डोके वापरा
सापेक्षतावादाचा जनक असलेल्या आईन्स्टाइनने शंभर वर्षांपूर्वी मांडलेल्या सिद्धान्ताचे कोडे सोडविले असल्याचा दावा अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने केला असल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. तो शास्त्रज्ञ भारतीय वंशाचा असल्याने त्याच्याबद्दल कौतुक वाटणे स्वाभाविकच होते; परंतु त्याचवेळी हे कोडे शंभर वर्षांत कुणीही सोडवू शकले नाही याचे आश्चर्यदेखील वाटले. अर्थात, अशा गणिती किंवा सैद्धान्तिक कोड्यांच्या बाबतीत तशी शक्यता असू शकते.
[…]