February 2006
सकारात्मकता
परमेश्वराचं अस्तित्व हा सातत्यानं चर्चिला जाणारा विषय. कोणी ते सहजी मान्य करतात, तर कोणी बिलकूल नाही. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी भरपूर उदाहरणं असतात. काही विज्ञानावर सिद्ध करता येतात, तर काही विज्ञानासाठीही गूढ. नेमकं काय असावं? विचार करायला लागलो, की प्रश्नांची भेंडोळी पुढे सरकत राहतात अन् उत्तरं… उत्तरं सापडली तर मग प्रश्नाचं अस्तित्व राहिलं असं कसं म्हणता […]
काल, आज आणि उद्या !
आंबेडकरी साहित्यासमोरील आव्हान!
परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे. संपूर्ण जग सतत बदलत असते.
[…]
पुणं बदलतंय !
पुणं हे शहर मराठी माणसाच्या दृष्टीनं औत्सुक्याचं शहर ठरलं आहे. माणूस मग तो पुण्याचा असो वा नागपूर-नाशिकचा, पुण्याबद्दल त्याचं स्वतचं असं ठाम मत असतं. तो नागपूरचा असेल, तर त्याला या गावाचा हेवा वाटतो. नाशिकचा असेल, तर पुण्याला स्थायिक व्हावं असं वाटत असतं. पुण्यातल्या माणसाला, मग तो मूळ पुण्याचा असो वा नसो अपार असं कौतुक असतं.
[…]
दर्जा
मी त्यावेळी जपानच्या दौर्यावर होतो. भारत आणि जपानच्या सांस्कृतिक विभागांनी एकत्रितपणे त्याचं आयोजन केलं होतं. दहा-पंधरा दिवसांच्या कालावधीत हा देश भौगोलिकदृष्ट्या पाहणं शक्य होतं; पण सांस्कृतिकदृष्ट्या त्याचा परिचय होणं हे कठीण होतं. तरीही प्रयत्न सुरू होता. रोज किमान तीन भेटी असा कार्यक्रम असायचा. त्यातही प्रामुख्यानं संग्रहालये असत. काही भेटी मी भारतात असतानाच निश्चित केलेल्या होत्या […]
माझ्या मनातले…
ही गोष्ट आहे माझ्या मित्राची. पंधरा वर्षे होऊन गेलीत त्या घटनेला. त्या वेळी तो अन् मी एकत्र काम करीत असू. पत्रकार म्हणून त्याला अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण आले. तयारी सुरू झाली. सर्वसाधारण अमेरिकेला जायचे म्हणजे असणारा सर्वांत मोठा अडथळा या भेटीत नव्हता. अमेरिकन सरकारच्याच माहिती खात्याने दिलेले हे निमंत्रण असल्याने व्हिसाचा प्रश्न नव्हता. तयारी झाली. दौरा खूप छान झाला. खूप पाहायला मिळाले. बरेच काही समजावूनही घेता आले. या दौर्याच्या अनेक हकिकती आम्ही ऐकत गेलो. आमच्याही ज्ञानात भर पडत गेली. […]
राज्य विकायचे आहे!
लोकशाही व्यवस्थेत सरकारचे काम विश्वस्तांचे असते. राज्याचे खरे मालक राज्याचे नागरिक असतात या नागरिकांच्या वतीने सरकार राज्याचा कारभार पाहत असते. त्यामुळे सरकारची जबाबदारी केवळ संरक्षण आणि संवर्धनापुरतीच मर्यादित आहे; परंतु आपल्या या मर्यादेचा सरकारला विसर पडला की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.
[…]