कोंडी झालेला उद्द्धस्त भारत
प्रकाशन दिनांक :- 30/11/2003
एखाद्या गोष्टीचे यथार्थ, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे असेल तर केवळ त्या गोष्टीच्या बाह्यरंग, रूप, आकारावरून कधीच करता यायचे नाही. तसा प्रयत्न केला तर हाती येणारा निष्कर्ष हमखास चुकू शकतो. एखादे साधे बीज असेल तर ते सकस आहे, चांगल्या प्रतीचे आहे, त्याचा वाण उत्तम आहे, हे केवळ ते बी हातात घेऊन सांगता येणार नाही.
[…]