नवीन लेखन...

सवयीचे गुलाम





प्रकाशन दिनांक :- 18/05/2003
परवा सहजच एका परिचिताच्या संदर्भात दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला. गर्दी भरपूर होती. त्या गर्दीतीलच दोघांचा संवाद कानी आला. एक जण दुसऱ्याला म्हणत होता, आमच्या अकोल्यात वैद्यकीय सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी प्रत्येक रोगाचे, अवयवाचे विशेषज्ञ इथे आहेत. असे सांगताना अकोल्याविषयी असलेला अभिमान त्याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. तो बोलला त्यात फारसे काही चूक नव्हते. किमान विदर्भात तरी नागपूर नंतर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर्स अकोल्यातच मुबलक प्रमाणात आहेत. परंतु मला खटकला तो त्या व्यक्तीच्या बोलण्यातून डोकावणारा अभिमान. वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स, स्पेशालिस्ट, हॉस्पीटल्स मुबलक प्रमाणात असणे हा एखाद्या शहरासाठी, त्या शहरातील व्यक्तीसाठी अभिमानाचा विषय कसा ठरु शकतो? उद्या तुम्ही आमच्या शहरात मलेरिया पासून सार्सपर्यंतचे सगळ्या जातीचे (धर्माचे?) विषाणू मुबलक प्रमाणात आढळतात हे सुध्दा अभिमानाने सांगणार का? शेवटी अभिमान कशाचा बाळगावा, याचा काही विधिनिषेध असतो की नाही? मागे 92 च्या दंगलीत अकोल्याचे नाव बीबीसीवर आले होते आणि त्याचाही उल्लेख अकोलेकर अभिमानाने करीत. काय म्हणावे या मनोवृतीला? असो.
सध्याचे युग वैज्ञानिक प्रगतीचे समजले जाते. अगदी प्रत्येक प्रश्नाचे अट्टाहासाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न, हे या युगाचे खास वैशिष्ट्य सांगता येईल. प्रयत्न स्तुत्य असला तरी त्या प्रयत्नासाठी मोजावी लागणारी किंमत परवडण्यासारखी आहे का, हा प्रश्न आज गंभीर रूप धारण करीत आहे. प्रत्येक रोगावर औषध शोधण्याचा, मानवी जीवन निरोगी – निरामय करण्याचा विज्ञानाचा दावा एकीकडे तर दवाखान्यांची आणि दवाखान्यातील रुग्णांची वाढती गर्दी दुसरीकडे हे चित्र विरोधाभासी नाही कां? खरे सांगायचे तर हे चित्र म
ळीच विरोधाभासी नाही. वैज्ञानिक प्रगतीने मानवाचे वैचारिक आणि सामाजिक स्वास्थ्य अशा वळणावर आणून ठेवले आहे की दवाखान्यांची वाढती संख्या तिथे अपरिहार्यच

ठरली आहे.
जगातील 99 टक्के

आजार हे चयापचय आणि रक्ताभिसरणाच्या समस्येमुळेच निर्माण होतात आणि या दोन्ही समस्यांच्या मुळाशी स्वत: मानवच आहे. ज्याबाबतीत आपण अतिशय गंभीर असावयास हवे, नेमके त्याच बाबतीत आपण बेपर्वा असतो. शरीर तंदुरुस्त असेल तर जगणे सुखासीन होऊ शकते; परंतु हे लक्षात घ्यायला कोणी तयार नाही. अलीकडील काळात तर ‘फॅमिली डॉक्टर’ असणे, मोठमोठ्या हॉस्पीटल्समध्ये नियमितपणे ‘चेक अप’ साठी जाणे ही एक फॅशनच झाली आहे. ‘आपल्यासाठी दवाखाना’ हा विचार केव्हाच मागे पडला आहे. आता ‘आपण दवाखान्यासाठी’ हा विचार बळावला आहे आणि विशेष म्हणजे त्यात काही वावगे आहे, असेही कुणाला वाटत नाही. वास्तविक आरोग्यविषयक समस्या या मुळात समस्याच नाहीत. आपण स्वत:च आपली अवस्था ‘आ बैल मुझे मार’ अशी करून घेत असतो. आपण अगदी प्राथमिक स्वरूपाची काळजी घेतली तरी शहरातील अर्धे दवाखाने कायमचे बंद होऊ शकतात, परंतु तेवढीही तसदी आपण घेत नाही. कदाचित दवाखाने बंद झाले तर डॉक्टरांनी काय करायचे, मोठ – मोठ्या औषधी उत्पादक कंपन्यांचे कसे व्हायचे? त्या बिचाऱ्यांची पोटं भरण्यासाठी तरी का होईना, आपण आपली पोटं खराब करून घेतलीच पाहिजे, असा आपला उदात्त दृष्टिकोन असू शकतो.
बहुतेक आजार खाण्यापिण्यातील अनियमितता, जिभेचे अवास्तव चोचले आणि काय खावे व काय खाऊ नये याबद्दलच्या आपल्या गाढ अज्ञानामुळे आपल्या शरीरात पाहुणचार घेत असतात. त्यांच्या पाहुणचारासाठी करावा लागणारा खर्च त्यांच्या नाकेबंदीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत कितीतरी पट अधिक असतो. परंतु ‘एकर गेला तरी चालते, धुरा राहिला पाहिजे,’ ही वृत्ती रोमारोमात भिनली असल्यामुळे आ
ण पाहुणचाराच्या खर्चाचा विचार करणे अधर्म समजतो. खरेतर आपल्या आहारात परंपरागत पदार्थांचा समावेश केला आणि थोडी नियमितता पाळली, तर अन्नपचनाची समस्याच उरणार नाही आणि ते फारसे खर्चिकही नाही.
गाईचे दूध डेअरीच्या किंवा म्हशीच्या दुधापेक्षा थोडं महाग असेल, अस्सल गावरान तुपसुध्दा थोडे महाग असू शकते; परंतु आपल्या आरोग्याचा बळी देण्याइतपत ते निश्चितच महाग नसते. शिवाय आधुनिकतेच्या वेडगळ कल्पनांनी आपले डोके पुरते खराब करून ठेवले आहे ते वेगळेच. आधुनिक काळात चटणी – भाकर – ताक हा सर्वोत्तम आहार गावंढळ ठरला आहे. ब्रेडला सुरीने ‘बटर’ चोपडून खाताना जो साहेबी अहंकार आपल्याला सुखावून जातो, तो त्या चटणी – भाकरीत कोठून येणार? फास्टफुड, पिझ्झा, बर्गर हे शब्दच कसे अगदी उच्चारता बरोबरच आपल्या कथित सामाजिक प्रतिष्ठेला ‘चार चाँद’ लावत असतात. कधी – कधी तर असेही वाटते की, आपल्या आहारविषयक आवडी – निवडी बदलण्यामागे सुध्दा व्यापक षडयंत्र असावे. अलीकडील काळात जसा विदेशी औषध कंपन्यांच्या हितासाठी काही रोगांचा सुनियोजित बागुलबोवा उभा करण्यात आला तसाच काहीसा प्रकार साखळी उपहारगृहांच्या फास्टफुड चेन शॉप माध्यमातून एतद्देशियांच्या आहारविषयक आवडी, सवयी मुळातूनच बदलण्याच्या बाबतीत होत असावा. दुर्दैवाने सर्वसामान्य लोकंसुध्दा प्रचाराच्या या आधुनिक तंत्राला सहज बळी पडत आहेत. आहाराचा आणि विचारांचा तसा सरळ संबंध दिसून येत नाही, परंतु तो संबंध आहे हे निश्चितच. ‘उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म,’ असे सांगत भोजनाला पवित्र यज्ञाची उपमा आपल्या पूर्वजांनी उगीच दिली नाही. यज्ञात ज्याप्रमाणे समिधेच्या रूपाने विशिष्ट आहुती देवूनच योग्य परिणाम साधल्या जातो तद्वतच भोजनात सुध्दा योग्य ‘समिधांचीच’ आवश्यकता असते. या समिधांच्या ज्वलनातूनच (शास्त्रीय भाषेत त्याला मंदज्वलन म्हणता
त, म्हणजेच यज्ञाची ही संकल्पना विज्ञानानेही मान्य केली.) विचारांना पुष्ट करणारी उर्जा मिळत असते. कचरा जाळला तरी धूर निघतो आणि उदबत्ती जाळली तरीही. मग लोकं घरात उदबत्ती ऐवजी कचरा का जाळत नाही? केवळ पोटच भरायचे असेल तरच काहीही खाल्ले तरी चालेल आणि अलीकडील काळात

तेच चालले आहे. जीभेचे चोचले पुरवित केवळ पोट भरण्यापुरता आमचा

आहाराशी संबंध उरला आहे. आहाराकडे पाहण्याच्या आपल्या या उथळ दृष्टिकोनामुळेच आपण शारीरिक व्याधींसोबतच वैचारिक स्खलनाला सामोरे जात आहोत. रुपया – दोन रुपयात अगदी सगळ्या कुटुंबाची तहानच नव्हे तर उर्जाविषयक गरजही भागविणाऱ्या लिंबू सरबताऐवजी आपण साहेबी थाटात ‘ठंडा मतलब…’ कोका कोला किंवा पेप्सीला जवळ करतो आणि खिशासोबतच शरीरालाही ‘थंडे’ करतो.
एकंदरीत आपल्या सवयींचा गळफास आपणच आवळून घेत आहोत आणि आपणच ‘जीव चालला हो’ ची आरोळीही देत आहोत. योग्य मार्गाने मुठभर पैसे खर्च करताना प्रचंड चिकित्सा करणारे आपण, दवाखाने आणि औषधासाठी मात्र ढिगभर पैसा अगदी बेमुर्वतपणे उधळत असतो. ही एकप्रकारे सवयींची गुलामीच नाही का?

— प्रकाश पोहरे

He college homework help opposed slavery, but he was not an abolitionist

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..