२९ जानेवारी २०१० रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारतामध्ये चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळकेंच्या आयुष्यातील दोन-तीन वर्षांच्या कालखंडावरच चित्रपट काढायचा असं रंगकर्मी परेश मोकाशी यांनी ठरवलं. व फाळके यांचे जीवनचरित्र आजच्या तरुण पिढीसमोर आणण्याचे धाडस करणाऱ्या परेश मोकाशी यांनी केले.
१९१३ साली दादासाहेब फाळके ह्या ध्यास वेड्या माणसाने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचला. एक दिवस फाळके ह्यांनी इंग्रजांनी बनवलेला एक चित्रपट पहिला आणि त्याच क्षणी भारतीय भाषेंत चित्रपट करण्याचा निश्चय केला. भांडवल उभे करण्यापासून विदेशांत जावून तांत्रिक शिक्षण घेण्यापर्यंत ह्या वेड्या माणसाने ज्या खस्ता खाल्या त्या विनोदी स्वरूपांत हा चित्रपट मांडतो. १९११ मध्ये दादासाहेब फाळकेंना चित्रपट करण्याची कल्पना सुचते आणि १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’हा चित्रपट रिलीज होतो, त्याचा खूपच गवगवा होतो, चित्रपट बनवण्यासाठी फाळकेंना थेट इंग्लंडमधून ऑफर येते अशा आनंददायी आणि प्रसन्न व प्रेरणादायी प्रसंगाला ही गोष्ट जाते. म्हणून परेश मोकाशी यांनी तेवढ्याच भागावर चित्रपट केला.
कोणत्या परिस्थितीत पहिला चित्रपट तयार केला त्याची कथा प्रेक्षकांसमोर येणे गरजेचे होते ते काम परेश मोकाशी यांनी केले आहे. दादासाहेबांचा पहिल्या चित्रपट निर्मितीचा आख्खा प्रवास त्यातील बारकाव्यांसहित परेश यांनी पडद्यावर मांडला आहे. कला दिग्दर्शक नीतिन देसाई यांनी १९०० चा काळ खूपच चांगल्या पद्धतीने उभारला आहे. उत्कृष्ट वातावरणनिर्मिती केली गेली असल्यामुळे चित्रपट खर्या कालावधीतील वाटतो. जुना काळ उभा करण्यात नीतिन देसाई यांचा हातखंडा आहे आणि तो त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे.परेश मोकाशी यांच्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवले.
निर्माता- रॉनी स्क्रूवाला, स्मिती कनोडाई, परेश मोकाशी
दिग्दर्शक- परेश मोकाशी
संगीत- आनंद मोडक
प्रॉडक्शन डिजाइनर- नीतिन चंद्रकांत देसाई
कलाकार- नंदू माधव, विभावरी, मोहित गोखले, अथर्व कर्व
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply