नवीन लेखन...

आरक्षणाचा तमाशा!

राज्यात सध्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे वारे घोंघावत आहे. जनप्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात असावे, हा मुख्य आधार या पुनर्रचनेमागे आहे. शिवाय अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दाही या पुनर्रचनेचा आधार आहे.
[…]

तरीही पुढे जायचेच आहे!

एकदा एका शेतकऱ्याने थेट इंद्रदेवाकडे धाव घेऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली. त्या शेतकऱ्याचा आरोप होता की, पर्जन्याचा स्वामी असलेल्या इंद्राला मुळात पाऊस केव्हा, कुठे आणि कसा पाडावा याचे प्राथमिक ज्ञानदेखील नाही. जेव्हा पिकाला पाण्याची गरज असते तेव्हा आकाशात एकही ढग नसतो आणि जेव्हा उघाड पाहिजे असते तेव्हा धो-धो पाऊस कोसळतो.
[…]

नका आत्महत्या करू; करा निसर्ग शेती !

एखादा साथीचा जीवघेणा रोग पसरावा त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण पसरत चालले आहे. रोज कुठे ना कुठे एखादा शेतकरी आत्महत्या करत आहे. लोकसुद्धा ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या भावाने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे तटस्थ नजरेने पाहायला लागले आहेत.
[…]

तफावत ?

विकसित देश विकसित का आहेत आणि क्षमता असूनही भारत विकसित देशांच्या पंक्तीत का बसू शकत नाही, या प्रश्नाच्या मुळाशी जायचे झाल्यास उत्तरांची जंत्रीच समोर करता येईल. खूप कारणं आहेत, परंतु त्यातली बहुतेक कारणे निव्वळ तकलादू स्वरूपाची आहेत. वास्तविक एखाद्या देशाला विकसित म्हणून मिरविण्यासाठी त्या देशाजवळ जे काही असावे लागते ते आपल्या भारतात अगदी खच्चून भरलेले आहे किंवा होते असे काही बाबतीत म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..