स्वातंत्र्यपूर्व काळात हे वृत्तपत्र ‘बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ म्हणून सुरू झाले आणि १८६१ मध्ये याचे नामकरण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ असे करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांच्याच प्रेरणेने महाराष्ट्र टाइम्स हे टाइम्स ग्रुपचे मराठी दैनिक १८ जून १९६२ पासून मुंबईतुन सुरु झाले. या दैनिकाच्या निमित्ताने ‘टाइम्स गटाने’ मराठी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश केला. द्वा. भ. कर्णिक हे या वृत्तपत्राचे पहिले संपादक होत. त्यांच्या नंतर १९६७ साली गोविंद तळवलकर संपादक झाले.
तळवलकर यांची संपादकीय कारकीर्द जवळजवळ पंचवीस/सव्वीस वर्षांची होती. त्यांच्या नंतर कुमार केतकर हे २००१ पर्यंत संपादक होते. मराठी भाषिक संस्कृतीवर या वृत्तपत्राने आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषयांसंबंधीचे चौफेर, उद्बोधक व दर्जेदार लेखन यांमुळे सुशिक्षित, बुद्धिजीवी मराठी समाजात या वृत्तपत्राने आपली वेगळी प्रतिमा उमटविली आहे. मुख्य म्हणजे तळवलकरांच्या निर्भीड, परखड आणि शैलीदार अग्रलेखांमुळे या वृत्तपत्राने आपले वेगळेपण सिद्ध केले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राचे ३ नोव्हेंबर १८३८ या दिवशीचे पहिले पान.
Leave a Reply