नवीन लेखन...

बेशिस्तीचे बळी!

प्रकाशन दिनांक :- 30/01/2005

महाराष्ट्रासह संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीत मग्न असतानाच सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या मांढरदेव काळुबाई यात्रेत मात्र मृत्यूने आपले तांडव दाखवायला सुरुवात केली होती. अखेर अडीचशेपेक्षा अधिक बळी घेऊनच हे तांडव शांत झाले. चेंगराचेंगरीत इतक्या मोठ्या प्रमाणात जीवहानी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचे सावट पसरले.
[…]

केवळ खोट्या प्रतिष्ठसाठी

प्रकाशन दिनांक :- 23/01/2005

ऐहिक सुखासाठी पैसा लागतो, तो कमवायचा आणि तो कमवण्याच्या नादात मात्र सुख भोगायला वेळच शिल्लक ठेवायचा नाही, अशी बहुतेकांची परिस्थिती असते. अलीकडील काळात सुख आणि प्रतिष्ठा या दोन्ही संकल्पना इतक्या उथळ झाल्या आहेत की, चार पैसे फेकून त्या सहज प्राप्त होऊ शकतात असाच सगळ्यांचा समज झाला आहे.
जगण्याच्या गणितातला फोलपणा स्पष्ट करताना एका तत्त्ववेत्त्याने मांडलेले त्रैराशिक सर्वविदित आहे.
[…]

निष्क्रियतेचे उदात्तीकरण

प्रकाशन दिनांक :- 16/01/2005
पश्चिम महाराष्ट्राने विकास साधला म्हणण्यापेक्षा या भागाने विकासाची गंगा खेचून नेली, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भगिरथ प्रयत्नात त्या भागातील सामान्य शेतकरी तर सामील झालाच होता, सोबतच तिकडच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा वेळप्रसंगी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून आपल्या मतदारांचे हित जोपासणे सर्वोतोपरी मानले.
विदर्भाचा अनुशेष,विदर्भ-मराठवाड्याचे मागासलेपण याबद्दल नेहमीच ओरड होत असते.
[…]

करंटेपणाची कमाल!

प्रकाशन दिनांक :- 09/01/2005

सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सुनामी लाटांनी दक्षिण आशियाई देशांना हादरविले. प्रचंड प्रमाणात प्राण आणि वित्तहानी झाली. सगळ्याच प्रसारमाध्यमात केवळ सुनामीच्या विध्वंसाचीच चर्चा होती.
[…]

रोग परवडला!

प्रकाशन दिनांक :- 02/01/2005
तिकडे सुनामी लाटांनी दक्षिण भारताच्या किनारपट्टीला धुऊन काढले आणि त्याच वेळी पश्चिम किनाऱ्यावरील मुंबईत देशी दारूच्या लाटांनी जीवघेणे थैमान घातले. विषारी दारू प्राशन केल्याने तब्बल 83 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. केवळ आठवडाभराच्या आतच दोन वेगवेगळ्या घटनांत एवढ्या मोठ्या संख्येत बळी गेलेल्या लोकांमुळे अवैध दारूचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..