नवीन लेखन...

१०० शतके आणि १०० स्वाक्षऱ्या

माझा लागोपाठ ३ ऱ्या वर्षी लिम्का रेकॉर्ड झाला परंतु त्याची तयारी १९९० साली सुरु केली होती. त्या आधी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या जोडीने हॅरिस शिल्ड मध्ये रेकॉर्ड केला तो २४ फेब्रुवारी १९८८ रोजी केला . त्यानंतर दोघांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. कधी मैदानावर तर कधी एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकर असे तेव्हा दोन चार स्वाक्षऱ्या घेत असे. पण रेकॉर्ड वगैरे हा प्रकार मनातही नव्हता. १९९६ च्या सुमारास माझा मुलुंडचा मित्र सतीश शिंदे म्हणजे शिशिर शिंदे चा मोठा भाऊ सतीश शिंदे हे शांता शेळके , रमेश तेंडुलकर ह्यांचे आवडते विद्यार्थी. त्यांचे तेंडुलकर यांच्याकडे जाणेयेणे होते . सतीश शिंदे जबरदस्त मनस्वी माणूस त्यांचे हस्ताक्षर जबरदस्त चांगले होते असे अक्षर आजपर्यंत मी कोणाचे बघितले नव्हते , त्याच कालखंडात माझी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये मोठी मुलाखत झाली ती टाईम्सच्या अनिल शिंदे या फोटोग्राफरमुळे अनिल शिंदे हा पण जबरदस्त मनस्वी माणूस त्याला माझ्या स्वाक्षरी कलेक्शन बद्दल समजले, एकेदिवशी त्याने घरी येऊन फोटो काढले, संध्याकाळीच अश्विनी शेखर यांचा फोन आला मी उद्या सकाळी तुमच्या घरी येत आहे तुमचे कलेक्शन बघण्यास, मी एकदम गॅसवर . रात्रभर झोप नाही लागली.नाही. सकाळी ती आली प्रश्न विचारले आणि निघाली मी तिला म्हणालो याचे काय करणार ती म्हणाली माहित नाही बॉस ने सांगतले आहे. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व एडिशनला माझा मोठा फोटो आणि मोठे राइटप . अनिल शिंदेने एका दिवसात मला टॉप ला नेले. त्यानंतर काही दिवसात प्रवीण दवणे याने ‘ मोठा एक लिहून माझे दुसरे नाव देऊन बारसे केले…ते नाव होते ‘ सह्याजीराव ‘ आजही त्याच नावाने मी ओळखला जातो.एकीकडे हे घडत होते तर त्याचवेळी सतीश शिंदे यांचा फोन एका व्यक्तीला तुझ्या घरी घेऊन येतो कलेक्शन नीट डिस्प्ले कर, सतीश शिंदे त्या व्यक्तीला घेऊन आले त्या व्यक्तीचे नाव होते रमेश पारधे. रमेश पारधे म्हणजे सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि त्याच्यासाठी काम करत होते जवळजवळ सर्वच महत्वाची कामे ते करत असत , आजही ते सचिन तेंडुलकर बरोबर आहेत , असा मित्र एखाद्यालाच लाभतो जो शून्य पासून टॉप पर्यंत साथ देतो. त्याबाबतीत सचिन तेंडुलकर सुदैवीच म्हणावा लागेल. एकदा टॉपला गेल्यानंतर अनेकजण ओळख वाढवतात , हेतू ठेवून मैत्री करतात असे रमेश पारधे याचे अजिबात नव्हते, रमेश पारधे याच्यावर पुढे मी सविस्तर लिहणारच आहे.तर स्वाक्षऱ्याचे कलेक्शन चालू होते. सतीश शिंदे यांचा फोन आला चल आपण साहित्य सहवास मध्ये आपण प्रभाकर पेढाकर यांच्याकडे जाऊ. प्रभाकर पेंढारकर म्हणजे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचे चिरंजिव , त्यांचे ‘ रारंगढांग ‘ हे पुस्तक आधी वाचले होते. पेंढारकरांकडे जाताना जिन्यातून वर जाताना खाली पाहिले , खाली दुसऱ्या इमारतीच्या खाली कर पार्किंग मध्ये मुले टेबल टेनिस खेळात होती , आम्ही वरती गेलो बऱ्याच गप्पा झाल्या. सुमारे तासा दीडतासाने आम्ही जिन्याने खाली उतरत होतो , खाली त्या मुलांचा खेळ चालूच होता इतक्यात छोटा चेंडू जरा लांब आला तो पाठमोरा खेळणारा मुलगा मागे वळून चेंडू घेणासाठी सामोरा आला आणि माझ्या तोडून मोठ्याने शब्द निघाले ‘ आयला सचिन ‘ तो सचिन होता. पहिल्या मजल्यावरच्या जिन्यातून माझे शब्द सचिनने ऐकले त्याने मला आणि सतीश शिंदे यांना क्षणभर पहिले, त्याचा खेळ सुरु झाला. कारण तो सतीश शिंदे यांना लहानपणापासून ओळखत होता. खाली आल्यानंतर सतीश शिंदे म्हणाले चल रमेश तेंडुलकर सरांकडे , भाऊंकडे जाऊ. एकदम डायरेक्ट सचिनच्या घरी… मी फुल हैराण.तेंडुलकर सरांना काही दिवसापूर्वी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळालेला होता . सतीश शिंदे म्हणाले आपण त्यांना भेटून जाऊ. घरी गेलो माझ्या छातीत धडधडत होते. मी कोण ते सागिंतले गप्पा सुरु असताना बाजूलाच सचिनचे मोठे बंधू अजित तेंडुलकर पण ऐकत होते, ते पटकन म्हणाले ‘ सह्याजीराव ‘ का ? मी पार आडवा म्हणजे आपली ‘ कीर्ती ‘ इथेपण पोहचली का ? थँक्स मटा , थँक्स प्रवीण दवणे. मागच्या बाजूला सचिनची आजी होती, त्याची आई , तेंडुलकर सर आणि मधूनच अजित तेंडुलकर गप्पा आम्हा सर्वांच्या गप्पा सुरु होत्या , चहा पाणी झाल्यावर निघताना. भाऊना म्हणालो सर तुमची सही द्या, ते म्हणाले नाही रे हात कापतो, मग देईन मी हट्टच केला द्या म्ह्णून ..मग त्यांनी सही दिली.

आम्ही सचिनच्या इमारतीच्या पायऱ्या उतरत असताना मनात एक येडा विचार आला , आयला आपले नाव सचिनच्या घरातही माहित आहे.बस्स इथून मात्र संधी मिळेल तेव्हा मी सचिनच्या स्वाक्षऱ्या जमवू लागलो , सतीश शिंदे यांनी मला अनेक स्वाक्षऱ्या घेऊन दिल्या. मग रमेश पारधे यांच्याशीही माझी मैत्री झाली ती आजतागायत आहे. आम्हा एकमेकाच्या घरात खूप प्रॉब्लेम झाले ,आजारपणे झाले रमेश पारधे यांनी माझ्या मुलाच्या आजारपणात इतकी मदत केली की सख्खा भाऊ करणार नाही. रमेश पारधे यांचे भाऊ सिद्धार्थ पारधे , सिद्धार्थ पारधे यांच्या पत्नी , त्याच्या घरातील सर्वानी , तसेच सिद्धार्थ पारधे , रमेश पारधे यांच्या आई यांनी मला माझ्या संकटाच्या काळात खुप साथ दिली. सचिनच्या अनेक स्वाक्षऱ्या हळूहळू वाढत होत्या . तसेच माझा स्वाक्षरी जमा करण्याचा छंद सुरुच होता. २०१३ मध्ये शेवटच्या सामन्याआधी ब्रेबॉर्न स्टेडियम मधल्या एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर याची शेवटची स्वाक्षरी २०१३ मध्ये घेतली. माझ्या संग्रही त्याच्या सुमारे १५० स्वाक्षऱ्या जमा झाल्या होत्या. हा सगळा प्रवास सहजपणे घडला असे समजू नका , श्रम तर होतेच आणि जबरदस्त इच्छाशक्ती आणि आपल्या कामाविषयी प्रामाणिकपणा.

मग ठरवले सचिन तेंडुलकरच्या १०० स्वाक्षऱ्या आणि १०० शतके ह्याचा लिम्का रेकॉर्ड करावयाचा , सगळे पेपरवर्क तयार केले माझ्या मुलाने करणने सर्व नीट करून सबमिट केले.

सचिन तेंडुलकर १०० शतके आणि १०० स्वाक्षऱ्या रेकॉर्ड झाला खरा परंतु इथेही अनेक हातानी मला मदत केली आहे ह्याचे मला आजही भान आहे , त्या सर्व हातांना माझा सलाम .

-सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..