रस्त्याने प्रवास करताना बरेचदा एक सूचना वाचायला मिळते, ‘शॉर्ट कट मे कट शॉर्ट युअर लाइफ’. ही सूचना खूपच अर्थगर्भ आहे. रस्त्यावर लिहिलेली सूचना जरी केवळ वाहन चालकांशी संबंधित असली तरी इतर संदर्भातही ही सूचना तशी खूप मौलिक आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनातही अनेक ‘शॉर्ट कट्स’ वापरत असतो. आपला साधारण कल कमी खर्चात, कमी कष्टात अधिकाधिक काम कसे होईल याकडेच अधिक असतो. अर्थात त्यात वावगे असे काही नसले तरी प्रत्येक बाबतीत हा ‘शॉर्ट कट’चा पर्याय योग्यच ठरतो असे नाही. उलट बरेचदा आपल्या या सवयीनेच आपण ‘लाँगटर्म’ परिणाम भोगत असतो. अगदी साधेच उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्याला होणाऱ्या
सर्दी-पडशाचे घेता येईल. सर्दीची बाधा झाली की लगेच आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. डॉक्टरही आपल्याला सर्दी कमी होण्याची औषधे देतात. वास्तविक सर्दी होणे हा काही आजार नाही. शरीरातील अशुद्धता बाहेर टाकण्याचा हा शरीरानेच योजलेला एक नैसर्गिक उपाय असतो. सर्दीद्वारे शरीरातील अनावश्यक घाण बाहेर टाकली जात असते. अशावेळी बाहेरून औषधे घेऊन ती दाबून टाकणे योग्य ठरत नाही, परंतु सर्दीचा तीन-चार दिवसांचा जो कालावधी आहे तो पूर्ण होण्याची वाट पाहण्याइतका वेळ आपल्याजवळ नसतो. तितका वेळ थांबायला आपल्याला सवड नसते. आपली ‘लाइफ स्टाईल’च अशी झाली आहे की आपण सेकंदही वाया जाऊ द्यायला तयार नसतो. त्यामुळे झटपट बरे होण्यासाठी औषधे घेतली जातात. सर्दी दाबली जाते. परिणामी निसर्गत: बाहेर पडणारी घाण शरीरातच साठून राहते आणि नंतर त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते. परंतु नंतरचा विचार करण्यासाठी आपल्याजवळ वेळच नसतो. बरे होऊन कामाला लागण्यासाठी असे जे ‘इन्स्टन्ट’ आणि ‘शॉर्ट कट’ उपाय केले जात आहेत, त्याचाच परिणाम म्हणून अलीकडील काळात हृदयरोग, रत्त*दाब अशा विकारांचे प्रमाण वाढत आहे. आपल्या जीवनशैलीने
सर्वाध
क नुकसान आपले
आणि सर्वाधिक फायदा डॉक्टरांचा होत आहे. सुखासीन आयुष्याची चटक आपल्याला लागली आहे. परंतु हे सुख विकत घेताना आपण कोणती किंमत चुकवित आहोत याची आपल्याला कल्पनाही नसते किंवा असली तरी त्याकडे लक्ष देण्याइतका वेळ आपल्याजवळ नसतो. आपल्या बेडरूममध्ये एअर कंडिशनर बसवलेला असतो, वाहनातही एअर कंडिशनर असतो, कार्यालयात किंवा जिथे कुठे आपण काम करीत असू तिथेही एअर कंडिशनर आपल्याला हवाच असतो. आपण आपल्याला घाम येणार नाही याची किती काळजी घेत असतो. परंतु घाम येण्यात वाईट काय आहे, याचा विचार कुणी करत नाही. खरेतर घाम यायलाच पाहिजे. शरीर थंड ठेवायचा, डोके थंड ठेवायचा तो एक नैसर्गिक मार्ग आहे. तसेच घामाद्वारे शरीरातील घाणसुद्धा बाहेर टाकली जात असते. शरीर स्वच्छ करण्याची ती एक नैसर्गिक पद्धत आहे, परंतु हा मार्गच आपण बंद केल्याने ते अनावश्यक घटक शरीरातच साचून राहतात आणि नंतर केव्हातरी आपल्याला डॉक्टरचे बिल पाहून घाम फुटतो. ज्या विकारांचा मी वर उल्लेख केला आहे त्यांचे प्रमाण ठाामीण भागापेक्षा शहरातच आणि त्यातही सुखवस्तू लोकातच अधिक प्रमाणात आढळून येते. त्यामागचे कारणही स्पष्ट आहे. आपली जीवनशैली जितकी अधिक नैसर्गिक असेल तितके आपले शरीर तंदुरुस्त राहते. ठाामीण भागात आजही लोकांना मोकळी स्वच्छ हवा भरपूर प्रमाणात मिळते. त्या लोकांचे जीवन धावपळरहित असते. भरपूर शारीरिक कष्ट करण्याची त्यांना सवय असते आणि ती करावीही लागतात आणि मुख्य म्हणजे गरजा कमी असल्याने फारशी चिंता त्या लोकांना करावी लागत नाही. या कारणांमुळेच खेड्यातील लोकांना रत्त*दाबाचा, हृदयविकाराचा फारसा त्रास शहरातील लोकांच्या तुलनेत जाणवत नाही. पूर्वीच्या काळी दोन-तीन महिन्यांतून एकदा तरी ‘बस्ती'(एरंडेल तेलाद्वारे पोट साफ करणे) केली जायची. आता तो प्रकार राहिलाच नाही. खाणे भरपूर वाढले, त
यातही तेलकट, मसालेदार पदार्थांचे प्रमाण अत्याधिक झाले. पचनाकडे मात्र लक्ष पुरविणे धावत्या जीवनशैलीमुळे शक्य होत नाही. त्यामुळे पोट साफ होत नाही. कधी त्रास झालाच तर तात्पुरते उपचार करून झटपट बरे होण्याचाच विचार केला जातो. मूळ समस्येकडे लक्षच दिले जात नाही. परिणामी पोटाचे ताळतंत्र बिघडत जाते आणि एकवेळ पोटाने आपले ताळतंत्र सोडले की बाकी विकारांना बोलाविण्याची गरजच राहत नाही. ते स्वत:हून आपल्याकडे चालत येतात आणि तेही कायमच्या वास्तव्यासाठी. दूध, अंडी, मांस हे खरेतर जी माणसे भरपूर काम करतात, घाम गाळतात त्यांच्यासाठी एक वेळ ठीक आहे; मात्र जे हे अजिबात करत नाहीत तेदेखील आजकाल केवळ चमचमीत, तर्रीदार, खायला झणझणीत म्हणून मोठ्या प्रमाणात मांसाहार करीत आहेत. आजकाल आपल्याला केवळ दोन प्रकारची माणसेच पाहायला मिळतात. एकतर हातापायाच्या काड्या झालेली कुपोषित माणसे किंवा पोटासहित सगळंच काही सुटलेली अतिपोषित माणसे! माणूस सडसडीत असला तर एकवेळ चालून जाईल, त्याला चांगले खाऊ-पिऊ घालून त्याची अंगकाठी सुधरविता येईल; परंतु लठ्ठ माणूस उपचाराच्या पलीकडे गेलेला असतो. डाएटिंग वगैरे करून लठ्ठपणा कमी होईल, हा सगळा भ्रम आहे. लठ्ठपणा आला की त्यासोबत अनेक विकार आलेच म्हणून समजा आणि ते सगळेच केवळ डाएटिंगमुळे नाहीसे होत नाहीत. अशा माणसांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. वाढलेल्या धडाचा भार त्याच्या पायांना पेलवेनासा होतो, त्यामुळे पाठीचे दुखणे कायमचे मागे लागते. हृदयाची क्षमता कमी होते. त्यामुळे धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आदी प्रकार सुरू होतात. अपचनाच्या तक्रारी सुरू होतात, परिणामी डोके दुखणे हा नित्याचाच प्रकार होतो. या सगळ्याला कारणीभूत आहे ती कुठेतरी ‘इन्स्टन्ट, शॉर्ट कट, रेडिमेड’च्या प्रेमात पडलेली आपली जीवनशैली! शारीरिक आरोग्य हा एक खूप मोठा गंभीर
सामाजिक प्रश्न ठरू पाहत आहे. सडसडीत बांध्याचे, तजेलदार चेहऱ्याचे, काटक
शरीराचे लोक आजकाल पाहायला मिळत नाही. दवाखाने आणि तुरुंगांची
संख्या वाढत आहे आणि तरीही या वाढत्या संख्येला गर्दी पेलवेनाशी झाली आहे. हे लक्षण चांगले म्हणता यायचे नाही. पूर्वीच्या काळी कोर्टाची, दवाखान्याची आणि तुरुंगाची पायरी ओलांडणे निषिद्ध मानले जायचे, संकट मानले जायचे. आता या तीनपैकी कोणत्याह एका घटकाशी संबंध नसलेले घर पाहायला मिळणे दुरापास्तच झाले आहे. आज कोणतीही ‘पार्टी’ किंवा ‘सिटिंग’, बैठक म्हटले की ती ‘ओली’ झालीच पाहिजे, असा संकेतच ठरून गेला आहे. परिणामी मद्यालये वाढत आहेत आणि मद्यालये वाढली की रुग्णालये वाढणारच, तुरुंगात गर्दी होणारच. मानसिक विवंचनेतून सुटण्याचा ‘शॉर्ट कट’ उपाय बिअर बारमध्येच सापडतो अशीच जर आजच्या लोकांची श्रद्धा असेल तर दुसरे होणार तरी काय? मानल की आजचे युग स्पर्धेचे आहे, धावपळीचे आहे. थांबला तो संपला, हा इथला नियम झाला आहे. परंतु या गतीशी जुळवून घेताना आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि खिसा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या घरी असलेली मोटारसायकल, कार किंवा इतर वाहन दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहावे, आपल्याला त्यापासून चांगली सेवा मिळावी म्हणून आपण त्याची नियमित देखभाल करतोच की नाही? ऑईल, इंजीन वारंवार तपासून पाहतोच की नाही? एखादा भाग खराब झाला असेल तर लगेच बदलून नवा भाग टाकतोच की नाही? त्यासाठी आपण वेळ काढतो. गरज भासली तर त्या वाहनाला किंवा यंत्राला आपण आरामही देतो, मग तेवढीच काळजी आपण आपल्या शरीराची घ्यायला नको का? गाडीचा वेग कमी असायला हवा होता हे आपल्याला अपघात झाल्यावरच कळायला हवे का? त्यापूर्वीच योग्य ती दक्षता आपण घेऊ शकत नाही का? सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला ‘शॉर्ट कट’ शोधायची सवय लागलेली आहे. परंतु निसर्गाला ते मान्य नाही. आंब्
ाला मोहोर वसंत ऋतूतच येईल, तो कधी शिशिर किंवा शरदात येणार नाही. आपणही निसर्गाच्या नियमांनी बांधील आहोत. त्या नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न शेवटी आत्मघातीच ठरणार आहे. नैसर्गिक सहजतेला फाटा देत आपण जी जीवनशैली अंगीकारली आहे त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करीत असताना काही ओळी सहजच स्फूरल्या,
‘जेवढी वाढतील मद्यालये
तेवढीच वाढतील रुग्णालये,
वाढेल जेवढी बेरोजगारी
तेवढीच वाढेल गुन्हेगारी,
पोलिसांची वाढवाल भरती
कमी तुरुंगही पडती,
कर्जपुरवठा वाढवाल जेवढा
आकडा आत्महत्येचा वाढेल तेवढा,
कोत्या बुद्धीने योजाल उपाय
उत्तर न मिळता होईल अपाय.’ त्
— प्रकाश पोहरे
Leave a Reply