नवीन लेखन...

उत्साह हरवला!

खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बहुतेक सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित झाले आहेत.
[…]

नटव्यांची लोकशाही!

राजकीय पक्षांनीच आपले उमेदवार निवडताना त्याचा त्या मतदारसंघाचा अभ्यास, त्याचा जनसंफ, मतदारसंघातील प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाण आणि विकासाबद्दलची त्याची तळमळ या गोष्टींचा विचार करूनच उमेदवारी द्यायला हवी. सगळ्याच राजकीय पक्षांनी हे पथ्य पाळले तर निवडून येणारा उमेदवार, मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघाचा योग्य प्रतिनिधी ठरेल; परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये सुरू असलेले युत्या-आघाड्यांचे राजकारण आता जवळपास शेवटाला गेले आहे.
[…]

तीन पायांची शर्यत!

‘दि ठोट इंडियन सर्कस’ अशा सार्थ शब्दांत ज्या प्रक्रियेचे वर्णन केले जाते, त्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित करणे आणि मतमोजणीनंतर नवे सरकार सत्तारूढ होणे, असा साधारण तीन महिन्यांचा हा सोहळा असतो. निवडणूक आयोगाने पंधराव्या लोकसभेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
[…]

डॉक्टरांनो धंदा करता जोखीमही स्वीकारा!

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर्स तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्गाला मारहाण होण्याचे प्रकार अलीकडील काळात खूप वाढले आहेत. या घटना बहुधा सरकारी इस्पितळाच्या संदर्भातच असतात. अशी एखादी घटना घडली की लगेच त्या इस्पितळात असतील नसतील तेवढे सगळे कर्मचारी काम बंद आंदोलन करतात.
[…]

गुरूजन हिताय, गुरूजन सुखाय!

धर्म या शब्दाला आता अनेक अर्थ प्राप्त झाले असले तरी पूर्वी धर्म म्हणजे नीतीने वागणे, धर्म म्हणजे आपल्याकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्यांची प्रामाणिक पूर्तता याच अर्थाने हा शब्द प्रचलित होता. क्षत्रिय धर्म, ब्राह्यण धर्म, वैश्य धर्म आदी शब्दप्रयोग जातीवाचक नव्हे तर गुणवाचक होते. समाजाचे संरक्षण करायचा तो क्षत्रिय आणि समाजाचे संरक्षण हा त्याचा क्षत्रिय धर्म, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान करणारा ब्राह्यण धर्माचे पालन करायचा, तर व्यापारउदीमातून अर्थार्जन करणारा वैश्य धर्माचे पालन करायचा.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..