नवीन लेखन...

एक फाशी

नक्की वाचा आणि सर्वांनी विचार करा
•••••••••••••••••••••••••••

एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने याकुब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दि यावर लिहीलेला हा बेधडक लेख.
………………………………………………..

एक फाशी…तीही दहशतवाद्याला…! शेकडो जीव घेणार्‍या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी पोलीसांनी केली नव्हती.

पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती ‘ती’ गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली “गर्दी”,

का जमली होती ती ‘गर्दी’?

कल्याण, मुंब्रा, वांद्रे मुंबईच्या अनेक भागातून लोक याकूबच्या अंत्ययात्रेसाठी का आले?
याकूब मेमन महात्मा होता कि भारतरत्न ?
त्याच्या अंत्यविधीला इतकी गर्दी?

ही गर्दी म्हणजे भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. ज्या न्यायाधीशांनी निर्णय दिला, ज्या पोलिसांनी जीवाचं रान करून तपास केला, ज्या वकिलांनी जीव धोक्यात घालून खटला लढवला.

ही “गर्दी” म्हणजे त्या सगळ्यांचा अपमान आहे.
ही “गर्दी” मुंबई बॉम्बस्फोटात जीव गमावलेल्या प्रत्येक जीवाचा अपमान आहे.
त्यांच्या नातेवाईकांचा अपमान आहे.
हा अपमान भारतीय न्यायव्यवस्थेचा आहे.

जे मुस्लिम अंतयात्रे सामील झाले, ते त्यां मुस्लिमांना भारत मान्य नाही. ते स्वत:ला भारतीय समजत नाहीत. असा अर्थ काढायचा का ..??

एक दहशतवादी, बॉम्बस्फोट घडवतो, शेकडो जीव घेतो आणि त्याला दफन करण्यासाठी इतका मोठा जमाव येतो, हे अति नाही का ?

अरे, तुमचे डोळे उघडणार कि नाही ?

देशाची वाट लागल्यावर तुम्हाला जाग येणार का.?

खरंच का जमला असेल एवढा मोठा जमाव?

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचं त्या मुस्लिमांना दु:ख नाही का?

मुंबईवरचा हल्ला फक्त हिंदूंपुरता मर्यादित होता का?

मुंबईला झालेली जखम ही मुस्लिमांची नव्हती. की मग ती गर्दी समर्थन करत होती मुंबई बॉम्बस्फोटाची..?

या सर्व गोष्टींचा पोलीस म्हणुन आपण विचार केलाचं पाहिजे.

याकूबच्या अंत्यविधीला त्याच्या नातेवाईकांनी येणं हे समजू शकतो. पण मुंबईच्या प्रत्येक भागातून मुस्लिमांनी एवढी गर्दी का केली?
जमावबंदी झुगारून पोलीसांना न जुमानता गर्दी वाढत होती. गर्दी एवढी होती की दोनवेळा प्रार्थना घ्यावी लागली. याकूब मेमनसाठी एवढी प्रार्थना का?

या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नाहीय…पण त्या गर्दीनं खूप चुकीचा संदेश दिला एवढं नक्की.

मुस्लीम समाजानं एक मोठी संधी गमावली असं सतत राहून-राहून वाटतंय. जर याकूबच्या अंत्यविधीसाठी गर्दी जमली नसती, तर एक कठोर संदेश गेला असता की, मुस्लीम समाज हा दहशतवादाचं समर्थन करत नाही आणि अशा कृत्यात सहभागी असणार्‍यांना बहिष्कृत देखील करतो.

पण दुर्दैवाने असे घडले नाही….
आणि जमली ती फक्त गर्दी …गर्दी….गर्दी…..!

गर्दी देशाविरोधाची ……………………
गर्दी भारतीय घटनेच्या बहिष्काराची….
गर्दी दहशतवाद्यांचे समर्थन करणारी….
गर्दी पोलीसांना न घाबरणारी………….
गर्दी न्याय व्यवस्थेला न माणनारी……..

या गर्दी वर कठोरपणे कारवाई होणे आवश्यक होते नाही तर उद्या कोणाला साधी अटक केली तरी आमच्या माणसाला अटक केली, म्हणून पण पोलीस ठाण्यात गर्दी जमली तर नवल वाटायला नको..?

या गर्दी ने असे दाखवून दिले कि पोलिस व न्यायव्यवस्था यांचे वजन कमी झाले आहे.

शत्रुघ्न माळी
पोलीस निरीक्षक
••••••••••••••••••••••••••••••••

आम्ही जाणतो की हा मजकुर जितका पाहिजे तितका नाही फिरणार कारण असे संदेश फिरायला नेटपॅक नाही…तर मनगटात जोर असावा लागतो…!!!

जय हिंद

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..