द ग्रेट मराठा सचिन तेंडुलकर
सचिनचा जन्म मुंबईतच झाला. त्याचे सारे बालपण मुंबईतील वांद्रयाच्या साहित्य सहवासात गेले. सचिन लहानपणापासूजनच इतर मुलांप्रमाणे भोवरा, गोट्या, पतंग खेळण्यात दंग असायचा. एका जागेवर स्वस्थ बसणे त्याला पसंत नव्हते. सतत मैदानात मैदानी खेळ खेळणे हा त्याचा आवडता छंद होता. साहित्य सहवासातल्या मैदानात मोठ्या मुलांमध्ये बरोबरीने खेळून आपला वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. तेव्हा मोठ्या मुलांना आश्तवर्य वाटल्यावाचून राहिले नाही. […]