आज १७ एप्रिल. जागतिक हेमोफिलिया दिवस.
हिमोफेलिया हा रक्ताचा आजार समजला जातो. शरीरात रक्त गोठण्यासाठी तेरा घटक असतात. ‘हिमोफेलिया’च्या पेशंटमध्ये आठ क्रमांकाचा घटक कमी असेल तर ‘हिमोफेलिया ए’ नावाचा आजार होतो. नऊ क्रमांकाच्या घटकाची कमतरता असल्यास ‘हिमोफेलिया बी’ आणि अकरा क्रमाकांचा घटक नसल्यास ‘हिमोफेलिया सी’ असे आजार होतात. हिमोफिलिया हा दुर्मीळ आजार असून, तो ०.०१ टक्के लोकांमध्ये आढळून येतो. या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्त्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्त्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. जगभरात हीमोफीलिया आजार या आजाराने त्रस्त लोकांची संख्या जवळपास ५०,००० आहे.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply