सत्पात्री दान
नुकतीच एक बातमी वाचली की मुंबईतील भिकारी दरवर्षी रुपये १८० कोटी कमावतात. काय हा दानशूरपणा! खरोखरच भीक मागणे हा सुध्दा एक मोठा उद्योगच झालेला आहे.
[…]
नुकतीच एक बातमी वाचली की मुंबईतील भिकारी दरवर्षी रुपये १८० कोटी कमावतात. काय हा दानशूरपणा! खरोखरच भीक मागणे हा सुध्दा एक मोठा उद्योगच झालेला आहे.
[…]
आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात विशेष खबरदारी घेतली. शरद पवारांसारखा अतिकुशल रणनीतीकार आघाडीकडे होता. जनमानसाची नाडी अचूक ओळखण्याचे त्यांचे कसब शेवटी युतीला भारी पडले.
[…]
सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला. […]
आज त्यांना कदाचित हा प्रसंग आठवणारही नाही. खरं आहे, अमृतवर्षावाला थोडंच माहित असतं, की, अमृत कुठं कुठं साडतं आहे. पण तो वर्षाव, त्या कणांना टिपण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याला अमृतमय करतो!! […]
यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी. […]
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का? चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का? माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्या पर्यायाचा विचार करू. […]
पैसे मिळविण्यासाठी कोणताही झटपट मार्ग नाही. त्यामुळे आंधळेपणाने कुठेही पसे गुंतवू नका, ती उधळपट्टी ठरेल. छोटी रक्कम खरेच दानधर्मासाठी वापरायची असेल तर त्यातुन आदिवासी मुलांसाठी दोन-तीन सायकली घ्या. त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ५-६ किमी पायी चालावे लागते. सायकली मिळाल्यानंतरचा त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद पहा. मग तुम्हाला खर्या दानधर्मातला आनंद अनुभवायला मिळेल. जीवनाचा आणि देण्याचा अर्थ समजावून घ्या.
[…]
एकीकडे नक्षल्यांचे हल्ले यशस्वी होत असताना सरकारदेखील आपली नेहमीची सुरावट बदलायला तयार नाही. आम्ही नक्षल्यांचा कडक बंदोबस्त करू, मतदारांनी त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे भरीव आश्वासन देणे सुरूच आहे. खरेतर सरकार आणि नक्षल्यांमध्ये सुरू असलेल्या या खेळात विनाकारण बळी जातो तो गरीब आदिवासींचा. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions