नवीन लेखन...

हे राष्ट्र घोटाळ्यांचे!




प्रकाशन दिनांक :- 07/12/2003

वर्तमानपत्रात बातम्यांना स्थान देताना साधारणपणे त्या बातम्यांचे महत्त्व पाहिले, तपासले जाते. सर्वाधिक महत्त्वाच्या बातमीला पहिल्या पृष्ठावर वरच्या भागात प्रसिध्दी मिळते. वृत्तपत्रीय क्षेत्रात प्रचलित असलेल्या भाषेत अशा बातमीला ‘लिड’ म्हणतात. एखादी बातमी एखाद्या वृत्तपत्रासाठी ‘लिड’ची ठरत असेल तर अन्य वृत्तपत्रांमध्ये त्या बातमीला तेच स्थान मिळेल असे नाही. वृत्तपत्रांचे धोरण, बातमीचा संदर्भ, बातमी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक अशा कोणत्या स्तरावरची आहे, या आणि अशाच अनेक कारणांमुळे बऱ्याचदा वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये ‘लिड’च्या बातम्या वेगवेगळ्या असतात. परंतु काही बातम्या किंवा घटना अशा असतात की, झाडून साऱ्या वर्तमानपत्रात त्यांना ‘लिड’ बनण्याचे भाग्य (?) लाभते आणि त्यात दुर्दैवाची बाब अशी आहे की, बहुतांश वेळा अशा ‘भाग्यवान’ लिडच्या बातम्या समाजाच्या, राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असतात.
काही वर्षापुर्वी महाबैल हर्षद मेहताचा शेअर घोटाळा गाजत होता. अलीकडील काळात तेलगी प्रकरणातील बातम्यांनी जवळपास रोज वर्तमानपत्राचे मथळे सजविलेले आपल्याला दिसतील. घडणाऱ्या घटनांची, त्या घटनांमागच्या कारणांची, त्यांच्या संभाव्य परिणामांची जाणीव आपल्या वाचकांना करून देणे, हे वर्तमानपत्रांचे आद्य कर्तव्यच आहे. ‘वृत्तपत्र’ या शब्दातच वृत्ताचे वर्तमानपत्रासाठी असलेले महत्त्व अधोरेखित होते. परंतु केवळ वाचकांपर्यंत बातमी पोहचविणे एवढाच मर्यादित हेतू वर्तमानपत्राचा नसतो, नसावा. त्या बातम्यांच्या आड दडलेले, इंठाजीत ज्याला ‘ँाूैााह ूप त्ग्हा’ म्हणतात; असे वास्तव वाचकांपर्यंत पोहचविणे हेदेखील वृत्तपत्रांचे एक मोठे कार्य आहे. हे वास्तव समाजासाठी उपकारक, हितकारक असावे ही अपेक्षाही त्यात द
लेली असते. ही अपेक्षा आज पूर्ण होताना दिसत नाही. कशा होणार? जिथे ‘लिड’च्या बातम्याच भ्रष्टाचार, अराजकाचे रसभरीत वर्णन करणाऱ्या असतात, तिथे कशाच्या माध्यमातून जनतेसमोर आदर्श ठेवले जाऊ शकतील? एखादी घटना घडल्यानंतर आज जर चार लोकांचा फायदा होत असेल तर वर्तमानपत्रातून बातमी उमटल्यावर चार हजार

लोकांचा फायदा होईल. मात्र आज

कुठे असा एखादा ‘आदर्श’ आहे की, ज्याला प्रसिध्दी मिळाल्यावर हजारो लोकांचा तो आदर्श ठरू शकेल? समाजमनाची बांधणी किंवा पोषण वर्तमानपत्रे तसेच इतर प्रसार माध्यमातून होत असते. या माध्यमातून जेव्हा सातत्याने भ्रष्टाचार, बेबंदशाही, अनैतिकतेचे खाद्यान्न वाचकांना पुरविले जाते तेव्हा त्यावर पोसला जाणारा समाज तरी ‘निरोगी’ कसा असेल? दोष प्रसारमाध्यमांचा नाही. ते तरी काय करतील? शेवटी जे पिकते तेच विकावे लागते आणि जे घडते तेच समोर ठेवावे लागते.
सध्या भ्रष्टाचाराच्या बातम्यांचे भरपूर पीक येत आहे. त्यालाच खमंग फोडणी देऊन वाचकांची भूक भागविली जात आहे. आता इथे प्रश्न हा उपस्थित होतो की, जे पिकते ते विकण्यातच धन्यता मानावी की, पीकच बदलून टाकावे. शेकडो वर्षाच्या वहिवाटीने येत असलेले पीक सहजासहजी बदलणे शक्य नसले तरी ते बदलण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांना तत्काळ यश मिळणार नाही, परंतु आज सुरू केलेल्या प्रयत्नांना पुढे ज्या कोणत्या पिढीत यश येईल, ती पिढी आपल्याला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. तेलगी प्रकरणाने यावर अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रत्येक सुज्ञ नागरिकाला भाग पाडले आहे. सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार आपल्यासाठी नवा नाही. नेहरूंच्या काळातसुध्दा जीप खरेदी प्रकरणात तत्कालिन संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांना राजीनामा द्यावा लागला होता. स्वतंत्र भारतात उघडकीस आलेले भ्रष्टाचाराचे ते पहिले मोठे प्रकरण होते. त्यान
ंतर अशा प्रकरणांची श्ाृ्रंखलाच तयार झाली. राजीव गांधी, नरसिंहराव या पंतप्रधानांची नावेसुध्दा या श्ाृ्रंखलेत जोडल्या गेली. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देशाला हजारो कोटीचा चुना लावून उजळमाथ्याने वावरणाऱ्या राजकारण्यांची संख्या आजही काही कमी नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत राजकारणी लोकं अतिशय बदनाम झालेले दिसतात किंवा राजकारण्यांचा भ्रष्टाचार लवकर उघडकीस येतो. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांचे कॅमेरे, पत्रकारांच्या लेखण्या त्यांच्यावर सदोदित पहारा ठेवून असतात, हे त्यामागचे एक प्रमुख कारण. याचा अर्थ केवळ राजकारणीच भ्रष्टाचारी असतात असे नाही. राजकारण्यांपेक्षा कैकपटीने अधिक आणि क्वचितच उघडकीस येईल, इतक्या शास्त्रशुध्दपणे उच्चपदस्थ सनदी नोकरशहा भ्रष्टाचार करीत असतात. 25-30 वर्षे सरकारी नोकरीत घालविल्यावर कसे, कुठे आणि किती खावे, यात हे लोकं इतके पारंगत झालेले असतात की, त्यांच्या भ्रष्टाचाराची साधी कुणकुणसुध्दा कोणाच्या कानावर येत नाही. केंद्रीय दक्षता आयोगाचे माजी प्रमुख एन. विठ्ठल यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, राजकारण्यांपेक्षा वरिष्ठ नोकरशहांचा भ्रष्टाचार कित्येक पट अधिक आहे, फक्त तो उघडकीस येत नाही एवढेच. तेलगी प्रकरणाने हे दुर्दैवी सत्य अत्यंत नागवेपणाने समोर आले आहे.
एकंदरीत भ्रष्टाचाराचा हा कर्करोग संपूर्ण शरी्ररभर पसरला आहे. ज्याला जिथे जशी संधी मिळेल तसा तो भ्रष्टाचार करू पाहतोय. बॉम्बस्फोट घडविणाऱ्या, निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना आपण देशद्रोही म्हणतो, अर्थात त्यांचे कृत्य देशद्रोहाचेच असते, परंतु अतिरेक्यांच्या कारवाईचा परिणाम मर्यादित असतो आणि अशा अतिरेक्यांना सरळ गोळी घालून संपविता येते. आमची देशप्रेमाची संकल्पना जशी मर्यादित वर्तुळात फिरत असते. तशीच आमची देशद्रोह्यांची

्याख्या अतिरेक्यांपाशीच थांबते. वस्तुत: अतिरेक्यांच्या देशद्रोही कारवायांपेक्षा भ्रष्टाचाऱ्यांचे कृत्य देशाच्या दृष्टीने अधिक घातक, व्यापक आणि प्रतिकूल परिणामकारक असते. तेलगी आणि चमूने तब्बल 32 हजार कोटीचा भ्रष्टाचार केला. या प्रकरणाशी संबंधित नवनवीन माहिती, नवे धागेदोरे, नव्या साखळ्या रोज समोर येतच आहेत. बड्या – छोट्या पोलिस अधिकाऱ्यांपासून इतर सरकारी विभागातल्या अनेकांचे हात यामध्ये काळे झालेले आहेत. देशाची अर्थव्यवस्था पर्यायाने स्थिरता आणि सार्वभौमत्वाला नख लावणाऱ्या या मंडळींना आम्ही देशद्रोही समजत नाही. अशा प्रकरणात झालीच तर दोन-चार वर्षांची शिक्षा होते आणि पुन्हा उजळमाथ्याने समाजात वावरायला हे लोकं मोकळे होतात.
भ्रष्टाचाराला कळत – नकळतपणे मिळत असलेली ही समाजमान्यता भविष्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. एरवी

प्रामाणिक आणि सत्शील माणसाचे मनही त्यामुळे विचलित होऊ शकते. सगळ्यांनीच देश

विकून खायला सुरूवात केली तर या देशाचे सार्वभौमत्व किती काळ टिकेल? आजही प्रामाणिक, देशहिताचा विचार करणाऱ्यांची संख्या कमी नाही. परंतु प्रचलित व्यवस्थेने या लोकांच्या वाट्याला उपेक्षा आणि तिरस्कारच बहाल केला आहे. एखादा उद्योजक प्रामाणिकपणे सरकारी कर भरून आपला व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न करीत असेल तर प्रचलित कायदे या उद्योजकाचा मूर्खपणा सिध्द करण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत असतात. एक लाखाची एखादी मशिनरी विकत घ्यायची असेल तर तब्बल 42 हजार (42 टक्के) कर भरावा लागतो. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊन गुंतवणुकीतला खर्च वसूल केव्हा व्हायचा, उद्योगाचा लाभ पदरात केव्हा पडायचा? म्हणजेच प्रामाणिकपणाची किंमत निराशा, हताशा, उद्वेग आणि आर्थिक नुकसानीतच मोजावी लागते. ही किंमत प्रामाणिक लोकांनी का चुकवावी? त्यांनी प्रामाणिकपणे कर का
भरावे? या लोकांनी कष्ट उपसून कर भरायचे आणि नोकरशहा, राजकारण्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढायच्या! शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून शेतीतून उत्पादन घ्यायचे आणि उत्पन्नाचा मलिदा मात्र दुसऱ्याच कुणी लाटायचा! हे असे कुठपर्यंत चालणार? ‘लिड’च्या बातम्या केव्हा खऱ्या अर्थाने समाजाला लिड करणाऱ्या असणार? ज्यादिवशी सामान्य करदाते आपल्या घामाच्या पैशाचा हिशोब मागतील, या व्यवस्थेत भरडल्या गेलेला सामान्य माणूस,विशेषत: तरूण वर्ग रस्त्यावर उतरून जाब विचारेल, त्याच दिवशी खऱ्या आणि सुदृढ परिवर्तनाची नांदी होईल.आज हे राष्ट्र घोटाळ्यांचे झाले आहे.

‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे’
ही त्रिंची रास्त अपेक्षा आज,
‘हे राष्ट्र घोटाळ्यांचे, हे राष्ट्र अराजकाचे,
आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भ्रष्टाचाराचे’
या दुर्दैवी वळणावर येऊन पोहचली आहे!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..