वर्तुळ पूर्ण होतेय!
प्रकाशन दिनांक :- 25/05/2003
सृष्टीतील घटनाक्रमाचा उल्लेख करताना हमखास किंवा एकमात्र वापरला जाणारा शब्द आहे ‘चक्र’. सृष्टी हा शब्द, त्या शब्दातून प्रकट होणारी संकल्पना त्याला चक्र जोडल्याशिवाय पूर्णपणे साकार होत नाही. ‘सृष्टीचक्र’ या पूर्ण शब्दातून होणारा बोध हेच स्पष्ट करतो की, एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण सृष्टी पुन्हा – पुन्हा त्याच ठिकाणी येत असते.
[…]