रेंद्र मोदी या नावाला आंग्लाळलेल्या आणि पक्षीय भाटगिरी करणाऱ्या प्रसार माध्यमांनी केवळ अतिरेकी हिंदुत्ववादी या एकाच रंगात रंगविण्याचे काम सातत्याने केल्यामुळे एखाद्याने मोदींचे नाव घेतले की लगेच त्याच्याकडे संशयाने पाहण्याची लोकांची मानसिकता झाली आहे. नरेंद्र मोदींची राजकीय भूमिका काय आहे, त्यांचा हिंदुत्ववाद काय आहे किंवा धर्मनिरपेक्षतेबद्दल त्यांचे काय विचार आहे, हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी कितपत यशस्वी ठरले यावर चर्चा करण्यात, राज्याच्या विकासाच्या संदर्भात त्यांची कामगिरी कशी आहे यावर विचार करण्यास हरकत काय आहे? परंतु मोदी म्हटले की गोध्रा आणि त्यानंतरची दंगल या पलीकडे जाण्यात बऱ्याच जणांना फारसे स्वारस्य नसते.
[…]