हे दुसरे ज्योतिर्लिंग दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात श्री शैल डोंगरावर कर्नुल – या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या १२५ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिराबाबतची कथा अशी.
एकदा शंकराची पत्नी पार्वती ही रागावलेल्या कार्तिकेयाच्या शोधात फिरत फिरत कर्दळी वनात आली. थोड्याच वेळात भगावन शंकरही त्या वनात आले. एका सुस्वरुप भिल्लीणीवर आसक्त झाले. पण ती भिल्लीण म्हणजे साक्षात पार्वतीच होती. तिथल्या आदीवासींनी शिवपार्वतीचा विवाह मोठ्या थाटात संपन्न केला. त्या आदीवासींच्या आग्रहावरुनच शिवपार्वती ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात त्याठिकाणी राहिले. त्यावरुनच या ठिकाणाला “दक्षिण कैलास” असे नाव पडले.
तिथले स्थानिक लोक “चेंच्युमलिक” म्हणजेच शंकराला आपले जावई समजतात. या ज्योतिर्लिंगाला पांडव, प्रभू श्रीरामचंद्र यांनीही भेट दिल्याचा उल्लेख आढळतो. पुढे विजयनगरच्या सम्राटाने मंदिराचा जिर्णोद्धार केला.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply