२१ व्या शतकातील दुसर्या दशकाच्या शेवटी पृथ्वीवरील पाणि, ऊर्जा, जमीन एकूणच निसर्गातील पंचमहातत्वाच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे.एवढंच नव्हे तर पुढील पिढीला देण्यासाठी आपल्याकडे नैसर्गिक संपत्तीचा ठेवा कदाचित उरणार नाही एवढा र्हास होत आहे.जमिनीचा वरचा थर तयार होण्यासाठी किमान ६०० वर्ष इतका वेळ म्हणजे जवळ जवळ ६ शतकांचा कालावधी
लोटतो. हे एक उदाहरण झालं मात्र यासारखी कितीतरी नैसर्गिक साधन संपत्ती आपण रिसायकल न करता पिढय़ानुपिढय़ा वापरत आहोत, यासाठीच विज्ञानभारती व केंद्रीय ऊर्जा व नवीनकरणीय खात्यातर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचे आयोजन विश्वसरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आयोजन केले होते.देशभरात १२ ते ३० जानेवारी दरम्यान राष्ट्रीय ऊर्जा जन-जागृती अभियानाचे आयोजन केले होते.त्याचाच एक भाग म्हणून नागपूरला व्ही.एन.आय.टी. कॉलेजमध्ये २८ ते ३० जानेवारी दरम्यान पहिले आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषद आयोजित केली होती. या तीन दिवसीय परिषदेत १०६ संशोधन निबंधाचे वाचन करण्यात आले.या ऊर्जा जागृती अभियानाअंतर्गत देशातील चार कोपर्यातून म्हणजे राजकोट, जम्मू-काश्मीर, कन्याकुमारी पासून ऊर्जा यात्रेचा समारोप झीरो माईल चौकात झाला.त्यानंतर कस्तुरचंद पार्कवर झालेल्या ऊर्जा रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांना, स्वयंसेवकांना डॉ. विजय भटकर यांनी कौतुकाची व ऊर्जेसारख्या विषयासाठी ८००० हजार किलोमीटर प्रवास करुन आलेल्या स्वयंसेवकांना कौतुकाची थाप दिली.२८ जानेवारीला ऊर्जा परिषदेचे रितसर उद्घाटन झाले. व्यासपीठावर उपस्थित होते परम महासंगणक बनविणारे विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, विज्ञानभारतीचे सचिव विवेकानंदा पै, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस.पी. ग
तम, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.व्ही.एस.सपकाळ, विश्वसरैया नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे चे संचालक डॉ.सी.एस. मोघे, पंजाब विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश अरोरा, वर्धेच्या महात्मा गांधी खादी अनुसंधान केंद्राचे संचालक डॉ. टी. करुणाकरन, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी सदस्य अभियंता प्रभाकर कुकडे, डॉ. मोहन खेडकर.सामान्य माणसांनी ऊर्जेचा वापर काटकसरीने करावा, कचर्याचे व्यवस्थापन याविषयी अनेक मान्यवरांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. मात्र शास्त्रज्ञ, ऊर्जा तज्ज्ञ या व्यतिरिक्त दैनंदिन वापरातील ऊर्जा विषयी लोकांमध्ये सजकता आणण्याचे व पारंपारिक मानसिकता बदलण्याचे सर्व मान्यवरांचे एकमत होते. परिषदेतील माहितीनुसार उर्जा वापराविषयी काही महत्वाच्या टिप्स देत आहोत. <ऊर्जा बचतीचे उपाय – •> न केल्याने लॅपटॉप ९ वॅट आिण टी.व्ही. १० वॅट विजेचा वापर होतो,एक डिजीटल विडियो प्लेअर नेहमी चालू ठेवल्यास एका वर्षात ७०० रुपयाच्या विजेचा वापर होतो, फोटोकॉपी (झेरॉक्स) मशीन काम नसताना रात्रभर चालू ठेवल्यास १५०० कॉपीज निघतील इतका विजेचा वापर होतो. कुटुंबाची संख्या कमी असल्यास १६५ लीटर ऐवजी ८० लीटरचे फ्रिज खरेदी करावे, वाशिंग मशीनच्या वापर केल्याने एकूण वीज वापराच्या २० टक्के विजेचा वापर त्यात होतो.त्यासाठी तीव्र धुलाई किंवा किफायत-धुलाई युक्त मशीन खरेदी करावे, बाहेर खिडक्यांवर लावण्यात येणारे ए.सी. ऐवजी आतल्या बाजूने स्प्लीट ए.सी. लावावा. जेणे करुन ऊर्जा कमी लागते. १५ वर्षापूर्वीची उपकरणे पुन्हा तपासून घ्यावी. सी.एफ.एल. बल्बचा वापर करावा,सोलर लॅन तसेच ७० ते ८० वॅटस् पंख्याऐवजी ५० वॅटच्या छोटय़ा पंखाचा वापर करावा. फ्रिजचा उपयोग करताना दरवाजा वारंवार उघडू नये. एक मिनिटापेक्षा दरवाजा जास्त वेळ उघडा राहिल्यास फ्रिजचे तापमान ४ डिग्रीने कमी होते.व तेवढे तापमान पुन्हा करण्यासाठी आणखी ऊर्जा लागते.यावेळी बोलताना संगणक तज्ज्ञ भटकर म्हणाले की, एक अब्ज गणिती आकडेमोड करणारा संगणक बनविण्यासाठी सध्या भारतातील शास्त्रज्ञ झटत आहे.मात्र त्यासाठी लागणारी ऊर्जा कोठून आणणार. मत्स्योत्पादनाची नीळक्रांती, शेतीसाठीची हरितक्रांती,दूधासाठी श्वेतक्रांती यानंतर ऊर्जेसाठी होणार्या क्रांतीचा रंग केसरी असून यालाच ऑरेंज रिव्हूलेशन म्हटले जाईल.
(महान्यूजच्या सौजन्याने)
— बातमीदार
Leave a Reply