नवीन लेखन...

करा उद्योग भरा कर!

प्रकाशन दिनांक :- 31/10/2004

‘अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. वस्तुस्थिती ही आहे की, अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत म्हणून अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे’, एका नामवंत अर्थशास्त्रज्ञाचे हे विचार पुरेसे बोलके आहेत. एखादे राष्ट्र संपन्न होते ते केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीमुळेच, हा ठाह चुकीचा आहे.
[…]

कोण जिंकले कोण हारले?

प्रकाशन दिनांक :- 24/10/2004

राज्य विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीचे फलित, त्याचे राजकीय परिणाम असे झाले असते तर तो पडला असता, तसे झाले असते तर हा आला असता, याच्यामुळे हा पडला, त्याच्यामुळे तो पडला, या जातीने त्याला मतदान केले, त्या जातीने याला मतदान केले, कुणाचे गणित कुठे चुकले, कुणाचे जुळून आले, या आणि अशाच प्रकारच्या चर्चांचे रवंथ सध्या राज्यभर सुरू आहे. निवडणुकीचा खरा अर्थ, निवडणुकीची खरी उपयुक्तता, निवडणुकीचे पावित्र्य या चर्चेच्या गदारोळात कुठेतरी हरवून गेलेले असते.
[…]

ठिणगी ते वडवानल!

प्रकाशन दिनांक :- 10/10/2004

कोणत्याही मोठ्या घटनेची सुरुवात अगदी लहान कारणापासून होत असते. कधी-कधी ते कारण इतके लहान असते की त्याकडे सगळ्यांचेच हमखास दुलर्क्ष होते. या दुलर्क्षाची खरी किंमत मोजायची वेळ येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो.
[…]

स्थिर, स्थितप्रज्ञ!

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधुनी पाहे’, असा प्रश्न उपस्थित करीत जगात कुणीच सुखी नसल्याचा उपदेश संतांनी केला होता. संतांना सुखाची नेमकी कोणती व्याख्या अपेक्षित होती, हे ठाऊक नाही; परंतु आज प्रचलित असलेल्या सुखाच्या सरधोपट व्याख्येचा विचार केला तर शेकडो वर्षांपूर्वीचा संतांचा हा प्रश्न अगदी गैरलागू ठरतो. शेकडो वर्षांत सामाजिक, आर्थिक संरचना भरपूर बदलली आहे.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..