पाझर फुटलाच नाही!
प्रकाशन दिनांक :- 25/07/2004
‘राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा’, सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या महाराष्ट्र भूमीचे हे वर्णन शब्दश: खरे ठरु पाहत आहे. निसर्गाची अवकृपा आणि शासन-प्रशासनाची बेफिकरी अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्र देश निकट भविष्यातच केवळ दगडांची भूमी म्हणून ओळखल्या जाऊ लागला तर नवल नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्राला बसत आहे आणि त्यातही विदर्भ-मराठवाडा या भागाला तर निसर्गासोबतच शासनाच्या बेमुर्वतपणाचाही सामना करावा लागत आहे.
[…]