नवीन लेखन...

दोन सूर्यांचा चमत्कार…… इंटरनेटवरची अफवा (Email Hoax)

गेले काही दिवस एक इ-मेल इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. Aderoid नावाचा एक तारा पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला २१ जून २०१० रोजी आकाशात दोन सूर्य दिसणार आहेत असे ते इ-मेल आहे. हे एक मनमोहक दृष्य असेल आणि असे दृष्य पुन्हा केवळ इ.स २२८७ मध्ये दिसेल असेही या इ-मेल मध्ये लिहिले आहे. मजा म्हणजे इ-मेल पाठवणार्‍याने २१ जून २०१० च्या आकाशाचे फोटोही त्यात पाठवले आहेत. हा इ-मेल पाठवणारा भविष्यवेत्त्या नॉस्ट्रेडॅमसचा अवतार तर नाही ना?

मी काही अंतराळवैज्ञानिक नाही. अंतराळशास्त्र या विषयाचा कोणताही अभ्यासही मी केलेला नाही. मात्र या इ-मेलवर एक सामान्य माणूस म्हणून शास्त्रीयदृष्ट्या नीट विचार केला तर असे दिसते की यात दिलेल्या गोष्टी पूर्णपणे बिनबुडाच्या आहेत.
या इ-मेलमध्ये दिलेल्या अंतरावर एखादा तारा जर आलाच तर तो बघायला आपण जिवंत रहाणारच नाही. सूर्य पृथ्वीपासून जवळजवळ ९३ दशलक्ष मैल अंतरावर आहे. हा तारा २१ जूनला ३४ दशलक्ष मैलावर येणार आहे म्हणे. म्हणजेच सुर्यापेक्षा निम्म्याहून कमी अंतरावर येणार.
सूर्यापासून सुमारे ३६ दशलक्ष मैलांवर असलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान दिवसा ४०० अंश सेल्सियसपेक्षा जास्त असते. हा नवा तारा सूर्यापेक्षा लहान असला आणि तरीही इतक्या कमी अंतरावरुन तो सूर्याइतकाच मोठा दिसणार असला तर त्यात किती उर्जा असेल आणि त्याचे तापमान किती असेल याचा अंदाजच केलेला बरा. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात काय हलचल होईल याचाही अंदाज करा. दुसरे असे की असा तारा एकदम तर येऊन टपकणार नाही. दररोज थोडाथोडा करत जर तो पृथ्वीजवळ येत असेल तर गेले काही दिवस आपल्याला हे दोन सूर्य दिसायला हवे होते. यातला तो तारा म्हणजेच दूसरा सूर्य दररोज थोडाथोडा मोठा होताना दिसायला हवा होता.
आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या मेलमध्ये १२.३० ची वेळ कुठल्या देशातील ते दिलेलेच नाही. शोधलं तर काहीही मिळत नाही. त्याचप्रमाणे ज्ञात असलेल्या सगळ्या तार्‍यांची माहिती उपलब्ध असणार्‍या स्टेलर डेटाबेस या साईटवरही या तार्‍याची काहीही माहिती सापडत नाही. याउलट गुगलवर शोधलं तर ही अफवा असल्याबद्दल अनेक साईटसच्या लिंक्स मिळतात.
मजेची गोष्ट म्हणजे तीन चार वर्षापूर्वी अशीच एक अफवा मंगळ ग्रहाबद्दल पसरली होती. २१ ऑगस्ट २००७ ला मंगळ असाच तेजस्वी दिसणार असल्याने आकाशात दोन चंद्र दिसतील अशी ती अफवा होती. या दिवशी आकाशात काहीही घडले नाही. एक योगायोग असा की त्यावेळीही अशी घटना पुन्हा एकदम २२८७ मध्ये दिसेल असाच दावा होता आणि आत्ता दिसणारे कथीत दोन सूर्यही एकदम २२८७ मध्येच दिसतील असं म्हटलंय.
भारतात गणपती दूध पित आहे अशी अफवा काही वर्षांपूर्वी पसरली होती. तसाच हा प्रकार.. मात्र स्वत:ला पुढारलेले समजणार्‍या अमेरिकेतूनच सुरु झालाय. अफवा आणि अंधश्रद्धेत “हम भी कुछ कम नही“ हे अमेरिकन लोकांनीही ही दाखवून दिलंय हेच खरं.
जाताजाता एकच छोटीशी टिप. अशी इ-मेल्स आपल्या वाचण्यात आली तर कोणालाही forward करताना थोडा विचार करा. या बिनबुडाच्या Forwards मुळे जो अनावश्यक traffic निर्माण होतो त्यामुळे एखाद्या दिवशी जगभरातली इ-मेल यंत्रणाच कोलमडून पडण्याचा धोका आहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी…..

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..