आंबा
त्या वेळी जागतिकीकरणाचे वारे एवढ्या वेगाने वाहत नव्हते. भारतीय अर्थव्यवस्थाही खुली व्हायची होती. मी जपानला गेलेलो होतो. तिथलं जीवन, सुबत्ता, सांस्कृतिक आणि सामाजिक बदल पाहत होतो. अनेकांना भेटत होतो. जपानी माणसांची घरं लहान; पण ते अशी सजवितात की ती मोठी वाटावीत. अर्थात, तिथं पाहुण्यांना घरी बोलावून मेजवानी करावी, अशी पद्धत नाही. स्वतचं खासगीपण अत्यंत निष्ठेनं […]