जेजे लोकं इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांना भविष्य माफ करत नाही, असे म्हणतात. या म्हणण्यात तथ्य निश्चितच आहे. शेवटी इतिहास म्हणजे तरी काय? अनुभवाअंती संचित झालेले ज्ञानच! हे ज्ञानच पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असते. अगदी साध्या शब्दात सांगायचे असेल तर जुन्या चुका पुन्हा नव्याने करण्यापासून रोखणारा दस्तावेज म्हणजे इतिहास. अर्थात त्यासाठी इतिहासाचे स्मरण, आकलन व्हायला हवे आणि मुळात तो इतिहास सुनियोजितपणे जपल्या गेलेला असावा. फार पूर्वीच्या काळी जेव्हा लेखनसामुठाीचा शोध लागलेला नव्हता तेव्हा एका पिढीतील अनुभव, ज्ञान दुसऱ्या पिढीत वाणीने संक्रमित व्हायचे. गुरु आपले ज्ञान पाठांतराच्या माध्यमातून शिष्यांना देत असत. ते शिष्य याच पद्धतीने पुढच्या पिढीकडे हे ज्ञान सोपवायचे. दरम्यानच्या काळात त्या ज्ञानात भर पडलेली असायची. घनपाठी ब्राह्यणांची परंपरा त्यातूनच निर्माण झाली. पुढे भुर्जपत्राचा वगैरे वापर होऊ लागला. दगडावर कोरलेले शिलालेख किंवा चित्र ज्ञानसंक्रमणाच्या साहित्याचा एक भाग बनले. शेकडो वर्षे या पद्धतीने एका पिढीतील अनुभव दुसऱ्या पिढीत संक्रमित होत गेले. म्हाताऱ्या बापाचे अनुभव मुलांची शिदोरी बनली. लेकी, सुना आजीबाईच्या बटव्याच्या वारसदार बनल्या. शेती, व्यापार, हवामान, औषधशास्त्र, राजनीती अशा एक नाही अनेक क्षेत्रात परंपरेने चालत आलेले ज्ञान पिढ्यान् पिढ्या समृद्ध होत गेले. परंतु मध्यंतरीच्या काळात, विशेषत: मोगलांचे भारतावर आक्रमण झाले त्यानंतर ज्ञानसंक्रमणाची ही परंपरा अगदी पूर्णत: नाही तरी बऱ्याच अंशी खंडित झाली. तेव्हाही इतिहासाची नोंद ठेवल्या जायची, परंतु बखर, दप्तर, रोजनिशीसारख्या माध्यमातून नोंद होत गेलेला हा इतिहास बऱ्याचदा वस्तुस्थितीच्या तटस्थ विश्लेषणाऐवजी तत्कालीन गरजेनुसार किंवा बरेचदा
ासनकर्त्याची मर्जी राखण्यासाठी लिहिल्या जायचा. मोगल बादशहाच्या पदरी असलेल्या बखरकारांकडून लिहिल्या गेलेल्या इतिहासात बादशहाची स्तुती आणि त्याच्या शत्रूबाबत विपर्यास्त मजकूर असणे स्वाभाविकच होते. आपल्या राजाच्या कारकीर्दीत प्रजा किती
आनंदात आहे, राज्यकारभार कसा सुरळीत चालू
आहे, बंडखोरांचा किती कुशलतेने बीमोड करण्यात आला, याचे अतिरंजित वर्णन बखरींमध्ये असणे स्वाभाविकच होते. या वर्णनाला इतिहास म्हणता येणार नाही. परंतु तत्कालीन समाजस्थितीवर किंवा राजकारणावर प्रकाश टाकणारे दुसरे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने या बखरीच इतिहासाच्या प्रमाण ठरल्या. या पृष्ठभूमीवर त्या त्या काळात विदेशातून भारताला भेट द्यायला आलेल्या प्रवाशांची प्रवासवर्णने अधिक वस्तुनिष्ठ वाटतात. या विदेशी प्रवाशांना जे जमले ते भारतातील तत्कालीन विचारवंतांना का जमू शकले नाही? खरा इतिहास पुढच्या पिढ्यांना सोपवावासा कुणालाच वाटला नाही का? आपण जे भोगले ते किमान पुढच्या पिढ्यांना तरी भोगावे लागू नये किंवा आपण पाहिले तेच पुढच्या पिढ्यांना कळावे असा विचार कुणाच्याच मनात आला नसेल का? आला असेलही तरी त्या विचाराच्या अनुषंगाने इतिहास शब्दबद्ध करण्याची गरज कुणाला भासली नाही, हे तेवढेच दुर्दैवी सत्य आहे. केवळ इतिहास लिहायचीच नव्हे तर इतरही उपयुक्त नोंदी करण्याची सवयच मध्ययुगीन कालखंडात लोप पावली होती. कुणी लिहीत असेल तरी त्याचा सार्वत्रिक विचार कधी झाला नाही. त्यामागचे कारण हे की बऱ्याच लोकांचे लिहिणे हे केवळ आत्मसंतुष्टीच्या पातळीवरच होते. अनेक जुने ग्रंथ आजही वंशपरंपरेने केवळ काही घरांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसतात. त्या ग्रंथातील ज्ञानाचा फायदा समाजाला कधीच झाला नाही. ब्रिटिशांच्या भारतातील आगमनापर्यंत परिस्थिती तशीच होती. इतिहासाचे सुसूत्र लेखन न
्हते. भूगोलाची नीट मांडणी झाली नव्हती. त्यामुळे देशाच्या एकूण क्षमतेची देशवासीयांना कल्पना नव्हती. बाहेरून आलेल्या इंठाजांना या क्षमतेची ओळख पटली आणि स्वार्थासाठी का होईना, इंठाजांनी भारताचा इतिहास आणि भूगोल सुसूत्रपणे मांडण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचे पुनलर्ेखन केले. अर्थात हा इतिहास लिहिताना त्यांनी आपल्या अभिजात बेरकीपणाचा प्रत्यय दिला असला तरी इतिहासाची प्रथमच सुसूत्र मांडणी करण्याचे श्रेय इंठाजांना द्यावेच लागेल. ही मांडणी इतकी व्यवस्थित केल्या गेली की, आज आम्ही आमच्या मुलांना ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहासच शिकवत आहोत. या इतिहासात अनेक प्रश्नचिन्हे आहेत. बऱ्याच ठिकाणी तो अक्षरश: मोडून तोडून लिहिल्या गेला आहे. हे सर्व माहीत असूनही ब्रिटिशांनी लिहिलेल्या इतिहासाला प्रमाण मानण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही. मागच्या शेकडो पिढ्यांनी खरा इतिहास प्रमाणासह आणि सूत्रबद्धपणे जपला नसल्याने आज आम्हाला या उधार आणि बहुधा एकतर्फी इतिहासाच्या खिडकीतूनच भारताच्या भूतकाळात डोकवावे लागते. केवळ इतिहासच नव्हे तर इतरही अनेक क्षेत्रात आम्हाला ब्रिटिशांच्याच मांडणीवर अवलंबून राहावे लागत आहे. ही मांडणी ब्रिटिशांनी स्वार्थी हेतूंनी केली असली तरी ती अभ्यासपूर्ण होती, हे आम्ही नाकारू शकत नाही आणि त्याचमुळे अगदी पोलिस कायद्यापासून ते जमिनीच्या मोजमापापर्यंत आम्हाला ब्रिटिशांचाच वारसा चालवावा लागत आहे. हजारो वर्षांपासून हिमालय हिंदुस्थानची शान म्हणून मिरवत आहे, परंतु त्याच्या उंचीला गवसणी घालण्यासाठी आम्हाला एव्हरेस्ट नामक विदेशी व्यक्तीची वाट पाहावी लागली. हिंदुस्थानातील शेकडो राजांच्या पदरी शूर, निडर सैनिकांची कमतरता नव्हती. परंतु ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध तैनाती फौजेपुढे त्यांचे शौर्य शेवटी बेकार ठरले. एकूण काय तर भा
तातील व्यवस्थेच्या बाबतीत असलेल्या एकंदरीत विस्कळीतपणाचा व्यवस्थित लाभ ब्रिटिशांनी उचलला. इतिहासाची आपल्याला पाहिजे तशी मोडतोड करून त्यांनी इथला वर्गसंघर्ष अधिक तीप केला. हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून उभे ठाकणार नाही याची पुरती तजवीज केली. मराठे, राजपूत, मोगल, म्हैसूरचा टिपू सुलतान किंवा थेट उत्तरेकडील जाट, रोहिले एकत्र येऊ नये म्हणून कधी याची तर कधी त्याची बाजू घेत त्यांचा आपसातील संघर्ष ब्रिटिशांनी कधीच विझू दिला नाही. एवढेच नव्हे तर मराठ्यातही भोसले, होळकर, शिंदे, गायकवाड या मातब्बर सरदार घराण्यांना एकत्र येऊ दिले नाही. शिवरायांनी मोगली सत्तेला समर्थ आव्हान देताना उभी केलेली एकजिनसी सेना पुढच्या पिढ्यांमध्ये गटातटात विखुरली. इतिहासाचे इतक्या लवकर
झालेले इतके विदारक विस्मरणच हिंदुस्थानी शासकांच्या अंताला कारण ठरले. इतिहासापासून बोध
न घेण्याची जबर शिक्षा आम्हाला भोगावी लागली. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. एका पिढीचा शहाणपणा दुसऱ्या पिढीत संक्रमित होताना दिसत नाही. तसा तो व्हावा असेही कुणाला वाटत नाही. आपल्या अनुभवांचा आयता ठेवा इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो याची जाणीवच आम्हाला नाही. आज जीवन इतके प्रचंड धावपळीचे झाले आहे की, अगदी पुढच्या मिनिटाचा विचार करायलादेखील कुणाला वेळ नाही. गेलेल्या तासाचीही आम्हाला विस्मृती होते. प्रत्येकजण अतिशय आत्मकेंद्रित झाला आहे. दुसऱ्याचा विचार करण्याची कुणाला गरज वाटत नाही. प्रत्येकाचे भावविश्व आपल्या घरापुरते मर्यादित झाले आहे. अशा पिढीकडून पुढच्या पिढींना काय मिळणार? परंतु यावर कुठेतरी विचार होणे गरजेचे आहे. अनुभवाचे, ज्ञानाचे संक्रमण व्हायलाच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने ‘दिसामाजी काहीतरी’ लिहायलाच हवे. तेवढा वेळ प्रत्येकाने काढायलाच हवा. प्रत्येकाचा विचार पुढच्या सगळ
याच पिढींना मार्गदर्शक ठरेलच असे नाही, परंतु त्या विचाराचा फायदा एकाला जरी झाला तरी खूप काही कमावल्यासारखे आहे. पूर्वी गावातील संपूर्ण घरांचा वांशिक इतिहास जिभेच्या टोकावर खेळविणारे भाट गावोगावी असत. हा इतिहास भाटांनी पिढ्यान् पिढ्या जपलेला होता. आता हे भाट लुप्त झालेत आणि त्यांच्यासोबत घराण्यांचा इतिहासही नाहीसा झाला. त्यामुळे सख्ख्या नात्यातीलही बरेचजण एकमेकांना ओळखेनासे झाले. या भाटांचे पुनरुज्जीवन करणे आता तर शक्य नाही, परंतु त्या निरक्षर भाटांनी खळाळता ठेवलेला इतिहासाचा प्रवाह, त्याचे मूल्य आम्ही आधुनिक पद्धतीने जपायला हवे. पुढच्या पिढ्यांना आजचे वर्तमान जेव्हा इतिहासाच्या रूपाने भेटेल तेव्हा ते अगदी शास्त्रशुद्ध नियोजनबद्ध पद्धतीने मांडलेले असावे. अन्यथा पुन्हा एकदा नवे आक्रमक येतील, पुन्हा नव्याने आमचा इतिहास लिहिल्या जाईल आणि कदाचित भारताची ओळख पुन्हा एकदा ‘साप, गारुडी आणि साधुंचा देश’ म्हणून सांगितली जाईल. हे टाळायचे असेल तर नुसती बकवास करण्यापेक्षा लिहिणे महत्त्वाचे!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply