आत्महत्यांचे प्रमाण अतिशय वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी, विद्यार्थी, पोलिसासारख्या सरकारी विभागातील कर्मचारी आणि लहान-मोठे उद्योजकदेखील आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग चोखाळत आहेत. या घटना समाजाच्या सुदृढतेचे लक्षण आहेत, असे खचितच म्हणता येणार नाही. जगण्याची स्पर्धाच इतकी तीप झाली आहे की, त्या स्पर्धेचे दडपण असह्य होवून स्पर्धेतून कायमचे बाद होण्याचा विचार बळावू लागला आहे. अपयशाची भीती बाळगून स्वत:ला संपविण्याचा हा वाढता प्रकार समाजाच्या अस्तित्वासाठीच घातक ठरू शकतो. सद्य:स्थितीत नैराश्यामुळे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसोबतच विशेषत: विद्यार्थीवर्गात किंवा युवावर्गात वाढत चाललेले नैराश्येचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक असतो. त्यामुळे हा विद्यार्थी घडविताना आपण एका सुदृढ समाजाची पायाभरणी करीत आहोत, ही जाणीव विद्यार्थ्याला घडविणाऱ्या सगळ्याच घटकांनी बाळगायला पाहिजे. त्या दृष्टीने विचार केल्यास शिक्षक, शैक्षणिक व्यवस्था, शैक्षणिक मूल्य आणि सरतेशेवटी अर्थार्जनाच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्त्व या सगळ्याच गोष्टींचे मूल्यमापन होणे काळाची गरज ठरली आहे.
विद्यार्थ्यांना घडविण्यात पालकांइतकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक गुरुजनांचा वाटा असतो. परंतु खेदाने असे म्हणावे लागते की, विद्यार्थ्यांना दिशादर्शन करणारे गुरुजनच आज भरकटले आहेत. बालमनावर सर्वाधिक परिणाम शाळा आणि शिक्षकांचा होत असतो, या वस्तुस्थितीच्या पृष्ठभूमीवर सध्याच्या शालेय वातावरणाचा आणि शिक्षकांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतल्यास येणारी पिढी अतिशय आत्मकेंद्रित, एकांगी विचाराची आणि एकूणच जीवनमूल्य हरविलेली निपजल्यास आश्चर्य वाटू नये. पूर्वीच्या काळी शिक्षका
ंना साक्षात परब्रह्याची उपाधी दिली जात असे. त्या काळचे शिक्षकही खऱ्या अर्थाने ‘गुरू’ होते. काळाच्या ओघात गुरूंचे गुरुपण लोप पावत त्यांचे अनुदानित शाळांमधील शिक्षकात परिवर्तन झाले आणि एकूणच शिक्षण मूल्यहिन होण्यास सुरुवात झाली. आज विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आपुलकी आणि आदर नाही. ‘डोनेशन’ देऊन लागलेले शिक्षकही विद्यादानाचे
कार्य ‘ड्युटी’ समजून करतात. विद्यादान हे आपले
जीवित कार्य आहे, तो आपला धर्म आहे. ही भावना केव्हाच लोप पावली आणि त्यासोबतच लोप पावलेत ते सेवाभावी, चारित्र्यवान गुरुजन! आज शिक्षकांची बांधीलकी विद्यार्थी किंवा विद्यादानाशी राहिलेली नाही. त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो वेतन, वेतनवाढ आणि महागाई भत्ता. एकूणच शिक्षक आणि शिक्षणाच्या बदलत्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला वाव उरलेला नाही.
शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासापुरते मर्यादित झाले आहे. त्यामुळे एक संपूर्ण नागरिक निर्माण होण्याऐवजी पुस्तकी ज्ञानावर आधारित पोपटपंची करणारा एक सामान्य माणूस निर्माण करण्यापलीकडे अधिक उपलब्धी शिक्षणाची राहिली नाही. विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष अमूक विषयात अमूक एवढे गुण मिळविण्यावरच केंद्रित झाले. गुणपत्रिकेवरील निर्जीव आकड्यांना अत्याधिक महत्त्व प्राप्त झाल्याने पूर्वीच्या काळी शाळा, महाविद्यालयांना असलेले संस्कार केंद्राचे महत्त्व आज जवळपास संपुष्टात आले आहे. शाळेतून केवळ पुस्तकी ज्ञान दिल्या जात असल्याने विद्यार्थीवर्गाने पर्यायाचा शोध सुरू केला. विविध विषयांच्या गाइड, अपेक्षित प्रश्न आणि उत्तरे (गेसिंग) असलेली पुस्तके, केवळ परीक्षेतील गुण वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरणारे कोचिंगक्लासेस शाळा- महाविद्यालयांचा पर्याय ठरु लागले. या एकंदर प्रकाराने शिक्षणाचे पा
ित्र्यच संपुष्टात आले. याचा परिणाम हा झाला की, एकांगी विकास झालेला विद्यार्थी व्यावहारिक पातळीवर अपयशी ठरु लागला. ज्या वयात आयुष्य घडविण्याचे मूल्य, क्षमता आणि विचार रुजायला पाहिजेत त्या वयात केवळ पुस्तकी पाठ विद्यार्थ्यांना दिल्या गेल्याने ज्यावेळी प्रत्यक्ष जीवनातील आव्हानांचा सामना करण्याची वेळ आली त्यावेळी कालचा विद्यार्थी आणि आजचा युवक निराशेने ठास्त होवू लागला. पुढे काय करावे हे न सुचल्याने त्याच्या मनात आत्यंतिक निराशा दाटून येऊ लागली. शेवटी त्यांच्याचपैकी काहींनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला. विद्यमान शिक्षण प्रणालीचे हे दारूण अपयशच म्हणावे लागेल. भविष्यात हा एक गंभीर सामाजिक प्रश्न ठरु शकतो. या प्रश्नाचा वेळीच विचार करणे गरजेचे आहे, अन्यथा उद्याची पिढी केवळ भरकटलेलीच नव्हे तर मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेली असेल. हे टाळायचे असेल तर सुरुवात शिक्षक या महत्त्वाच्या घटकापासून करावी लागेल. पूर्वी शिक्षकाला ब्राम्हण म्हणायचे. त्याकाळी ब्राह्यण हा जातीवाचक शब्द नव्हता. ब्रह्याचे ज्याला ज्ञान आहे तो ब्राह्यण ठरत असे. ब्रह्याचे म्हणजेच जीवनाच्या सर्व अंगाचे ज्ञान.त्या अर्थाने पूर्वीचे शिक्षक सर्वज्ञ असायचे. त्यामुळे त्यांनी घडविलेले विद्यार्थीसुद्धा सर्वच दृष्टीने लायक असायचे. आज शिक्षण शास्त्राची पदवी किंवा पदविका मिळविणारा कोणीही शिक्षक होऊ शकतो. त्यामुळे अतिशय मर्यादित वकूबाची माणसेही आज शिक्षक म्हणून वावरत आहेत. ज्याला स्वत:लाच जीवनाचा, जगण्याचा अर्थ कळला नाही तो विद्यार्थ्यांना काय शिकविणार? आज संपूर्ण शिक्षण यंत्रणा देणग्या देऊन पदव्या विकत घेणाऱ्यांच्या आणि देणाऱ्यांच्या हातात गेली आहे. शिक्षणाचे अतिशय खालच्या पातळीवरील बाजारीकरण झाले आहे. परिणामी शाळा-महाविद्यालये ओस पडत आहेत, तर खा
गी शिकवणीवर्ग मात्र भरभरून वाहात आहेत. एकेकाळी सेवाभावी असलेल्या या क्षेत्राचे आज अक्षरश: व्यापारीकरण झाले आहे. येनकेन प्रकारे पैसा मिळविणे या एकमेव उद्देशाने शिक्षणक्षेत्र झपाटले गेल्यामुळे शिक्षणातील जीवन-मूल्य केव्हाच हरविले आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या मूल्याविहीन व्यवस्थेचाच परिपक्व म्हणायला पाहिजेत, भविष्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळायच्या असतील आणि शिक्षणातून जबाबदार, सुसंस्कृत नागरिक घडवायचा असेल, तर संपूर्ण व्यवस्थाच मुळापासून बदलावी लागेल. ‘गुरू’ ही संकल्पना पुनर्जीवित करावी लागेल. मार्गदर्शन करणारेच चुकीच्या मार्गावर जात असतील तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे खड्ड्यातच जातील. त्यामुळे चारित्र्यवान, सेवाभावी आणि विद्यादानाला आपला धर्म समजणारे गुरुजन पुन्हा निर्माण करावे लागतील. अर्थार्जन हा पुरुषार्थापैकी एक महत्त्वाचा भाग असला तरी विद्यार्थ्यात इतर मानवी मूल्यांचा विकास झाला नाही, तर केवळ अर्थप्राप्तीच्या वेडात सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास होऊन मानव प्राण्यांची रानटी टोळी अस्तित्वात येण्याचा धोका आहे.
जशी खाण असेल तशी माती असते. आजचा विद्यार्थी विमनस्क, भरकटलेला, असंस्कृत आणि
कमालीचा भेदरलेला असेल तर त्याला जबाबदार असा विद्यार्थी घडविणारा शिक्षकच आहे. अधिक स्पष्ट सांगायचे झाल्यास आज विद्यार्थी आत्महत्या करीत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षकांवर, प्रचलित शिक्षण व्यवस्थेवर येते. आत्महत्या या मुळात आत्महत्या नसतात, तर ते व्यवस्थेने घेतलेले बळी असतात. आत्महत्या मग ती शेतकऱ्याची असो वा विद्यार्थ्याची, प्रचलित व्यवस्थेच्या अपयशाची ती काळोखी गाथाच ठरते.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply