भाजपला झाले तरी काय?
लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित धक्कादायक पराभवाने सध्या भाजपमध्ये प्रचंड निराशा पसरलेली दिसते. पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या सिद्धांतांना, पक्षाच्या वैचारिक धोरणाला आव्हान देणाऱ्यांची वाढती संख्या पाहता ही निराशा आता असंतोषातून व्यत्त* होऊ लागली आहे, असेच म्हणावे लागेल. एका छोट्या चकमकीत झालेला पराभव म्हणजे महायुद्धातला अंतिम पराभव नसतो, हे लक्षात घ्यायला भाजपमध्ये कुणी तयार नाही.
[…]