नवीन लेखन...

श्रध्देचे स्तोम !




18 रविवार, नोव्हेंबर 2007

दिवाळीची धामधूम आटोपली आहे. आपापल्या परीने प्रत्येकाने दिवाळीचा आनंद लुटला. कुणी कितीही गरीब असला तरी, दिवाळीचा आनंद उपभोगण्याइतकीही क्षमता त्याच्यात नसेल एवढा गरीब तो नसतो. शिवाय आनंदाचा संबंध गरिबी आणि श्रीमंतीशी येतोच कुठे? परवा मुकेश अंबानीने आपल्या पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून जवळपास अडीचशे कोटीचे जेट विमान भेट दिले. या भेटीने मुकेश अंबानींना देण्यातून आणि त्यांच्या पत्नीला ती भेट स्वीकारण्यातून जेवढा आनंद मिळाला असेल तेवढाच आनंद एखाद्या सामान्य माणसाने आपल्या पत्नीला साधी अडीचशेची साडी दिली तरी त्या दोघांनाही होईल. त्या परिस्थितीत आनंदाचे मूल्य अंबानी आणि त्या सामान्य माणसासाठी सारखेच असेल. सांगायचे तात्पर्य गरिबी-श्रीमंतीच्या मापदंडाने आनंदाची मात्रा मोजता येत नाही. त्यामुळे दिवाळीचा आनंद सगळ्यांनीच लुटला असेल. कपड्यांची, दागिन्यांची खरेदी, घरात फराळाचे गोडधोड पदार्थ, फटाक्यांची आतषबाजी, हा सगळा सरंजाम सगळ्यांकडेच कमी अधिक प्रमाणात झाला असेल. फटाक्यांचा विषय निघाला म्हणून लक्षात आले. काही दिवसांपूर्वी मला दूरध्वनीवरून काही लोकांनी फटाक्यांवर छापल्या जाणाऱ्या देवी-देवतांच्या चित्रांबद्दल देशोन्नतीतून रोखठोक भूमिका घेण्याची विनंती केली. फटाक्यांवर देवी-देवतांची चित्रे छापली जाऊ नये, फटाक्यांसोबत या चित्रांच्याही चिंध्या होतात आणि ते योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा हा आठाह योग्यच होता आणि यापूर्वीही बरेचदा या विषयावर माध्यम जगतात चर्चा झाली आहे. अलीकडील काळात फटाक्यांवर देवी-देवतांची चित्र छापण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे, हा कदाचित या चर्चेचाच परिणाम असावा. देवी-देवतांच्या चित्रांबद्दलचा लोकांचा हा आदरयुत्त* आठाह स्वागतार्ह आहे. एखाद्या देवतेब
्दल म्हणा किंवा इतर कशाबद्दलही, आपल्या मनात श्रद्धा असेल तर ती श्रद्धा जपणे हे आपले कर्तव्यच ठरते. परंतु त्याचवेळी ही श्रद्धा यांत्रिकपणातून तर जपली जात नाही ना, हे ही तपासून पाहणे गरजेचे ठरते. आपल्याकडील

सगळ्याच देवी-देवतांची चित्रे काल्पनिक आहेत.

पुराणातील त्यांच्या वर्णनावरून ही चित्र तयार करण्यात आली आहेत. त्यासोबतच आपल्या बहुतेक देवता भत्त*ीपेक्षा कृतीला, विचाराला चालना देणाऱ्या आहेत. खरेतर या सगळ्या देवता वेगवेगळ्या संदेशांच्या प्रतीक आहेत. त्यांच्या चित्रापेक्षा त्या देत असलेल्या संदेशाकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे. गाईला लक्ष्मी मानले जाते, याचा अर्थ लक्ष्मीचे रंगरूप गाईसारखे आहे असा होत नाही. लक्ष्मी समृद्धीचे प्रतीक आहे. समृद्धीचा हा संदेश आपण नीट समजून घेतला पाहिजे. या संदेशाला लक्ष्मीसोबतच चित्रात बंदिस्त करून केवळ पूजेपुरते मर्यादित करणे योग्य ठरणार नाही. आपला देश कृषीप्रधान आहे आणि शेतकऱ्यांसाठी गाय हा किती उपयुत्त* प्राणी आहे, हे वेगळे सांगायला नको. गाईचा शेतकऱ्यांच्या समृद्धीशी अतिशय निकटचा संबंध आहे. ‘गोमये वसते लक्ष्मी’ असेही म्हटले जाते. याचा अर्थ गाईच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो, असा आहे. हे शेण उद्या कुणी उकिरड्यावर नेऊन टाकले तर लक्ष्मीला उकिरड्यावर टाकले म्हणून ओरड करणार का? यमाचे वाहन रेडा आहे. मग मृत्यूची भीती नको म्हणून जगातले सगळे रेडे मारून टाकणे, योग्य ठरेल का? यमाचे वाहन रेडा असेल तर त्याचा अर्थ एवढाच की रेडा किंवा म्हशीद्वारे उपलब्ध होणारे पदार्थ आपल्या स्वास्थ्यासाठी योग्य नाही. गाईच्या शेणात पोषक असे जीवाणू असतात तर म्हशीच्या शेणात विषाणू असतात. गाईचे दूध अमृतमय असते तर म्हशीचे दूध तेवढेच घातक असते. सांगायचे तात्पर्य आपल्या सगळ्या देवता कृतिपर किंवा वैचारिक संदेश देणाऱ्या प्रतीक आहेत. पर
ंतु आपली श्रद्धा आपण इतकी उथळ करून ठेवली आहे की हे संदेश समजून घेणे दूर राहिले, या देवतांचीच चित्रे बनवून आपली सगळी कृतिशून्य श्रद्धा त्यांच्या पायाशी ओतून मोकळे झालो. अलीकडील काळात धर्मातील हे विज्ञान समजून घेण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. परंतु पूर्वी आपल्या या पोकळ श्रद्धा एवढ्या सनातनी आणि तिप स्वरूपाच्या होत्या की एखाद्याच्या साध्या स्पर्शाने देव बाटायचे. आपल्या याच असंस्कृतपणाचा फायदा विदेशी आक्रमकांनी घेतला. धार्मिक श्रद्धेशी एकरूप झालेल्या समाजाला खंडीत करून राज्य करायचे असेल तर या समाजाच्या धार्मिक आस्थांवर आघात करणे परिणामकारक ठरेल, याच विचाराने विदेशी आक्रमकांनी हिंदुंच्या धार्मिक स्थळांवर वारंवार आक्रमण केले. बळाच्या किंवा कपटाच्या साह्याने धर्मांतर करविले. मिशनरी लोक गावातल्या विहिरीत पाव टाकायचे. त्याकाळी हिंदुंसाठी पाव निषिद्ध मानला जायचा. यासाठी आधार काय आहे, हे विचारण्याचे धाडस कुणी केले नाही. पाव टाकलेल्या विहिरीतले पाणी गावकऱ्यांनी प्राशन केले की ते बाटले जायचे. अशाप्रकारे गावच्यागाव धर्मांतरीत झाली. गाईचे मांस जबरदस्तीने खाऊ घालून लोकांना धर्मभ्रष्ट केले जायचे. धर्माच्या मान्यताच त्याकाळी इतक्या उथळ आणि सनातनी होत्या की अशा कोणत्याही कारणाने व्यत्त*ी धर्मभ्रष्ट व्हायचा. त्याला परत हिंदु धर्मात स्थान मिळायचे नाही. स्वकीयांकडून होणाऱ्या या अपमानाने चिडून तो अत्यंत कडवा मुसलमान किंवा ख्रिश्चन होत असे. अपघाताने काही खाण्यात किंवा पिण्यात आले तर देहभ्रष्ट कसा होऊ शकतो? काळी काळापूर्वी हिंदू असलेला मनुष्य या एकाच अपघाताने आपले हिंदुत्व कसे गमावू शकतो? हे प्रश्न विचारण्याची हिंमत त्या काळी कुणी केली नाही. धर्माचा संबंध वैचारिक मान्यतेशी आहे. आचारधर्म कुठलाही असो त्याचा धर्माशी संबंध येत नाही. वै

िक काळात यज्ञात मोठ्या प्रमाणावर पशुंचा बळी दिला जात असे. बळी दिलेल्या पशुंचे मांस नंतर भोजनासाठी वापरले जायचे. क्षत्रियांना मांसाहार निषिद्ध नव्हता, शिवाय कोणत्या जनावराचे मांस खावे याचाही काही विधिनिषेध नव्हता. दुष्काळाच्या दिवसात महर्षी वाल्मिकींनी एका मेलेल्या कुत्र्याचा पाय खाऊन आपली भूक भागवली, अशी कथा पुराणात आहे. परंतु नंतरच्या काळात हिंदु धर्मात पुरोहितशाहीची बजबजपुरी माजली आणि हा धर्म खऱ्या अर्थाने संकटात

सापडला. याच काळात विदेशी आक्रमकांनी हिंदू धर्माचा अशाप्रकारे ठिसूळ झालेला पाया खणून

काढला आणि मोठ्या प्रमाणात धर्मांतरे घडवून आणली. विशेष म्हणजे जबरदस्तीने धर्मांतरीत झालेल्यांची पुन्हा हिंदू धर्मात यायची इच्छा असली तरी त्याला पुन्हा प्रवेश नसायचा. धर्ममार्तंडांच्या या दूराठाही भूमिकेमुळेच हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झाले. केवळ एकट्या शिवाजी महाराजांनी धर्मांतरीतांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचे धाडस यशस्वी करून दाखविले. नेताजी पालकरला राजांनी पुन्हा शुद्ध करून हिंदू धर्मात घेतले. हे धाडस त्या आधी आणि त्यानंतर कुणी दाखविले असते तर हिंदू धर्माचे एवढे प्रचंड नुकसान झालेच नसते. आजही एखाद्या चित्राच्या, मूर्तीच्या किंवा प्रतीकाच्या विटंबनेवरून प्रचंड उद्रेक होतो, जाळपोळ होते, रत्त*पात होतो, माणसं मारली जातात. अशा घटनांनी लोक उद्दीपित होतात म्हणूनच अशा घटना घडत असतात. एखादे चित्र, एखादी मुर्ती विटंबित झाली म्हणजे ते चित्र किंवा मुर्ती ज्या विचारांचे प्रतीक आहे ते विचार संपले असा होतो का? सूर्यावर थुंकण्याने सूर्याचे तेज कधी कमी झाले आहे का? एखादी मुर्ती भंगली म्हणून काय त्या मुर्तीवर श्रद्धा असलेल्यांची श्रद्धा भंगते का? तसे होत असेल तर आपली श्रद्धा अंधश्रद्धाच म्हणायला हवी. त्या दृष्टीने बघायचे झाल्
यास आपला समाज आजही एका व्यापक अंधश्रद्धेत जगतो आहे, असेच म्हणायला हवे. तसे नसते तर धर्म आणि धार्मिक श्रद्धेच्या राजकारणाला आज इतके चांगले दिवस आलेच नसते.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..