शेतकरी आणि प्रतिष्ठित
आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कृषिक्षेत्राच्या, कृषकांच्या समस्या, त्यांच्या निराकरणाचे मार्ग या विषयावर चर्चेला पेव फुटले आहे. भारताचा शेतकरी प्रचंड हलाखीत जगतो आहे, शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत आहे, यावर झाडून साऱ्यांचे एकमत असते; परंतु शेतकरी दरिद्री का आहेत, यावर फारशा गांभीर्याने कोणी चिंतन करताना दिसत नाही. गॅट करारामुळे जागतिक व्यापार खुला झाला. […]