नवीन लेखन...

प्रगती की अधोगती?

प्रकाशन दिनांक :- 29/12/2002

शेकडोंनी बंद पडलेले कारखाने, उद्योगधंदे या देशाला महान औद्योगिक राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहरूंना मूक श्रद्धांजली वाहत उभे आहेत. जेवढ्या समस्या शेतकऱ्यांच्या आहेत तितक्याच किंबहुना काकणभर जास्तच उद्योजकांच्या आहेत. पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे.
[…]

विश्वस्तांनीच चालविली लूट!

मानवी जीवन सुखकर होण्यासाठी अनेक यंत्रणा किंवा व्यवस्था आपण निर्माण केल्या आहेत. अगदी कुटुंब पातळीपासून अशा व्यवस्था अस्तित्वात असतात. कुटुंबात एखाद्या कुटुंबप्रमुखावर त्या कुटुंबाची सर्वांगीण काळजी घेण्याची जबाबदारी असते.
[…]

लोका सांगे ब्रह्यज्ञान…!

अलीकडील काळात जनतेच्या सहकार्याने विविध योजना राबविण्याचा सपाटा सरकारने चालविला आहे. आपले सरकार किती लोकाभिमुख आहे, जनतेची आणि विशेषत: ठाामीण भागातल्या जनतेची आपल्याला किती काळजी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून सरकार करीत असले तरी सरकारच्या या उपक्रमावर प्रश्नचिन्हे लावणारे काही मुद्दे उपस्थित होतातच. ठााम स्वच्छतासारखे विविध अभियान राबविताना सरकारचा उद्देश किती प्रामाणिक आहे, हा संशोधनाचा मुद्दा ठरु शकतो.
[…]

भकास करणारा विकास!

दोन चार दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचावयास मिळाली. बातमी क्रिकेटशी संबंधित होती म्हणून सुरूवातीला केवळ वरवर नजर टाकली, परंतु बातमीचा मथितार्थ वेगळाच असल्याचे लक्षात आले आणि पुन्हा काळजीपूर्वक नीट वाचली. न्यूझीलंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघातील हरभजन आणि सेहवाग या दोन खेळाडूंना घाणेरडे बुट सोबत आणल्याबद्दल प्रत्येकी 200 डॉलर्स दंड करण्यात आला, अशी ती बातमी होती.
[…]

आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी

देशाची सार्वभौमता अखंड राखणे ही कोणत्याही देशाची सर्वाधिक प्राथमिकता असते. ही अखंडता कायम ठेवण्यासाठी केवळ लष्करानेच दक्ष राहून चालत नाही आणि अलीकडील काळात तर लष्करापेक्षा राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनतेनेच आपल्या देशाची सार्वभौमता अक्षय राखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. लष्करी आक्रमण करून एखादा देश पादाक्रांत करणे आज जागतिक स्तरावरील बदलत्या परिमाणाच्या पार्श्वभूमीवर अगदीच अशक्य आणि कालबाह्य ठरले आहे. […]

नव्या कुरणांची निर्मिती

साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही.
[…]

वृद्धाश्रमाऐवजी ज्ञानमंदिरे उभारा!

विज्ञानात एक नियम आहे, बहुतेक न्यूटनने प्रतिपादित केलेला असावा. एखादे कार्य करताना जेवढे बल आपण लावतो तेवढेच त्या कार्याला विरोध करणारे बल, कार्य ज्या वस्तूवर होत आहे त्या वस्तूत निर्माण होते. विपरीत दिशेने कार्य करणारा हा बलाचा नियम केवळ भौतिक विज्ञानापुरताच मर्यादित नसावा. […]

अनाकलनीय अर्थशास्त्र

परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्‍या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली.
[…]

घातल्या पाण्याने गंगा वाहत नसते!

परवा नागपुरात राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांनी लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीचा आढावा घेतांना लोभस आकड्यांचा खेळ सादर करीत महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात अद्यापही देशात नंबर वन असल्याचे सांगितले. महाराष्ट्राची ही औद्योगिक प्रगती(?) भविष्यातही कायम ठेवण्याच्या उद्देशाने आणि विशेषत: मागासलेल्या विदर्भासाठी त्यांनी काही योजना देखील जाहीर केल्या.
[…]

आणखी एक इशारा!

नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे.
[…]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..