आई
शब्द अन् त्याचे अर्थ याविषयी खरं तर खूप काही बोलता, लिहिता येईल; पण त्याची ही जागा नव्हे आणि तसा हेतूही. तरीही संवादासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात जाता तेव्हा शब्दही मुके होऊन जातात. रशिया, जपान एवढंच काय दक्षिणेतल्या ग्रामीण भागात गेल्यावर शब्दांना अर्थ उरत नाही आणि मग अभिनयाचा कस लागतो. […]