2009
यतीन कार्येकर ते औरंगजेब : एक अद्भूत प्रवास
यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी. […]
तुम्ही बदल घडवू शकता !
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का? चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का? माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्या पर्यायाचा विचार करू. […]
ना धरि लोभ मनी
पैसे मिळविण्यासाठी कोणताही झटपट मार्ग नाही. त्यामुळे आंधळेपणाने कुठेही पसे गुंतवू नका, ती उधळपट्टी ठरेल. छोटी रक्कम खरेच दानधर्मासाठी वापरायची असेल तर त्यातुन आदिवासी मुलांसाठी दोन-तीन सायकली घ्या. त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ५-६ किमी पायी चालावे लागते. सायकली मिळाल्यानंतरचा त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद पहा. मग तुम्हाला खर्या दानधर्मातला आनंद अनुभवायला मिळेल. जीवनाचा आणि देण्याचा अर्थ समजावून घ्या.
[…]
विद्रोहाकडून विध्वंसाकडे!
एकीकडे नक्षल्यांचे हल्ले यशस्वी होत असताना सरकारदेखील आपली नेहमीची सुरावट बदलायला तयार नाही. आम्ही नक्षल्यांचा कडक बंदोबस्त करू, मतदारांनी त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे भरीव आश्वासन देणे सुरूच आहे. खरेतर सरकार आणि नक्षल्यांमध्ये सुरू असलेल्या या खेळात विनाकारण बळी जातो तो गरीब आदिवासींचा. […]
लढा (किंवा झोप काढा)
मुंबईवर मागच्या वर्षी हल्ला झाला तेव्हा काही लोकांनी मेणबत्त्या लावुन राजकारण्यांच्या वरचा राग व्यक्त केला होता. आताही निवडणुका आलेल्या आहेत आणि रणधुमाळी सुरु झालेली आहे. काही लोक आतादेखील संताप व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी
तर मतदानच करु नये अशी मते व्यक्त होत आहेत. पण खरे पाहता आपणच याला जबाबदार आहोत. आणि मतदान न करण्याविषयी म्हणाल तर तेच तर राजकारण्यांना हवे आहे. म्हणजे त्यांनी मिंधे केलेले लोक वा त्यांचे कमिटेड कार्यकर्ते हेच फक्त मतदानाला बाहेर पडतील. […]
निवडणूक निर्णायक वळणावर!
कोणता पक्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाबुगिरीवर नियंत्रण ठेवण्याची हिंमत बाळगून आहे? विशेष गरज नसताना विकासकामातील पैसा वळवून सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. या आयोगाच्या शिफारशी तुर्तास, राज्याची आर्थिक घडी नीट बसेपर्यंत लागू करणार नाही, असे म्हणण्याची हिंमत दाखवू शकतो?
[…]
छत्रपति शिवाजी महाराज यांचे मूळ छायाचित्र
मास्को येथील संग्रहालयामध्ये असलेले छत्रपति शिवाजी महाराज यांचे हे मूळ छायाचित्र आहे असे म्हणतात, त्यांना समोर बसवून हे काढले आहे व त्यावर त्यांचे हस्ताक्षर पण आहे. […]
टिप्स नेटभेटीच्या
सध्या इंटरनेटवर ऑनलाईन मॅरेज-ब्युरोजचे मोठे प्रस्थ आहे खरंतर याचा उपयोगही फार होतो. शादी डॉट कॉम, जीवनसाथी. भारतमेट्रीमोनी वगैरेसाख्या साईटसना अक्षरशः हजारोंच्या संख्येने रिस्पॉन्स मिळतो. या साईटसवर वावरताना आणि एकूणच त्यात माहिती भरताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. […]